पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/421

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सायनान (४२४ ) आतां व्यावहारिकदृष्टया विचार करण्यापूर्वी सायन पद्धतीवर येणान्या आक्षेपांचा . विचार करू. संपाती नेहमी एकच तारा नसते. दृश्य तारांच्या शंकासमाधानें. संबंधे संपात मागे मागे जात आहे. आणि सायनवर्ष घेतले ह्मणजे संपातस्थानी प्रत्यक्ष कोणत्याही तारा येऊ शकतील. काही वर्षांमागें वसंतसंपाती रेवतीतारा होती, सांप्रत उत्तराभाद्रपदातारांजवळ संपात आहे. कालांतराने तो पूर्वाभाद्रपदात येईल. याप्रमाणे मागे मागे येईल. पूर्वाभाद्रपदांत संपात असतां त्या नक्षत्राच्या प्रदेशास आश्विनी ह्मणावे लागेल. पूर्वीफल्गुनीस सायन चित्रा ह्मणावें लागेल. आणि याप्रमाणे हल्ली सायन पंचांगांकतील. " त होतही आहे. त्यांत ताराचंद्रयुति असतात त्या पाहिल्या असतां चंद्राची युति उत्तराफल्गुनींशी असतां दिननक्षत्र ( चंद्रनक्षत्र ) चित्रा असते. याप्रमाणे ग्रह एका तारात्मक नक्षत्राजवळ जवळ असतां दुसऱ्याच नक्षत्री आहे असे म्हणावे लागेल. व याप्रमाणे तारात्मक (दृश्य) नक्षत्रे चुकतील. नक्षत्रांची नांवें मूळ स्थापित झाली ती तारांवरून झाली, अमुक स्थानास अमुक नक्षत्र ह्मणावें, मग तेथे तारा कोणतीही असो, अशा रीतीने नांवें पडली नाहीत, असें मृगशीर्ष, हस्त इत्यादि संज्ञांवरून दिसते. तसेच वेदांत नक्षत्रसंज्ञा कांहीं एकवचनी, कांहीं द्विवचनी आणि कांहीं बहुवचनी आहेत, असें पहिल्या भागांत सांगितलेच आहे. (पृ.४५). यावरून नक्षत्रसंज्ञा प्रथम तारांवरून पडल्या हे उघड आहे. परंतु सायन वर्षमान घेतले झणजे तारात्मक नक्षत्रे साधणार नाहीत. तसेच चैत्रादि संज्ञा मूळच्या तारात्मक नक्षत्रावरून पडल्या आहेत. परंतु सायनमान घे र तलें म्हणजे पूर्वाभाद्रपदांत संपात असेल तेव्हां पूर्वाभाद्रपदा चैत्रादिसंज्ञा अन्वर्थ होणार नाहीत. तारांजवळ सूर्य असतां त्या नक्षत्रास सायन अश्विनी हे नांव मिळणार आणि तेव्हां चंद्र तेथून १३३ नक्षत्रांवर म्हणजे सुमारे तारात्मक पूर्वफल्गुनींवर पूर्ण होईल, तरी त्या नक्षत्रास सायनचित्रा नांव मिळाल्यामुळे आणि त्या चांद्रमासांत सायन मेषसंक्रमण झाल्यामुळे त्या चांद्रमासास चैत्र हे नांव मिळेल. ह्मणजे तारात्मक नक्षत्रसंबंधे त्यास फाल्गुन हे अन्वर्थक नांव मिळावयाचे असतां त्यास चैत्र ह्मणावे लागेल. याप्रमाणे केवळ नाक्षत्र (निरयन) दृष्टीने पाहिले असतां महिनेही चुकतात. सायनमान स्वीकारिलें असतां ऋतु साधतील. ह्मणजे चैत्र वैशाख या महिन्यांत नेहमी वसंतकतु येईल; परंतु तारात्मक नक्षत्रे चुकतील. संपाती कोणतेही तारात्मक नक्षत्र असले तरी त्यास अश्विनी मणावे लागेल.*आणि चैत्र इत्यादि संज्ञा मूळच्या यौगिक असून त्या केवळ पारिभाषिक आणि रूढ मानाव्या लागून नक्षत्रप्रयुक्त फाल्गुन, माघ इत्यादिकांस उत्तरोत्तर चैत्र ह्मणावे लागेल. चैत्रादि संज्ञा टाकून देऊन ऋतुदर्शक मध्वादि संज्ञा मात्र ठेविल्या तर शब्ददोष जाईल. परंतु चैत्रादि संज्ञा इतक्या बद्धमूल झाल्या आहेत की त्या आतां सुटणे कठिण. आणखी असें की मासांस कतुदर्शक संज्ञा मध्वादि आहेत, तशा नक्षत्रांस निराळ्या नाहीत. मेषादि संज्ञा मूळच्या विभागात्मकच आहेत. नसल्या तरी आमच्या ग्रंथांत त्या २००० वर्षे तरी

  • सायननिरयन नक्षत्रांचे परमांतर १३३ नक्षत्रं होईल. १२ हजार वर्षांनी चित्रांत संपात असतो त्या नक्षत्रास अश्विनी ह्मणावे लागेल.