पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/430

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४३५) कृष्णशाखी गोडबोले यांचे हे मत होते व हल्ली प्रो० टिळक व वेंकटेश बापूजी केतकर यांचे आहे.* सकदर्शनी हा मार्ग बरा वाटतो. परंतु तो ग्राह्य नाही. हा मार्ग स्वीकारण्यास परंपरेचा आधार आहे असेंही या मंडळीपैकी काहींचे ह्मणणे तो परंपरागत नाही. • आहे. उत्तरायन निरयन फाल्गुन, माघ, पौष, मार्गशीर्ष, या महिन्यांत ह्मणजे उत्तरोत्तर मागे आणीत आले आहेत, आणि वर्षारंभ उदगयनारंभी करावा असें वेदांत आहे, असे ते ह्मणतात. याबद्दल केरोपंतांची भिस्त "या वैषा० " या (पृ. ३९ ) सारख्यायन ब्राह्मणवाक्यावर होती. टिळकांनी संवत्सरसवाच्या अनुवाकावरून (पृ. ३८ ) उदगयनारंभमासांच्या वरच्या मालिकेस आणखी चैत्र जोडिला आहे. छत्रे आणि टिळक यांनी आधारास घेतलेल्या वेदवाक्यांत उदगयनाचा संबंध मुळीच नाहीं हे मी मागें (पृ. १३५) दाखविलेंच आहे. वेदांत दुसरे कोठेही उदगयनारंभी वर्षारंभ आला नाही. हे मीच ह्मणतों असें नाही. सायणाचार्यांनीही या वाक्याचा अर्थ उदगयनपर लाविला नाही. तसेच माधवाचार्यांनींहीं कालमाधव ग्रंथांत संवत्सरारंभाचा निर्णय अनेक वेदवाक्यांवरून केला आहे, त्यांत वसंतारंभी चैत्रांत वर्षारंभ असा निर्णय केला आहे. उदगयनारंभी वर्षारंभ असें एकही वाक्य त्यांस वेदांत आढळले नाहीं; इतकेच नाही, तर वर्षारंभ चैत्रांत, फाल्गुनांत, माघांत, असा मार्गे मार्ग येत आहे असाही निर्णय त्यांणी केला नाही. वेदांगज्योतिषांत माघांत उदगनयन आहे ही गोष्ट खरी. महाभारतांतही ती पद्धति एक दोन स्थली आढळते. वेदांगाहून इतर सर्व ज्योतिषग्रंथांत पौषांत उदगयन आहे. परंतु यावरून उदगयनारंभ मासाचें नांव माघ, पौष असें कमाने मार्ग आणण्याची परंपरा सिद्ध होत नाही. वेदांगज्योतिषांतले माघांतले उदगयन पौषांत कसे आले हे सांगतो. चैत्रादि संज्ञा प्रचारांत आल्या तेव्हां चैत्रांत वसंत होत होता. ह्मणून मधुमाधव हे वसंताचे मास ही वेदकाळची पद्धतिच त्यांस लागू करून चैत्रवैशाख हे वसंताचे मास आणि मधुमासाप्रमाणे चैत्र हा संवत्सरारंभ ही पद्धति धर्मशास्त्रकारांनी स्वीकारिली. वेदांगज्योतिष काली माघांत उदगयन केरोपंतांचे मत ता० ७ आक्टोबर व ४ नोव्हेंबर १८८३ च्या अरुणोदय वर्तमानपत्रांत आले होते. केतकरांचें त्याच पत्रांत इ. स. १८८४ च्या सुमारे आले होते. टिळकांचे Orion या पुस्तकांत व मुख्यतः इ. स. १८९३ च्या केसरींतील लेखांत आले आहे. गोडबोले यांचे मत समक्ष माझ्याशी बोलण्यांत आले होते. बापूदेव यांचे मत असे नव्हते. त्यांचे मत मागें दिलंच आहे (पु. ४२०). +मासांस नांवें निरयन मानाने दिली ह्मणजे उदगयन उत्तरोत्तर माघ, पौष, मार्गशीर्ष यांत असें क्रमाने मागें यावयाचेच; परंतु उदगयनमासास फाल्गुन, माघ, पौष अशी नांवें देण्याची परंपरा चालत आली आहे की काय, ह्मणजे माससंज्ञा निरयन मानाने देउन दर दोन हजार वर्षांनी वर्षारंभ एकेक महिना मागे घेण्याची परंपरा आहे काय, हे पहावयाचे आहे. आणि तशी परंपरा नाही, असें मी सिद्ध करीत आहे.