पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/418

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४२१) रयनाबद्दल लेख आला होता. त्यांतला थोडासा उतारा देतो. केसरीकार प्रो. टिळक ह्मणतातः-"संपातबिंदूवर ऋतु अवलंबून आहेत...सूर्य अश्विनीत असतां वसंतास आरंभ झाल्यास त्यावेळी...चैत्र महिना असला पाहिजे....दोन हजार वर्षांनी तो (वसंतारंभ ) फाल्गुन शुद्ध प्रतिपदेस होणार. चार हजार वर्षांनी माघशुद्ध प्रतिपदेस होणार." चालू निरयनपद्धति कायम ठेविल्यास कालांतराने चैत्रांत पावसाळा येईल, ही गोष्ट गणिताने सिद्ध आहे. तिजविषयी शंकाच नाही. तथापि ज्यांस गणिताच्या भानगडीत पडण्यास अवकाश नाही, किंवा ज्यांस ते फारसे समजत नाही, अशा लोकांचीही केरोपंत, टिळक, अशांसारख्या गणितनिपुणांच्या लिहिण्यावरून विशेष खात्री होईल ह्मणून ते एथे दिले. केरोपंत, टिळक, यांचे मत चालू निरयनपद्धतींत कांहीं फेरफार करून ती कायम ठेवावी असे आहे. ह्मणून ऋतूंसंबंधी सायनपंचांगकारांचे जे ह्मणणे त्याविषयी त्यांची मान्यता विशेष मातबरीची होय. केरोपंत, टिळक, यांनी निरयनपद्धति कायम ठेविण्याचा एक मार्ग सुचविला आहे; परंतु तो ग्राह्य नाही. त्याविषयी विवेचन पुढे करूं. पर्जन्यारंभ मृगनक्षत्रीं सदोदित व्हावयाचाच; तो अश्विनीत कसा येईल, असें काही लोकांस वाटते. परंतु १४०० वर्षांपूर्वी मग हे पावसाचे पर्जन्याचे पहिले नक्षत्र आा.. नक्षत्र मुळीच नव्हते. आमच्या ग्रंथांत आर्द्रा हे पावसाचे पहि लें नक्षत्र आहे. पंचांगांत संवत्सरफल देत असतात, त्यांत आ. द्रा नक्षत्री सूर्याचा प्रवेश ज्या वेळेस होतो त्या वेळेवरून पर्जन्याची फलें ठरवितात: इतकेच नाही, तर आप्रिवेश ज्या वारी होईल तो मेघांचा स्वामी मानितात. यावरून पावसाचें मूळचे नक्षत्र आर्दा असून पुढे मृग झाले, त्याप्रमाणे उत्तरोत्तर रोहिणींत, रुत्तिकांत, असा पर्जन्यारंभ मागे मागे येऊन कांहीं कालाने अश्विनीत ह्मणजे चैत्रांत येईल. नक्षत्रे सायन मानिलीं ह्मणजे अशी अव्यवस्था होणार नाही. मृगनक्षत्र जूनच्या पांचव्या तारखेस निघावयाचे असा नियम आहे, तो चुकणार नाही व त्याप्रमाणे पाऊसही चुकणार नाही, असें कांहीं लोमृगांची तारीख. कांचे मणणे असते. परंतु इंग्लिश वर्ष सायन असल्यामुळे निरयन सूर्यनक्षत्र सर्वकाल एकाच तारखेस असावयाचे नाही. सुमारें शक १७०७ पूर्वी मृगनक्षत्र जूनच्या चवथ्या किंवा पांचव्या तारखेस निघत असे. पुढे पांचव्या किंवा सहाव्या तारखेस निर्धू लागलें. शक १८१९ पासून ते पांचवीला मुळीच निघणार नाहीं; सहावीला किंवा सातवीला निघेल. असो; तर परंपरा पाहिली असतां ती सायनपद्धतीस अनुकूल आहे. धर्मशास्त्रदृष्टया विचार वरील विवेचनांत व त्यापूर्वी ब चारताराच आला आहे. एथे तो अमळ विस्ताराने करूं. BIRTE मधश्च माधवन वासंतिकावृत... तै. सं. ४.४.११. इत्यादि वेदवाक्ये, ज्यांत सहाही ऋतूंचे मास सांगितले आहेत अशी, पूर्वी (पृ.२९)दिलीच आहेत. त्याप्रमाणे मधुमाधवांत सर्वकाल वसंतऋतु असला पाहिजे.