पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/433

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पूर्वोक्त मार्ग धर्मशास्त्रसंमत नाही, तरी तो स्वीकारावयाचा असें मनांत आणिलें तर धर्मशास्त्र नवें केले पाहिजे. ते करावें कोणी, कसे कराकोणी? वाव वें, इत्यादि अडचणी आल्याच. धर्मशास्त्रग्रंथांची आणि का लोकस्थितीची ज्याला माहिती आहे त्याला दिसून होईल की ही गोष्ट दुष्कर आहे. शास्त्री लोकांची एक कमिटी नेमून धर्मशास्त्र नवें बनिवले अशी कल्पना केली तरी ते मान्य व्हावें कसें ! ही गोष्ट तर वरचीहून कठीण. नवे धर्मशास्त्र मान्य शंकराचार्याची त्याला संमति मिळाली, किंबहुना कायकसे व्हावें? प्रचारांत कसे यावें? द्यानें तें पास केले तरी ते प्रचारांत येणे किती कठीण आहे, याची कल्पनाही. व्हावयाची नाही. आपल्या देशांत धर्मशास्त्राचे ग्रंथ शेंकडों किंबहुना हजारों आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या मिळून लाखों प्रती देशभर पसरल्या आहेत, त्या नाहींशा केल्या पाहिजेत. त्या सर्व रद्द समजाव्या असा हुकूम केला तरी इतर विषयांचे ग्रंथ तर बुडवितां येत नाहीत. त्या हजारों ग्रंथांत आणि कोट्यवधि लोकांच्या हृत्पटावर दृढ झालेली पद्धति फिरविणे अघटनीय होय. धनिष्टारंभी उदगयन होत असे ते पुढे उत्तराषाढांवर होऊ लागले, तरी धनिष्टादि गणना ग्रंथांत आहे. ती दोन तीन ग्रंथांत मात्र आढळते. थोडाच काळ थोड्याच प्रदेशांत प्रचारांत होती. तरी तिजमुळे वराहमिहिरासारख्या ज्योतिष्यास भ्रम पडला. मग हजारों ग्रंथांत पसरलेली. दीर्घकाळ सर्व देशभर चालत आलेली सांप्रतची अमुक ऋतुमास नक्षत्री अमुक कर्म करावें ही पद्धति बदलली, उदाहरणार्थ, आश्विनांतला दसरा भाद्रपदांत द्वादशीस करावा असे ठरविले, तर सामान्य लोकांचा किती बोटाळा होईल, अज्ञ लोकांत किती भानगडी उद्भवतील, याचे वर्णन करूं लागलों तर दहावीस पृष्टें भरतील. सारांश को तो मार्ग त्याज्य. णत्याही दृष्टीने पाहिले तरी चैत्रांतला वर्षारंभ आणि इतर कृत्य 'फाल्गुनांत, माघांत, अशी मागें मार्ग आणणे, अशा प्रकारची पद्धति त्याज्य होय. आतां व्यावहारिकदृष्ट्या सायननिरयनांचा विचार करूं. सायनावांचून व्यवहाराचें फारसें अडेल असें नाही. ज्यांच्या व्यवहारास कोणत्याच पंव्यावहारिकदृष्ट्या चांगाची गरज नाही त्यांविषयी विचारच नको. ज्यांना पंचांग विचार. पाहिजे त्यांच्याचसंबंधे विचार करावयाचा. शक ४४४च्या सुमारास आी सूर्य नक्षत्र सुमारे अर्धे झाल्यावर पजन्यास आरंभ होत असे.सांप्रत मृगांच्या आरंभी होतो. सांप्रत बाशी, सोलापुर प्रांतांत लोकांचे मुख्य खाणे जे जोंधळे त्यांची पेरणी हस्तनक्षत्राच्या अर्धाच्या सुमारास होते. ती शक ४४४ च्या सुमारास स्वातींच्या आरंभी होत असली पाहिजे हे उघड आहे. परंतु मागें स्वातीत पेरणी होत असे ही गोष्ट लोकांच्या स्वप्नीही नाही. हस्तांत पेरणी व्हावयाची हा नियम जसा काय सृष्टयुत्पत्तीपासून चालत आला आहे असें लोकांस वाटते. निरयनमान असेंच राहिले तर काही कालाने उत्तरांत पेरणी करावी लागेल. परंतु हा फेरफार इतका मंद गतीने होणारा आहे की एका मनुष्याच्या आयुष्यांत किंबहुना तीन चार पिढ्यांतही तो समजुतीस येणारा नसल्यामुळे तो अगदी न समजतां साहजिक होत जाईल. याप्रमाणे बहुतेक व्यवहारांस सायन नसले तरी नड येणार नाही.