पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/431

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४३४) होत असे, तरी त्यामुळे त्या पद्धतीस बाध आला नाही. परंतु पुढें मेषादि संज्ञा प्रचारांत आल्या तेव्हां चैत्रांत मेषसंक्रमण होत असे, आणि चैत्रांत संवत्सरारंभ होनाच, ह्मणून महिन्यांस नांवें देण्याची “मेषादिस्थे सवितरि ०" ही (पृ. ३९०) परिभाषा ज्योतिष्यांनी ठरविली. वेदांगज्योतिषकाली ही परिभाषाच नव्हती यामुळे ज्योतिष्यांनी स्वीकारलेली परिभाषा धर्मशास्त्रकारांनीही मान्य केली. यामुळे अर्थान्च पौषांत मकरसंक्रमण आले. आणि माघांतला उदगयनारंभ त्या वेळी पौषांत साहजिक आला होता. यामुळे पोषांत उदगयन आणि मकरसंक्रमण हा संकेत कायम होऊन तो धर्मशास्त्रकारांस मान्य झाला. वेदांगज्योतिषपद्धति निजरूपाने फार वर्षे सर्वत्र प्रचारांत असण्याचा संभव नाहीं असें वेदांगज्योतिषविचारांत दाखविलेंच आहे. तेव्हां अर्थात् माघांत उदगयन ही परिभाषा सार्वत्रिक दीर्घकाल प्रचारांत नसल्यामुळे ती टाकून पोषांत उदगयन सर्वकाल मानण्याचा संकेत निश्चित करणे हे असुकर नव्हते. आता मात्र ती परिभाषा फिरणें नाहीं. रणजे मार्गशीर्षांत उदगयन हल्ली कधीं कधीं होतें, तरी तें धर्मशास्त्रास माहितच नाही, अर्थात् मान्यही नाही. सूर्यसिद्धांनास ती गोष्ट मान्य नाहीं असें त्यांतले श्लोक वर (पृ.४१९) दिले आहेत त्यांवरून सिद्ध होते. ज्योतिषास में मान्य नाहीं तें धर्मशास्त्रासही नाही. सारांश मार्गशीर्षांत उदगयन सांप्रत कधी कधी होते, तरी धर्मशास्त्राने ते मान्य केलेले नाही; आणि वर्षारंभ दोन दोन हजार वर्षांनी एकेक महिना मागे घेण्याची परंपरा धमशास्त्रांत चालत आलेली नाही. धर्मशास्त्राच्या कोणत्याही ग्रंथांत या दोहोंपैकी एकही गोष्ट सांपडावयाची नाही. । संवत्सरसत्राच्या अनुवाकांत चित्रापूर्णमास, फल्गुनीपूर्णमास आणि एकाटका (माघ कृष्ण ८) यांवर संवत्सरसत्रारंभ करण्याचा विचार आहे. यावरून त्या त्या दिवशी उदयनारंभ आणि वर्षारंभ कालांतरानें क्रमाने होत आला नसला, तरी वसंतारंभ आणि वर्षारंभ होत आला असावा, आणि यावरून वर्षारंभ उत्तरोत्तर एकेक महिना मागे आणण्याची परंपरा दिसून येते, असे कोणी ह्मणेल, नर तेंही संभवनीय नाही. कारण संवत्सरसत्राचा अनुवाक तैत्तिरीय संहिता आणि नांड्यब्राह्मण यांत आहे. या दोहोंचा काल शकापूर्वी २००० किंवा फार तर १५०० याहुन अर्वाचीन नाही. व हे टिळकांसही कबूल असलेच पाहिजे. तेव्हां त्या काली माघांत वसंतारंभाचा संभवच नाही. (पृ. १३१।१३२ पहा ). अर्थात् एकाटका हा संवत्सरारंभ दुस-या काही कारणाने उत्पन्न झाला असावा आणि तो गौण असावा हे मागे सांगितलेच आहे (पृ. ३८६). आतां चित्रापूर्णमास आणि फल्गुनीपूर्णमास राहिले. कोणतेही सूर्यसंक्रमण चांद्रमासाच्या संबंधे २९ दिवस मागे पुढे होते हे प्रसिद्ध आहे. मेषसंक्रमण चैत्र शुद्ध १ पासून चैत्र कृष्ण ३० पर्यंत केव्हाही होते. अर्थात् कोणत्याही ऋतूच्या आरंभांत असाच फरक पडतो. तेव्हां वसंतारंभ एकाच काळांत एकादे वर्षी फाल्गुनी पूर्णिमेस आणि एकादे वर्षी चैत्री पूर्णिमेस होऊ शकेल. आणि पूर्णिमान्त मानाने मासान्त पूर्णिमेला होतो. तेव्हां ज्या कालीं वर्षारंभाचे नियम सुक्ष्म ठरले नव्हते त्या काली या दोन्ही तिथींवर वसंतांत वर्षारंभ करण्याचें मनांत येणे साहजिक आहे. सायणाचार्यांनी या अनुवाकाचा अर्थ ह्याच धोरणाने लाविला आहे. माधवकृत कालनिर्णयांत ह्याच