पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/435

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भवास येते, यावर काही अंशी या गोष्टीचा निर्णय अवलंबून राहील हे खरें. सायनमानानें पत्रिका जुळते असें सायनवादी ज्योतिषी माधव ब्रह्माजी आणि जीवनराव त्र्यंबक चिटणीस ह्मणतात*. युरोपांतले हल्लींचे प्रसिद्ध फलज्योतिषी झड़कील आणि रफील हे सायन मानानेंच पत्रिका करितात. हल्ली या देशांत सर्वत्र निरयन मानानेंच पत्रिका करितात. तथापि ज्योतिर्निबंधांत जातकोत्तम ग्रंथांतलें असें वचन आहे:-- उच्चतः सप्तमं नीचं प्रोकांशे परिनीचता । इह कार्यः सायनांशखचरैः फलनिर्णयः।। यावरून जातकप्रकरणांत सायनमान ग्राह्य होय असें आमच्या ग्रंथकारांचेही मत आहे. सायननिरयनांच्या आरंभस्थानांत फारसें अंतर नव्हते त्या वेळीच जातकाचे बहुतेक मुख्य ग्रंथ झाले आहेत. यामुळे ते सायनानुसार असावे असे दिसते. याविषयी जास्त विवेचन पुढे जातकस्कंधांत केले आहे. सायन मानाने पत्रिका जुळवून द्या म्हणजे आम्ही सायनमान स्वीकारितों असें ह्मणणारे पुष्कळ लोक मला भेटले आहेत. परंतु कोणत्याच मानाने ती गोष्ट सर्वांशी साध्य नाहीं असे मला वाटते. आणखी ज्योतिःशास्त्र केवळ पत्रिकेसाठींच झाले आहे असें नाहीं . प्रथम तार्किकदृष्ट्या जो विचार केला तो सर्व काळीं सर्वांस सर्वत्र संमत होउत्तम ग्राह्य मार्ग. णारा आहे. ह्मणून त्या विचाराप्रमाणे (१) सायनमान स्वीकारण हा सर्वात उत्तम मार्ग होय. ऐतिहासिकदृष्ट्या आणि धर्मशास्त्रदृष्टया तोच मार्ग ग्राह्य आहे असें वर दाखविलेंच आहे. या मार्गाने व्यवहारास प्रथम थोडीशी अडचण पडेल. परंतु जुलियस सीझर याने इ. स. पूर्वी ४६ वें वर्षी पंचांगाची शुद्धता केली, तेव्हां वर्षारंभ एकदम ६७ दिवस पुढे नेला, तेव्हां लोकांची जी अडचण व गैरसमजूत झाली असेल तिजपुढे २२ दिवस वर्षारंभ मागे आणणे ह्याने होणारी अडचण कांहींच नाही. शिवाय अधिकमासामुळे कशी सोय आहे हे नुकतेच सांगितलेच आहे. ज्या वर्षी ग्रहलाघवी पंचागानें अधिकमास आहे आणि सायनाने नाही अशा वर्षी सायन पंचांग सुरू केले म्हणजे झाले. तिथि दोहींच्या एकच आहेत. शेतकीसंबंधैं कांहीं वर्षे अडचण पडेल; परंतु पूर्वी अमक सूर्यनक्षत्रीं शेतकीची जी जी कृत्ये होत असतील ती ती आतां अमक नक्षत्री करावयाची असे नियम पंचांगांतच काही वर्षे लिहिले आणि काही वर्षे चालले झणजे मग त्यांस कधीं बाध यावयाचा नाही, आणि काही अडचण पडणार नाही. मात्र सायन पंचांग ज्यावरून तयार करितां येईल असा ग्रंथ प्रथम तयार झाला पाहिजे. वरील मार्गाने रोजच्या तिथिनक्षत्रांस काही अडचण नाही. परंतु पर्जन्यादिकांची मूर्यनक्षत्रे २२ दिवस मागे आल्यामुळे शेतकीच्या कामास थोडासा घोटाळा

  • माधवराव ब्रह्माजी यांणी सांवत्सरभविष्यमाला या नांवाचे शक २८०६ च्या भविष्यांचे पुस्तक प्रसिद्ध केले होते. त्यांत भविष्य सायनमानाने वर्तविली होती. चिटणीस हे इ० स० १८९५ मे पासून ' ज्योतिर्माला ' नांवाचें मासिक पुस्तक मुंबई एथे काढितात. त्यांत फलज्योतिविचार सायनमानाने असतो.