पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/422

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विभागात्मक झाल्या आहेत. त्या सायन राशींस लावण्यास हरकत नाही. आतां निरयन मान घेतले तर ऋतु चुकतील. चैत्रांत वसंत, ग्रीष्म, इत्यादि ऋतु उत्तरोत्तर निरयनाने ऋतु चु- येत जातील आणि ज्यांत वर्षाकाल आहे अशा चैत्रास मधु कतील. __ह्मणावे लागेल; एवढेच नाही, तर ज्यांचा व्यवहाराशी निकट संबंध अशी मौंजी, विवाह, ही कृत्ये माघ, फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, यांत करावयाची ती करण्यास त्या महिन्यांत पर्जन्यकाळ येऊन अडचण येईल, आणि आषाढादि मास त्या कृत्यांस ऋतूंच्या संबंधे अनुकूल होतील; परंतु धर्मशास्त्राने ते वर्ण्य असल्यामुळे त्या कृत्यांस फार अडचण येईल. तर आतां वाट कशी ला पुढे वाट ? गावी ? ऋतु आणि नक्षत्रे दोन्ही साधतील असा मार्ग पाहूं लागले असतां मति गुंग होते. संपाताचे पूर्ण भ्रमण होते हे जर खरे आहे तर दोन्ही गोष्टी साधणे अशक्य आहे. तेव्हां कांहीं तरी तोड काढणे अवश्य आहे. ऋतु आणि तारात्मकनक्षत्रे यांतून काय सोडले असतां विशेष हरकत नाहीं हें पाहून त्याप्रमाणे ते सोडणे यावांचून गत्यंतर नाही. तर काय सोडले तर चालेल हे पाहूं. तारात्मकनक्षत्रे आपण सांप्रतही सोडीत आहों. ती सर्व सारच्या अंतराने नाहीत. . यामुळे निरयन पंचांगांतही क्रांतिवृत्ताचे सारखे २७ विभाग निरयनानेंही नक्षत्रे चकतात. 1 करून त्या प्रत्येकास नक्षत्र ह्मणणे भाग पडले आहे. त्या २७ विभागांपैकी कोठे एकाच नक्षत्रविभागांत दोन नक्षत्रांच्या योगतारा येतात, कोठे एखाद्यांत मुळीच तारा येत नाही. हीच गोष्ट आंकड्यांनी स्पष्ट करून दाखविण्याकरितां ४२६ पृष्ठांतील कोष्टक दिले आहे. त्यांत विभागात्मक नक्षत्रांचा प्रदेश, सर्व नक्षत्रांच्या योगतारांचे सूक्ष्मनिरयन भोग झणजे रेवती योगतारेपासून त्यांचे वास्तविक अंतर,* आणि ग्रहलाघवाप्रमाणे नक्षत्रांचे ध्रुव, इतकें दिले आहे. आमच्या सिद्धांतांचें आरंभस्थान चल आहे हे मागे सांगितलेच आहे. सूर्यसिद्धांताप्रमाणे जें आरंभस्थान येतें तें शक १७७२ मध्ये संपाताच्या पूर्वेस २० अंश २७ क. ९.८ विकला होते. त्या स्थानापासून किती अंतरावर नक्षत्रयोगतारा त्या वर्षी होत्या हेही ह्या कोटकांत दिले आहे. आणि कोणत्या नक्षत्रयोगतारा आपल्या नक्षत्रविभागांत नसून मागे पुढे आहेत हेही दिले आहे. या कोष्टकावरून दिसून येतें कीं केरोपंती सूक्ष्ममानानें ह्मणजे वास्तव निरयनमानानेही २७ पैकी ९ नक्षत्रे आपापल्या विभागात्मक स्थानाच्या पुढे आहेत, आणि २ मागें आहेत. ह्मणजे ११ नक्षत्रं चुकली आहेत. दिननक्षत्र अश्विनी असतां चंद्राचा समागम कोणत्याच नक्षत्राशी होत नाहीं; आणि चित्रा असतां चंद्राचा समागम हस्त, चित्रा, स्वाती या तीन नक्षत्रांच्या तारांशी होतो. आतां हैं खरें की, वास्तव निरयन वर्षमान आणि वास्तव अ यनगति घेतल्याने नेहमी ही चुकी सारखी राहील, याहून जास्त चुकी होणार नाही. तरी अगदी सूक्ष्म आणि शुद्ध निरयनमान घेऊनही २७ पैकी ११ नक्षत्रे सर्वकाल चुकतात, तर असें निरयनमान काय कामाचें? ग्रहलाघवांत दिलेले नक्षत्रभोग सांप्रत खरे नाहीत. तरी ते खरे मानले तथापि त्यांत ६ न

  • कैरोपंती ग्र. सा. की. पृष्ठ ३२४।३२५ यांत योगतारांचे सायनभोग शके १७७२ चे दिले आहेत त्यांत रेवतीभोग वजा करून ही अंतरें काढिली आहेत. रेवतीभोग केरोपंतांनी १७१४६' दिला आहे. परंतु सूक्ष्म गणित करून पाहतां शक १७७२ मध्ये तो १७४६।४४" येतो. ह्मणून मी १७१४७' धरिला आहे. तसेंच केरोपंतांनी दिलेले अश्विनी, ज्येष्ठा, पूर्वाषाढा, श्रवण, धनिष्ठा यांचे भोग चुकले आहेत; ते मी शुद्ध करून वरील कोष्टकांतले भोग का. ढले आहेत. योगतारा केरोपंतांनी मानलेल्याच घेतल्या आहेत. "