पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/432

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अर्थाचें पुष्टीकरण आहे*. वर्षारंभाचे निरनिराळे मास मागें (पृ. ३८४-८६) सांगितले त्यांत वर्षारं भ एकेक महिना मागे आणण्याची परंपरा नाही हे तेथेच दाखविले आहे. सारांश निरयन मा नानें वरिंभ एकेक महिना मागे घेण्याची परंपरा नाही आ-- नो धर्मशास्त्रसंमत नाही. णि तसे करणे धर्मशास्त्रास मान्य नाही. वर्षारंभ एकेक महिना मागे आणणे, चैत्रांतलीं धर्मकत्ये फाल्गुनांत करणे, झणजे धर्मशास्त्रच फिरविणे होय. हे मत वर्तमानपत्रांत आहे तोपर्यंतालाकमान्य नाही. त ठीक आहे. शास्त्री लोकांत व सामान्य लोकांत ते किती. उपहासास्पद होईल याची कल्पनाही त्याच्या उत्पादकांस व त्यांच्या अनुयायांस झाली नाही असे दिसते. संपाताचे पूर्ण भ्रमण मानिलें तर ऋतु श्रुतिसंमत होत नाहीत, ह्मणून मुंजालाचें तें मत हे नास्तिकमत, यवनमत, असें मरीचिटीकाकार मुनीश्वर याने मटले आहे (पृ. ३३२). क्रतुमासविपर्यासाचे शाब्दिक कारणही त्याला विपरीत वाटले. मग त्याच्यासारख्या धर्मशास्त्यांस चैत्रांतली कमें फाल्गुनांत प्रत्यक्ष करणे कसें खपेल ! निरयनमीनारंभी संपात येईल तेव्हांपासून मीनारंभी वर्षारंभ करूं लागले तरी, संपात नेहमी चलच आहे, तेव्हां तो नेहमी निरयनया मागनिहीं *तूस मीनारंभी असावयाचा नाहींच, मागे मागे जाणारच. आणि चूक पडणारच. कुंभारंभी येईपर्यंत चूक राहणारच. तो तेथे आल्यावर कुंभारंभी वर्षारंभ करूं लागलों तरी पुनः चूक पडणारच. सारांश या पद्धतीनेही नेहमी ऋतूंस ३० दिवसांपर्यंत चूक राहणारच. पूर्वोक्त मार्ग स्वीकारण्यास दुसरी मोठी अडचण आहे आणि ती अनिवार्य आहे. कांहीं धर्मशास्त्रोक्त कृत्यांचा संबंध ऋतुमासतिथि यांशी आहे. अनिवार्य अडचण. • ती कदाचित् एकेक महिना मागे आणितां येतील. परंतु कांहींचा संबंध ऋतु, मास, तिथि आणि नक्षत्रे यांशी आहे. उदाहरणार्थ, विजयादशमी शरहतूंत आश्विन शुक्ल दशमीस व्हावयाची. तिला श्रवणांचा योग इष्ट आहे. भाद्रपदांत तो शुक्ल दशमीस असंभवनीय आहे; त्या महिन्यांत शुक्ल द्वादशीस तो येतो, आणि श्रावणांत शुक्ल चतुर्दशीस येतो. विजयादशमी भाद्रपदांत दशमीस करणे तर श्रवण सांपडणार नाही. श्रवणावर द्वादशीस केली तर दशमी नाही. (मग तिला दसरा न ह्मणतां बारस ह्मणावें लागेल.) कालांतराने ती श्रावणांत आणावी लागेल, तेव्हां श्रवणांवर चतुर्दशीस किंवा दशमीस ज्येष्ठांवर केली पाहिजे! "प्रो. टिळकांचे पुस्तक प्रसिद्ध होण्यापूर्वीच, झणजे इ. स. १८८७ मध्ये हे पुस्तक प्रथम लिहिले, तेव्हांच, संवत्सरसत्रानुवाकांतील संवत्सरारंभवाक्यांचा विचार मी केला होता व त्यांची व्यवस्था आणि संगात एथे व पृ. १३५।६ मध्ये लाविली आहे तशीच तेव्हां लाविली होती. टिळकांच्या पुस्तकावर प्रो. थीबो ह्यांचा अभिप्राय इ. स. १८९५ च्या Indian Antiquary मासिक पुस्तकांत आला आहे, त्यांत त्यांणीही ह्या वाक्यांचा अर्थ माझ्याप्रमाणेच लाविला आहे. केरोपंतांच्या आधारभूत वाक्याचा विचार यांत आलाच.