पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/427

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साधावयाची नाहीत. तथापि मधुमाधवांत झणजे चैत्रवैशाखांत सर्वकाळ वसंत ऋतुच होणे ही श्रुतिसंमत गोष्ट निरयनमानाने साधणे अशक्य आहे. अमुक नक्षत्रावर अमुक कर्मे करावी असें धर्मशास्त्रांत सांगितलेले असते. ती नक्षत्रे तारात्मक होत असें कोणी ह्मणेल तर तसें सांप्रत बहुधा कोणाच्या गांवीही नाही. सांप्रत ती केवळ रूढ झाली आहेत. उक्त कमास सांगितलेले नक्षत्र इष्टकाली पंचांगांत असले झणजे झालें, आकाशांत कोणते का असेना, अशीच बहुधा स्थिति आहे. ती आजच आहे असें नाहीं. नक्षत्रे सारख्या अंतरावर नाहीत यामुळे ती अनिवार्य आहे. सूक्ष्मनक्षत्रानयन निराळं सांगितले आहे, (पृ. ३९९) पण सांप्रत ते कोणी करीत नाही.* केले तरी अथवा कितीही सूक्ष्म निरयनमान घेतले तरी सर्वांशी ती गोष्ट साध्य नाही. शिवाय गणितांत चुकी असते यामुळे ती साधत नाहीं हें निराळंच. साधेल असें मानिले तरी अमुक ऋतूवर अमुक कर्मे करावी अशी धर्मशास्त्राची विधानें निरयनमानाने साध्य नाहीत. मधुमाधवांत ह्मणजे चैत्रवैशाखांत वसंत असावा ही श्रुतिसंमत गोष्ट आणि तद नुसार अमुक ऋतूंत अमुक मासांत अमुक कर्मे करावी अशा प्रमाणांची तुलना. ना. धर्मशास्त्राच्या आज्ञा निरयनमानाने साध्य नाहीत. चैत्रांद पावसाळा येणे अशी (ह्मणजे निरयन ) ज्योतिषपद्धति असली तर चालेल काय ! असा प्रश्न केला असतां'चालेल, असे उत्तर देणारा शतांत एकही निघणार नाही. आणि निरयनमानानेही नक्षत्रे चुकतात. ही चार प्रमाणे सायनपद्धतीस अनुकूल आहेत तर त्यांवर निरयनपक्षाकडून अशी चार प्रमाणे येतील की तारात्मक नक्षत्रेही श्रुतिसंमत आहेत, व तदनुसार अमुक नक्षत्री अमुक कर्म करावे अशा धर्मशास्त्राच्या आज्ञा आहेत त्या सायनमानाने साधत नाहींत. तारात्मक रेवती, उत्तराभाद्रपदा, इत्यादि कोणत्याही नक्षत्रास क्रमाक्रमाने सायनपद्धतीने आश्विनी ह्मणावे लागेल, ते योग्य आहे असे कोणीही कबूल करणार नाहीं; आणि सायनमानानें चैत्रांत सर्वकाळ वसंत असेल हे सामान्यतः खरें, तरी ऋतुप्रवृत्ति कधी कधी दहापांच दिवस मागे पुढे होते, आणि चांद्रमासांवर ऋतु मानतात त्यांत ऋत्वारंभांन एक महिन्याचाही फरक पडतो. ह्या निरयन पक्षाच्या कोट्या कबूल केल्या तरी दोन्ही पक्षांच्या कोट्यांची वजावाट होऊन सायनपद्धतीचे ग्राह्यत्व स्थापित करणारी तार्किक विचाराच्या आरंभी (पृ. ४१८) सांगितलेली दोन प्रमाणे शिलक राहतात. ती ही की वर्ष हे मान नि. सर्गतःच ऋतुपर्ययात्मक आहे, आणि अधिकमास धरण्याचा हेतु अमुक चांद्रमासांत अमुकच ऋतु सर्वदा असावा याहून दुसरा नाही. आणि ह्या दोन्ही गोष्टी सायनमानाने मात्र साध्य आहेत. ही दोन प्रमाणे निरुत्तर आहेत. तसेंच ऐतिहासिक दृष्टया पाहिले तर आरंभापासून शकापूर्वी २००० या कालापर्यंत सायन वर्षसिद्धांत. च प्रचारांत होते. यावरून सायनपद्धतिच ग्राह्य होय असा सिद्धांत होतो.

  • त्याप्रमाणे नक्षत्र आणून त्यावर पैठणच्या एका जोश्याने काही वर्षांपूर्वी एक विवाह ला. दिला. परंतु उलटें त्यास तेथल्या व पुण्याच्या मंडळीनं बहिष्कृत केले होते असें पुण्यांतले एक ज्योतिषी वासुदेवशासी देडगांवकर यांणी नुकतेंच मला सांगितलें.