पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/428

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१३) एथपर्यंत सायन निरयनांचा विचार केला तो संपाताची पूर्ण प्रदक्षिणा होते असें संपाताचें पूर्ण भ्रमण. मानून केला. धर्मशास्त्राप्रमाणे पंचांग व्हावें याकरितांच मुख्यतः पंचांगशोधनाचा विचार करावयाचा. संपाताची पूर्ण प्रदक्षिणा होत नाही, आंदोलन होते, असें आमच्या कांहीं ज्योतिषग्रंथांत आहे, ते खरे असेल तर निरयनानेही ऋतुमासविपर्यय होत नाहीं, चैत्रांत वसंत सर्वकाळ राहील, असे कोणी ह्मणेल, तर त्याविषयी विचार करूं. संपाताची पूर्ण प्रदक्षिणा होते की नाही याचा निर्णय करणे हा धर्मशास्त्राचा विषय नव्हे. अमुक काली मणजे अमुक ऋतुमासतिथिनक्षत्रादिकी अमुक कमें करावी किंवा न करावी एवढे सांगणे हा धर्मशास्त्राचा विषय होय आणि तो तो काल कोणता ह्याचा निश्चय करणे हा ज्योतिषशास्त्राचा विषय होय. अमुक मासांत अमुक ऋतु असतां अमुक कर्मे करावी असें धर्मशास्त्र सांगेल तर तमें ऋतुमाससाहचर्य ज्या पद्धतीने येईल अशी कालगणनापद्धति स्थापिणे हा ज्योतिषाचा विषय होय. ज्योतिषशास्त्र हे प्रत्यक्षप्रमाणक आहे. कालांतरानें ग्रहगतिस्थितीमध्ये अंतर पडतें म्हणून ज्या वेळी ज्या गतिस्थिति अनुभवास येतील त्या घ्याव्या ही ज्योतिःशास्त्राची रीतिच आहे. सांप्रतच्या सूर्यसिद्धांतांत ग्रहगतिस्थिति पूर्वीच्यांहून कांहीं निराळ्या आहेत. तथापि कालभेदामुळे ग्रहगतींत फरक पडला तितका केला, शास्त्र प्राचीन आहे तेच आहे, अशा अर्थी त्यांत मटले आहे:-- शास्त्रमाद्य तदेवेदं यत्पूर्व प्राह भास्करः । युगानां परिवर्तन कालभेदोऽत्र केवलं ॥९॥ मध्यमाधिकार. या वरील टीकेंत टीकाकार रंगनाथ ह्मणतोः कालवशेन ग्रहचारे किंचिद्वैलक्षण्यं भवतीति तत्तदंतरं ग्रहचारे प्रसाध्य तत्तत्काल स्थितलो. कव्यवहारार्थ शास्त्रांतरमिव कृपालुः [भास्करः] उक्तवान् ।। भास्कराचार्य ह्मणतो:अत्र गणितस्कंधे उपपत्तिमानेवागमः प्रमाणं ॥ गोलबंधाधिकार. केशवही अशाच अर्थाचें म्हणतों (पृ. २५९ पहा ). यस्मिन् देशे यत्र काले येन दृग्गणितैक्यकं ॥ दृश्यते तेन पक्षण कुर्यात् तिथ्यादिनिर्णयं ।। या वसिष्ठसंहितेतील प्रसिद्ध वाक्यांतही “ज्यायोगें गणिताप्रमाणे दृष्टीस पडेल नो पक्ष घ्यावा" असें सांगितले आहे. संपाताची पूर्ण प्रदक्षिणा होते असें सांप्रत पाश्चात्य गणकांनी विश्वरचनेच्या नियमांवरून निश्चयात्मक सिद्ध केले आहे.

  • ज्योतिःशास्त्राच्या मुहूर्तस्कंधांत अमुक काली अमुक कर्मे करावी असे सांगितलेलें असतें. यासंबंधे पाहिले तर मुहूर्तस्कंध हे एक धर्मशास्त्राचे अंग होय.

संपातभ्रमणाचे स्वरूप थोडक्यांत सांगतो. मुलें भोंवरा जमिनीवर फिरवितात तो लक्षांत आणावा. प्रथम तो मोठ्या वेगाने अगदीं उभा, झणजे त्याच्या दोन्ही टोकांतून जाणारा त्याचा आंस जमिनीवर लंब असेल असा, फिरत असतो. त्याचा वेग कमी होऊ लागला हाणजे त्याचा वरचा भाग जड असल्यामुळे तो डोलूं लागतो. झणजे त्याचा अक्ष जमिनीवर (पुढे चालू)