पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/436

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाटेल. तारात्मक नक्षत्रांत एकदम सुमारे पावणे दोन नक्षत्रांचा फरक पडून तो थोडासा भ्रमोत्पादक होईल. ह्मणून हा मार्ग फार अडचणीचा वाटेल तर दुसरा एक मार्ग आहे. तो असाः-अयनांश सांप्रत सूर्यसिद्धांतादिकांप्रमाणे मानावयाचे ते कायम करावे (शक १८०५ मध्ये २२ ); आणि वर्षमान दुसरा मार्ग. शुद्ध सायन घ्यावे. यांत अयनगति अर्थात् शून्य होईल. असें केल्याने सांप्रत ऋतूंस सुमारे २२ दिवसांचा फरक पडला आहे तितकाच राहील; त्याहून जास्त होणार नाही. या मार्गाचा ग्रंथ तयार झाल्यावर हा मार्ग प्रचारांत येण्यास कोणत्याही प्रकारची अडचण नाही. राजाज्ञा नको, शंकराचार्यांची आज्ञा अथवा साह्य नको. छापखाने नसतां ग्रहलाघव ग्रंथ थोड्याच वर्षांत सर्वत्र पसरला तसा या मार्गाचा ग्रंथ आणि पंचांग सहज सर्वत्र लवकर पसरेल. निरयन मान ग्राह्य नाहीं असें वर सिद्ध केलेंच, तथापि सायनमानाचा स्वीकार करणें दुर्घट वाटेल, निरयनच घेणे असेल, तर ग्रहलाघवादिकांचें, केरोपंती व बापूदेवादिकांचें या तिहींतलें एकादें ध्यावे किंवा निराळेच घ्यावे याचा विचार करूं. सूर्यसिद्धांतादिकांचे निरयन वर्षमान चालू राहील तर काय परिणाम होतील हे वर तार्किक विचारांत दाखविलेंच आहे. तेव्हां तें वर्षमान सोडून देऊन शुद्ध नाक्षत्र सौरवर्षमान घेतले पाहिजे हे कोणासही कबूल केलेच पाहिजे. सूर्यसिद्धांताचें वर्ष व्या आणि शुद्धग्रहगतिस्थिति घेऊन पंचांग करावे असा बापूदेव यांचा अभिप्राय आहे, व रघुनाथाचार्य यांचाही तसाच दिसतो. त्यास हेतु इतकाच की सूर्यसिद्धांताचा वर्षारंभ घेतल्याने अयनांशांत फरक समजुतींत येण्याजोगा पडत नाही. येणेकरून सूर्यसंक्रांति आणि अधिमास पूर्वीप्रमाणेच येतील आणि सामान्य लोकांत आणि ज्योतिष्यांतही असें पंचांग मान्य होण्यास हरकत नाही. याहून त्यांचा हेतु जास्त कांही दिसत नाही. परंतु तो साधून शुद्ध वर्षमान स्वीकारिता येईल असा मार्ग असल्यास तो ते व कोणीही कबूल करतील. आतां केरोपंतांचे मत शुद्ध नाक्षत्र (निरयन) सौरवर्ष घ्यावें असें आहेच. पण झिटापिशियमतारा आरंभस्थानी घ्यावी असे त्यांचे मत आहे. परंतु ती घेतल्याने सूर्यसंक्रमणास ४ दिवसांचा फरक पडतो आणि अधिकमास भिन्न येतो. यामुळे केरोपंती पंचांग मान्य होत नाही. झिटापशियमतारा शक ४४४ च्या सुमारें आरंभस्थानाजवळ होती हे खरे. तरी सूर्यसिद्धांतांत रेवतीभोग शून्य नाहीं; ३५९।५० झणजे १० कला कमी आहे. लल्लाने रेवतीभोग ३५९।० मानला आहे; ह्मणजे एक अंश कमी आहे. ब्रह्मगुप्ता व त्याच्या पुढील ज्योतिष्यांनी रेवतीमोग शून्य मानिला आहे, तरी त्यांचे किंवा आमच्या कोणत्याही ग्रंथाचें आरंभस्थान झिटापिशियम किंवा कोणतीही तारा सर्वकाल असूं शकणार नाही असे मी अयनचलनविचारांत स्पष्ट दाखविलेंच आहे (पृ. ३३८). आरंभस्थानी रेवती तारा असावी असा ब्रह्मगुप्ताचा व पुढल्यांचा हेतु मात्र खरा. रेवती नक्षत्राच्या ३२ तारा आहेत. त्यांतून एरवादी तारा अशी सांपड़ली की तिचें सांप्रत संपातापासून अंतर, सर्व ग्रंथांवरून येणान्या सांप्रतच्या अयनाशांच्या जवळ जवळ आहे, तर ती आरंभस्थानी मानून शुद्ध नाक्षत्र सौरवर्ष घेण्यास ब्रह्मगुप्तादि सर्व ज्योतिषी सांप्रतच्या काली असते तर ते आनंदाने प्रवृत्त झाले असते. केरोपंतांनी आमच्या सर्व ग्रंथांतील अयनचलनाचा इतिहास पाहिलेला होता