पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/420

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४२३) देण्याचे कारण नाही. परंतु धर्मशास्त्रग्रंथांत तशी वचनही प्रमाणास घेतात, ह्मणून कांहीं खाली देतो.* यस्मिन् दिने निरंशः स्यात् संस्कृतोकोयनांशकैः ॥ तद्दिनं च महापुण्यं रहस्य मुनिभिः स्मृतं ॥ ज्योतिर्निबंधे वसिष्ठः यांत विषुवदिवसाचे पुण्यत्व सांगितले आहे. अयनांशसंस्कृतो भानु गोले चरति सर्वदा ॥ अमुख्या राशिसंक्रांतिस्तुल्यः कालविधिस्तयोः ॥ स्नानदानजपथाव्रतहोमादिकर्मभिः ॥ सुकृतं चलसंक्रांतावक्षयं पुरुषोऽश्रुते ॥ पुलस्त्य. चलसंस्कृततीग्मांशोः संक्रमो यः स संक्रमः ॥ अजागलस्तन इव राशिसंक्रांतिरुच्यते ॥ पुण्यदां राशिसंक्रांति केचिदाहर्मनीषिणः ॥ नैतन्मम मतं यस्मान स्पृशेत्क्रांतिकक्षया ।। वसिष्ठ. सस्कृतायनभागार्कसंक्रांतिस्त्वयनं किल । स्नानदानादिषु श्रेष्ठा मध्यमः स्थानसंक्रमः॥ सोमसिद्धांत. अयनांशसंस्कृतार्कस्य मुख्या संत्रांतिरुच्यते । अमुख्या राशिसंक्रांतिस्तुल्यः कालावधिस्तयोः॥४॥ रोमशसिद्धांत, स्पष्टाधिकार. चलसंस्कृततिग्मांशोः संक्रमो यः स संक्रमः ॥ नान्योन्यत्र च तत्क्षेत्र नैति तत्क्रांतिकक्षया ।। ६२ ॥ शाकल्यसंहिता, तृतीयाध्याय. यांत राशिसंक्रांति मणजे निरयन संक्रांति त्याज्य, चल (सायन ) ग्राह्य, असें कांहीं वाक्यांत आहे. काहींत सायनांपेक्षां राशिसंक्रांति गौण असें सांगितले आहे. यांतील कांहीं वचनें स्तावक होत, असें कांहीं ग्रंथकार ह्मणतात; परंतु विषुवांचे आणि अयनांचे पुण्यत्व पुराणादि पुष्कळ ग्रंथांत असल्यामुळे, विषुवे आणि अयनें ही मेषतुला आणि मकरकर्कग निरयनसंक्रमांपूर्वी होतात, तरी त्यांचा (विषुवायनांचा) धर्मशास्त्रनिबंधकारांस त्याग करितां येईना. ह्मणून निरयनसंक्रांतीचे पुण्यकाल इत्यादि सांगतांना “ एवं अयनेषु ( असेंच अयनांविषयीं)" असे सांगावे लागले आणि कोणी ज्योतिषशास्त्रानभिज्ञ धर्मशास्त्रकारांनी तर मेषादि संक्रांतीप्रमाणे " मेषायनं, वृषायनं" अशी १२ अयनें कल्पिली. काही निरयनपंचांगांतही याप्रमाणे किंवा दुसऱ्या शब्दांनी सायनसंक्रांति देतात असें पूर्वी सांगितलेच आहे (पृ. ४१७) आमच्या इकडील मुंबई पुण्याचे पंचांगकार महाराष्ट्र लोकांस तेवढाही लाभ होऊ देत नाहींत. तथापि सायनसंक्रांतीवरही स्नानदानादि कर्मे उक्त आहेत, हे इकडील चांगल्या धर्मशास्त्रज्ञांस माहित आहे. षण्णवती श्राद्धे झणून वर्षांत ९६ श्राद्धे असतात, त्यांत संक्रांतिश्राद्धे बाराच आहेत, चोवीत नाहीत. त्याप्रमाणे इतर कृत्यांतही कोणत्या तरी बाराच संक्रांति घेतल्या पाहिजेत. सारांश सायनपंचांग श्रुतिसूत्रस्मृतिपुराणविहितकाल दाखविणारे आहे. ह्मणून त्याचाच स्वीकार केला पाहिजे.

  • यांतील बहुतेक वचनें मुहूचिंतामणीच्या पीयूषधाराटीकेंत ( शक १५२५ ) आहेत. + सन १८८४ च्या पुणे वसंतोत्सवांत झालेल्या सायनवादाच्या वेळी प्रख्यात धर्मशास्त्रज्ञ वेदशास्त्रसंपन्न गंगाधरशास्त्री दातार यांनी सायसंक्रांति पंचांगांत असाव्या ही गोष्ट कबूल केली होती.