पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/434

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परंतु विवाह या कृत्याचा व्यवहाराशी निकट संबंध आहे, आणि धर्मशास्त्राशीही आहे. त्यास निरयन मानाने अडचण येईल, असें मागे दाखविलेंच आहे (पृ. ४२५).. नीकालांतराने येईल हे खरें परंतु येईल यांत संशय नाही. सांप्रतही ज्येष्ठ मास विवाहास उक्त असून पावसामुळे एखाद्या वर्षी तो विवाहास निरुपयोगी होऊ लागला आहे. आतां उलटपक्षी सायनमान स्वीकारल्याने प्रस्तुत व्यवहारास अडचण येईल की काय हे पाहूं. आपले महिने चांद्र आहेत यामुळे अधिकमास धरावा लागतो. ही गोष्ट सायनमान सुरू होण्यास फार अनुकूल आहे. जुलियस सीझरच्या वेळी वर्षाचे दिवस एकदां जास्त धरावे लागले. पोप ग्रेगरीच्या वेळी आणि इ. स. १७५२ मध्ये इंग्लंडांत कायदा ठरवून आज एका महिन्याची अमुक तारीख तर उद्या १०।१२ तारखा टाकून पलीकडली, असें करावे लागले. त्यामुळे लोकांस चमत्कारिक वाटले असेल. कायद्यामुळे मात्र तें अमलांत आले; परंतु तसे आपल्यास करावयास नको. एका वर्षी जुन्या पंचांगाप्रमाणे आधिक महिना आला असेल तो मुळीच धरिला नाही व पुढे सायन पंचांग स्वीकारून त्याप्रमाणे अधिक महिने धरीत गेलें ह्मणजे झाले. आणि सर्व पंचांग करणारे मनांत आणतील तर लोकांस नकळत हा फेरफार सहज होईल. याप्रमाणे सोय आहे ही गोष्ट खरी; वरी निरयन मृग नक्षत्राच्या आरंभी सायन आर्द्रा नक्षत्र सांप्रत असते आणि तेव्हां पाऊस सुरू होतो, तेव्हां मृगारंभी पडावयाचा पाऊस आर्द्रा नक्षत्र अर्धे झाले तरी कां पडत नाही, असा लोकांचा घोटाळा होईल. पावसाळा लागण्याच्या सुमारास निरयन मृगांच्या आरंभापूर्वी करावयाची कामें सायन मृगांच्या आरंभी लोक कदाचित् करावयास लागतील. याप्रमाणे व्यवहारास अडचण येईल. हळू हळू फेरफार होत गेला तर त्यामुळे व्यवहारास अडचण येणार नाही. परंतु सर्व संक्रांति व सूर्यनक्षत्रे २२ दिवस मागे आणणे ही गोष्ट फारच दुर्घट होईल. गुरु कधीं फिरला, चंद्र कोणत्या राशीस आहे, या गोष्टींत फेरफार झाले तरी लोकांस फारसे समजणार नाहीत. परंतु हस्तांत करावयाची पेरणी स्वातींत करावयाची ही गोष्ट लोकांस चमत्कारिक वाटेल. नक्षत्रे, सूर्यसंक्रांति, ह्या गोष्टी आमच्या लोकांत बद्धमूल झालेल्या असल्यामुळे तारखांत १०।१२ दिवसांचा फरक पडल्याने युरोपियन लोकांच्या व्यवहारास जितकें कठिण पडले असेल त्यापेक्षा आमच्या लोकांस जास्त कठिण पडेल. सायनपंचांग स्वीकारण्याचे काही लोकांनी मनांत आणले तरी सर्व लोक एकदम तें स्वीकारितात असे नाही, तेव्हां जुनें पंचांग चालू असल्याने त्या पंचांगाचा जो फाल्गुन त्यास सायनचैत्र ह्मणावे लागेल हे लोकांस सहज समजेल. ब्रह्मगुप्ताची संक्रांति एक दिवस अगोदर होती ती प्रचारांत आली होती तरी शेवटीं प्रचारांतून गेली. केरोपंती पंचांगाची संक्रांति चार दिवस अगोदर आहे तरी ते पंचांग प्रचारांत न येण्यास एक मुख्य कारण तेंच आहे. तर मग सायनमानाच्या संक्रांति २२ दिवस पूर्वी येतात, यामुळे ते पंचांग प्रचारांत येण्यास फार कठीण पडेल. याप्रमाणे काही अडचणी आहेत खन्या; परंतु त्या दूर करण्याचा विचार पुढे केला आहे. सायनमान ग्राह्य होय असा विचार एथपर्यंत मुख्यतः गणित आणि मुहूर्त या स्कंधांच्या दृष्टीने झाला. या दोहोंस में मान्य तें जातकस्कंधास जातकस्कंध-47 दृष्ट्या विचार. मान्य असले पाहिजे. कोणत्या मानानें पत्रिका केली तर अनु