पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/426

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नक्षत्रांविषयीं पाहतां आमच्या ज्योति सिद्धांतांचे निरयनमान चालू राहिले तर कतु चुकून शिवाय नक्षत्रांची व्यवस्था सायनाप्रमाणेच, मात्र सायनाच्या उलट कमानें, आणि त्याहून मंदगतीने, होणार.* अर्थात् महिन्यांचीही तीच अवस्था होणार. सूक्ष्मनिरयनमान घेतले तरी नक्षत्रांत व मासांत चूक होईल. ती नेहमी एकसारखी राहील हे खरें, तरी राहणारच. तेव्हां ऋतु आणि तारात्मक नक्षत्रे यांपैकी तारात्मक नक्षत्रे सोडावी हे बरे दिसते. ती सोडावयाची ह्मणजे तोडजोड. त्यांवरून चांद्रमासांस नांवे द्यावयाची नाहीत आणि सायन नक्षत्रे निराळी मानून त्यांवर ग्रहस्थिति सांगावयाची, इतकेंच. ग्रहांच्या युति पाहतां येतात व त्यांच्या वेळा काढितां येतात, त्याप्रमाणेच ग्रहनक्षत्रयुतीच्या वेळा काढितां येतात. त्या काढून पंचांगांत देतां येतील. सायनमानानें गणितास अडचण येईल, असे कोणाचे झणणे असल्यास तसा अनुभव नाही. हल्ली युरोपियन ज्योतिःशास्त्रांतले सर्व गणित सायनमानाचे आहे. केरोपंतांचें झणणे आहे की (पृ. ४२० पहा ) “सूर्य, चंद्र, ग्रह, संपात वगैरे सर्व चल आहेत. त्यांचे माप करणें तें स्थिर जो तारागण त्याशीच केले पाहिजे." याप्रमाणे वेधास स्थिरतारा घेणे योग्य व अवश्य आहे. परंतु पंचांगांत सायनमान घेण्यास गणिताची किंवा कोणतीच हरकत नाही. युरोपियन ज्योतिषी वेधास तारांचा उपयोग करितात, परंतु नाटिकल आल्मनाक इत्यादि सर्व पंचांगांचे त्यांचे गणित सायन असते. स्वतः केरोपंतांनी ग्रहसाधनकोष्टकांत ग्रहगतिस्थिति सर्व सायन घेतल्या आहेत व त्या पुस्तकावरून सर्व ग्रह सायनच निघतात. आणखी असें की आमच्या ज्योतिषग्रंथांत जी वेधपद्धति आहे तींत तारांपेक्षां सायनमानाचाच उपयोग जास्त केलेला आहे असें नलिकाबंधाच्या रीतीवरून व वेधप्रकरणी यंत्रांचे वर्णन वगैरे दिले आहे त्यावरून दिसून येईल. रोहिण्यामग्निमादधीत ॥ आणखी शंका न पूर्वयोः फल्गुन्योरग्निमादधीत ॥ समाधानें. पुनर्वस्वोरग्निमादधीत ॥ कृत्तिकाभ्यः स्वाहा ॥.. रोहिण्यै स्वाहा ।।...स्वाहा पुनर्वसुभ्यां ।। रेवत्यामरवंत ॥ अश्वयुजोरयंजत ॥ अपभरणीष्वपावहन् । या । वाक्यांत एकवचनीं, द्विवचनी आणि बहुवचनी प्रयोग आहेत. यावरून ही नक्षत्रे तारात्मक होत हे स्पष्ट आहे. अर्थात् सायन नक्षत्रांस ही वाक्ये लागणार नाहीत. ह्मणजे तारात्मक नक्षत्रे श्रुतिसंमत आहेत आणि सायनमानानें अशी नक्षत्रे

  • सायनमानाने सायन अश्विनी नक्षत्र तारात्मक रेवतीत, उत्तराभाद्रपदांत, असें हजार वबर्षांनी एकेक नक्षत्र मागे येणार. आणि सूर्यसिद्धांतादिकांच्या मानाने अश्विनी नक्षत्र भरणीत, कृत्तिकांत, अशा क्रमाने सुमारे दर ६ हजार वर्षांनी एकेक नक्षत्र असें पुढे जाणार.

+ निरयनमानाने ग्रहण येते त्या दिवशी सायन गणिताने ग्रहणच येत नाही असे दाखविण्याचा यत्न पीयूषधाराटीकाकाराने केला आहे, परंतु सायनपद्धतीची योजना त्याने नीट केली असती तर त्यास संशय न येता. (पृ. २७६ पहा) + यांतील बहुतेक वाक्ये पहिल्या भागांत आली आहेत. काहीं तैत्तिरीय श्रुतीतून आणखी घेतली आहेत.