पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/437

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असें दिसत नाही. अयनांश कमी मानून संक्रमण मार्गे आले तर लोकमान्य होईल की नाही याचा विचार पंचांग सुरू करतेवेळी त्यांनी केला नाही, व तो विचार मनांत येण्याचे तेव्हां कारणही नव्हते; व यामुळे शुद्ध निरयन वर्ष घेऊनही फरक लोकांच्या समजुतींत न येई असें करण्यास मार्ग आहे की नाही याचा विचार त्यांनी केला नाही असे दिसते. असा मार्ग आहे असे मला आढळून आले आहे. रेवतीच्या तारांची मृदंगाकति आमच्या ग्रंथांत वर्णिली आहे. त्यांत एक तारा शक १८०९ च्या आरंभी संपातापासून २१ अं. ३२ कला ५७ विकला अंतरावर आहे. यामुळे आमच्या सिद्धांतांचे आरंभस्थान सांप्रत झिटापिशियमपेक्षां तिला फार जवळ आहे. आमच्या निरनिराळ्या सिद्धांतांच्या वर्षमानास अनुसरून शक १८०९मध्ये अयनांश किती मानले पाहिजेत ते पूर्वी दिलेच आहेत. (पृ. ४११) ते २१ अं. ५६ क. पासून २२ अं. ३ क. पर्यंत आहेत. मध्यमरवि घेतला तर ते २२।४ पासून २२।१८ पर्यंत होतील. तसेंच आमच्या देशांतला चालू प्रचार पाहिला तर शक १८०९ मध्ये अयनांश कोठे २२१४५, कोठे २२।४४ आणि कोठे २०४९ आहेत, हेही पूर्वी सांगितले आहे. (पृ. ४११). तेव्हां वर मी सांगितलेली तारा आरंभस्थानी मानिली असतां शक १८०९ मध्ये अयनांश २११३३ मानावे लागतील. हे वरील सर्वांच्या अगदी जवळ आहेत. तेजस्वितेसंबंधे झिटापिशियम तारा वेधास किंवा नुसती पाहण्यास जितकी उपयोगी आहे तितकीच ही उपयोगी आहे. झिटापिशियम आरंभस्थान धरून ११ नक्षत्रं चुकतात. ही धरून सात मात्र चुकतील, ही जास्त सोय आहे. ह्मणून ही तारा आरंभस्थानी मानाची, तिचे संपातापासून जें अंतर ते अयनांश मानावे. अथवा चित्रा तारा वेधास फार उपयोगी आहे. सूर्यसिद्धांतांत तिचा भोग १८० अंश आहे. यावरून तिच्याशी वेधांची तुलना करून प्राचीन ज्योतिषी ग्रहगतिस्थिति साधीत असतील असें अनुमान होते. तर आतां चित्रातारेचा भोग १८० अंश मानून तेथून १८० अंशांवर आरंभस्थान मानावें. चि. त्रातारेचा सायनभोग शक १८०९ मध्ये ६ राशि २२ अंश १६ कला आहे. ह्मणून शक १८०९ मध्ये अयनांश २२।१६ मानावे. हेही वर दाखविलेल्यांच्या अगदी जवळ आहेत. ह्याप्रमाणे आरंभस्थान मानिलें असतां, सात आठ मात्र नक्षत्रे चुकतील. सारांश शक १८०९ मध्ये २१३३ अथवा २२।१६ अयनांश मानावे अयनवर्षगति वास्तविक झणजे ५०२ विकला मानावी, आणि वर्षमान शुद्ध तिसरा मार्ग. नाक्षत्रसौर मणजे ३६५ दि. १५ घ. २२ प. ५३ विपळे मानावें. हा मार्ग चालू सर्व पंचांग, तसेंच केरोपंती, बापूदेव व रघुनाथाचार्यादिकांची पंचांगें या सर्वांपेक्षां उत्तम होय. आणि सायनमानाचे जे दोन मार्ग वर सांगितले ते प्रचारांत न येतील तर हा तिसरा मार्ग घ्यावा हे चांगले. ह्यांत चालू ग्रहलाघवीपंचांगाहून मूर्यसंक्रमणास कांहीं घटिकांचा मात्र फरक पडेल आणि अधि

  • पृ. १२६ यांत योगताराभोग सूक्ष्म (केरापंती) दिले आहेत, ते झिटापिशियमपासून अंतरें आहेत. झिटाच्या पुढे ही तारा सुमारे ३ अं.१५ क. आहे. यामुळे ज्यांसमोर 'पढें' असे लिहिले आहे त्या उत्तराभाद्रपदांखेरीज सर्व तारा आपापल्या प्रदेशांत येतील. सात चकतील त्यांत ज्येष्ठ फक्त २ कला मागे राहतील.

ह्या ग्रंथाचा हा भाग प्रथम शक १८१० मध्ये लिहिला म्हणून यांत शक १८०९ चे गणित आलें.