पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/419

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४२२) आश्वयुज्यामाश्वयुजीकर्म ।। १ । आहितानेराग्रयणस्थालीपाकः ॥ ४ ॥ आश्वलायनगृह्यसूत्र, अध्या. २ खंड २. - यांत सूत्रकार आश्विन पूर्णिमेस आग्रयणस्थालीपाक सांगतो. त्यास नवान्न पाहिजे हे प्रसिद्ध आहे. मार्गशीयां प्रत्यवरोहणं चतुर्दश्यां ।। १॥ पौर्णमास्यां वा ॥ २ ॥ ...हेमंतं मनसा ध्यायेत् ॥ ५ ॥ आश्व. गृ. सू.२.३ प्रत्यवरोहण हे मार्गशीर्षांतले कर्म हेमंतदेवताक आहे. यावरून मार्गशीर्षांत हेमंतऋतु असला पाहिजे. अथातोध्यायोपाकरणं ॥ १॥ ओषधीनां प्रादुर्भावे श्रवणेन श्रावणस्य ॥२॥ - आश्व. गृ. सू. ३.५ यांत श्रावणांत ओषधींचा प्रादुर्भाव असतां उपाकर्म करावें असें सांगितले आहे. अर्थात् श्रावणांत वर्षाकाल असला पाहिजे. याप्रमाणेच अमुक मासांत अमुक ऋतु असला पाहिजे, असें दर्शविणारी निरनिराळ्या सूत्रांतील आणखी वाक्यें देतां येतील. आतां अमुक मासांत अमुक ऋतूंत अमुक कर्मे करावी अशी पुराणादिकांतली कांहीं वाक्यें देतो. अशोककलिकाश्चाष्टौ ये पिबंति पनर्वसौ ॥ चैत्रे मासि सितेऽष्टम्यां न ते शोकमवामयः ॥ प्राशनमंत्र:- त्वमशोकवराभीष्टं मधुमाससमुद्भव ॥ लिंगपुराण. यांत वसंतांत उत्पन्न होणाऱ्या अशोककलिकेचे सेवन चैत्रांत सांगितले आहे. अतीते फाल्गुने मासि प्राप्ते चैव महोत्सवे | पुण्यन्हि विप्रकाथेत प्रपादानं समाचरेत् ॥ तसेंच, प्रपा कार्या च वैशाखे देवे देया गलंतिका ॥ उपानद्व्यजनछत्रसूक्ष्मवासांसि चंदनं ॥ १ ॥ जलपात्राणि देयानि तथा पुष्पगृहाणि च ॥ पानकानि विचित्राणि द्राक्षारंभाफलानि च ।।२।। मदनरत्न यावरून चैत्रवैशाखांत उष्णकाल सर्वदा असला पाहिजे. शरत्काले महापूजा क्रियते या च वार्षिकी । आश्विने मासि मेघांते देवीपुराण. यावरून आश्विनांत शरदृतु असला पाहिजे. मेषादौ च तुलादौ च मैत्रेय विषुवस्थितः। तदा तुल्यमहोरात्रं करोति तिमिरापहः॥ अयनस्योचरस्यादौ मकरं याति भास्करः ॥ विष्णुपुराण. . यावरून विषुवादिनी मेषतुलासंक्रमणे आणि उदगयनारंभी मकरसंक्रमण झालें पाहिजे; आणि सायनसंक्रांति घेतल्यावांचून तसे व्हावयाचें नाहीं. वरील श्रुतिसूत्रपुराणवाक्यांवरून मध्वादि म्हणजे चैत्रादि मासांत वसंतादि ऋतु सर्वदा आले पाहिजेत हे उघड आहे. आणि सायनमान स्वीकारल्यावांचून तसे होणे शक्य नाही. ...वरील वाक्ये दिल्यावर ज्योतिषग्रंथांतील वचनें व ज्योतिषविषयक दुसरी वचनें