पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/417

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ४२०) लोकांस सूक्ष्म रीतीने झालें. (पृ. ३४०). तेव्हांपासून भास्कराचार्यासारखे चांगले ज्योतिषी होऊन गेले. त्यांना निरयनमानाचे परिणाम समजण्यासारखे असून त्यांनी त्याचा त्याग केला नाही ही गोष्ट खरी आहे. परंतु परंपरागत चालत आलेल्या वर्षमानाचा त्याग करून चालत आलेल्या पद्धतींत घोंटाळा केल्याने व्यवहारांत घोटाळा पडेल इतक्याच भयाने सायनमानस्वीकार त्यांच्याने करवला नाही असें दिसते. त्या वेळी ऋतूंत फरक पडलाही नव्हता, आणि अयनविषुवें वस्तुतः केव्हां होतात हे त्यांनी सांगितलेच आहे. आणखी असे की, संपाताचे पूर्ण भ्रमण होत नाहीं, आंदोलन होते, असेही त्यांपैकी बहुतेकांचे मत आहे. त्यामुळे त्यांनी सायनमान स्वीकारले नसावें. सांप्रत संपाताची पूर्ण प्रदक्षिणा होते हे युरोपियन ज्योतिषाचे अध्ययन करणारांस माहित झाले आहे. तेव्हां या कालांतल्या ज्योतिष्यांचे मत काय आहे हे पाहूं. या कालांतले प्रख्यात ज्योतिषी बापूदेव आणि केरो लक्ष्मण छत्रे यांपैकी बापूदेवांचे मत वर दिलेच आहे (पृ. ४०६ ). सायनगणनाच मुख्य, परंतु या देशांत सर्वत्र निरयनगणना चालते ह्मणून त्या मानाने पंचांग करितों, अर्स त्यांनी झटले आहे. शिवाय पुढे सात आठशे वर्षांनी होणारे ज्योतिषी याचा जास्त विचार करतील असाही त्यांचा उद्गार प्रकट झाला आहे. आतां केरोपंतचिं मत पाहूं. सायनवादी यांचा आणि केरोपंतांचा यासंबंधी वाद इ. स. १८८३ मध्ये ठाणे येथील अरुणोदय वर्तमानपत्रांत झाला. त्यांत ता०४ नव्हेंबर १८८३ च्या अरुणोदयांत ते ह्मणतात, "माझें स्वतःचे मत विचाराल तर असें आहे की, गतिविशिष्ट पदार्थांची गति मापणे झाल्यास ती स्थिर पदार्थांशी ताडून पहाणे हीच गोष्ट प्रशस्त आहे. चल पदार्थांशी मापणे हे अप्रशस्त. सूर्य, चंद्र, ग्रह, संपात, वगैरे सर्व चल आहेत. त्यांचे माप करणे झाल्यास स्थिर जो तारागण त्याशींच केले पाहिजे. मग सौकर्यार्थ किंवा विशेष ज्या ठिकाणी अडचण पडेल त्या ठिकाणी ती चाल सोडून देऊन पदार्थ जरी गतिमान आहे तरी तोच घेऊन त्याच्याशी दुसन्या पदार्थांच्या गति ताडाव्या लागतात. उदाहरण नक्षत्रे जरी स्थिर आहेत तरी... ... दिवसाचा आरंभ करण्यास सूर्योदय घेण्यास बरें पडते. परंतु या दिवसाचें मान अनियमित असल्यामुळे गणित करण्यास मध्यम मानाने चालणारा एक कल्पित रवि घेऊन त्याच्याप्रमाणे चालावे लागते. या रीतीने पाहूं गेल्यास ऋतु हे सायन संपातावर अवलंबून असतात, तेव्हां वर्षाचा आरंभ त्या संपाताच्या संबंधाने असावा हे बरे असे मलाही वाटते. परंतु 'ययपि शुद्धं लोकविरुद्धं नाचरणीयं नाकरणीयं' या वाक्याचा अंमल जारी आहे असेंही आढळतें. या मानांपैकी कोणतें खरें, कोणते खोटें; कोणतें सुगम, कोणतें दुर्गम; कोणतें सशास्त्र, कोणतें अशास्त्र; याचा कधी कोणी विचार केला आहे ? ज्या वेळेस जसा प्रसंग पडेल त्याप्रमाणे तें तें मान घेऊन चालतों." यांत ऋतु संपातावर ह्मणजे सूर्याच्या सायनस्थितीवर अवलंबून आहेत, परंतु संपातास अनुसरून वर्षारंभ करण्यास ‘यद्यपि शुद्धं लोकविरुद्धं ' हीच काय ती अडचण, हे केरोपंतांचे म्हणणे महत्वाचे आहे. इ. स. १८९३ मध्ये पुणे एथील केसरी वर्तमानपत्राच्या दोन अंकांत सायननि