पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/429

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३९) आमच्या देशांतही मुंजालादिकांचे तसेंच मत आहे. शतपथब्राह्मणांतले कत्तिकांच्या स्थितीचे वाक्य मार्ग. (पृ. १२७) दिले आहे, त्यावरून ती स्थिति शकापूर्वी सुमारे ३१०० वर्षे या काली होती. तेव्हापासून आजपर्यंत ह्मणजे सुमारे ४९०० वर्षांत संपाताची गति ६८ अंश झणजे आंदोलनाने होणाऱ्या ५४ अंशांहून जास्त झाली आहे. तेव्हां आंदोलन होत नाहीं, पूर्णभ्रमण होते, असें आमच्याच ग्रंथांतल्या या प्रमाणांवरूनही सिद्ध होते. तेव्हां ज्योतिःशास्त्राच्या ह्या निर्णयास अनुसरून कतुमाससाहचर्य ज्या पद्धतीने साधते ती सायनपद्धतिच धर्मशास्त्राने मान्य केली पाहिजे, आणि ज्योतिःशास्त्राने त्या पद्धतीनेच पंचांग केले पाहिजे. चालू निरयनमानाने काही कालाने धर्मशास्त्रोक्त कर्मे भलत्याच ऋतूंत करावी वर्षारंभ एकेक म- लागतील, ही अडचण निरयनमान चालू ठेवूनही दूर व्हावी ह्महिना माग आणण्या- णून कोणी निराळा एक मार्ग सुचवितात. तो असाःचा मार्ग. वर्षमान सायन न घेतां शुद्ध निरयन घ्यावें; नक्षत्रे, राशि आणि संक्रांति ही निरयनच असावी. निरयन मेषसंक्रमण ज्या चांद्रमासांत होईल तो चैत्र, ही सांप्रतची पद्धति कायम ठेवावी. परंतु अयनांश ३० होऊन संपात निरयनमीनारंभी जाईल तेव्हांपासून वर्षारंभ निरयनमीनारंभी निरयन फाल्गुनांत करूं लागून आणि मधुमाधव ही नांवें ऋतूंसंबंचे आहेत ती हल्ली चैत्रापासून लागू करितों ती फाल्गुनापासून लागू करून चैत्रांतली धर्मकत्ये फाल्गुनांत, वैशाखांतली चैत्रांत, अशी सर्व मागें आणावी. कालांतराने माघारंभी वसंतारंभ होऊ लागला ह्मणजे चैत्रांत वसंतांत करावयाची कृत्ये माघांत करावी. येणेकरून चैत्रांत वसंतांत करावयाची कृत्ये फाल्गुनांत, मावांत, अशी परंतु वसंतांत होतील. तारात्मक रेवती, उत्तराभाद्रपदा, इत्या दि नक्षत्रांच्या स्थानांस अश्विनी मणण्याचे कारण पडणार नाही. केरोपंत छवे व (मागील पृष्ठावरून समाप्त.) लंब न राहता त्याचे वरचे टोंक घिरट्या घालू लागते. अशीच पृथ्वीच्या आंसाची टोंक ह्मणजे ध्रुवकक्षेच्या पातळीवरील लंबाच्या टोकांभोवती ह्मणजे क्रांतिवृत्ताच्या कदंबाभोंवती सर्वकाळ घिरट्या घालतात. पृथ्वी आपल्या आंसाभोवती फिरते तेव्हां तिचा आंस तिच्या कक्षेच्या पातळीवर लंब नसतो. तिचा आंसाभोवती फिरण्याचा वेग एकसारखा असतो; कमजास्त होत नाहीं झटले तरी चालेल. यामुळे ती पूर्ण गोल असती तर आंसाच्या टोकांचा कल एकसारखा राहता. परंतु पृथ्वी ध्रुवांकडे चापट आणि विषुववृत्ताकडे फुगीर आहे. यामुळे सूर्यचंद्रांचे तिजवर आकर्षण विषुवाकडे जास्त पडून ते वृत्त कक्षेच्या पातळीशी मिळून जाउं पाहते. परंतु अक्षभ्रमण एकसारखें चालले असते, यामुळे दोहोंच्या पातळ्या एक होण्याचा ह्मणजे आंस कक्षेवर लंब होण्याचा संभव नाही. मात्र पृथ्वीचा आंस क्रांतिवृत्ताच्या अक्षाभोंवती घिरट्या घालीत असतो. यामुळे विषुववृत्ताचे ध्रुव क्रांतिवृत्ताच्या प्रवाभोवती फिरतात; आणि विषुववृत्त क्रांतिवृत्तावर सरकते. हेच अयनचलन होय. चंद्रसूर्यांचे आकर्षण पृथ्वीच्या विषुववृत्तावर जास्त आहे ही गोष्ट सूक्ष्मपणे प्रत्ययास येते. चंद्रकक्षेचे पात १८॥ वर्षांत एक प्रदक्षिणा करितात. यामुळे चंद्र तितक्या काळांत विषुववृत्तापासून कधी २८ अंश व कधी १८ अंश उत्तरेस जातो. यामुळे त्याचप्रमाणे त्याचे विषुववृत्ताच्या फुगीर भागावर आकर्षण कमजास्त होऊन ध्रुवाच्या भ्रमणांत फरक पडतो. तो दर १८॥ वषांनी पुनः पुनः तसाच पडतो. असो. पृथ्वीचा मध्यभाग ध्रुवापेक्षा फुगीर आहे ही स्थिति केव्हाही, निदान लाखों वर्षे, बदलण्याचा संभव नाही. अर्थात् संपाताचे पूर्ण भ्रमण व्हावयाचेंच.