पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/416

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४१९) सूर्य केव्हां आला हे समजण्यापेक्षां उदगयन केव्हां लागले हे अडाणी मनुष्यासही सहज समजेल; यावरून अयनारंभींच वर्षारंभ वस्तुतः करीत असतील. वेदांगज्येातिषांतली पद्धति फार चुकीची आहे, हे मागे दाखविलेंच आहे (पृ. ९३ ). तेव्हां ९५ वर्षांत ३८ च्या ऐवजी ३५ अधिकमास घालून आणि उदगयनारंभी वर्षारंभ करून ती पद्धति प्रचारांत ठेवणे हेच जास्त संभवनीय दिसते. ह्मणजे प्रत्यक्ष सायन वर्षच प्रचारांत होते. वेदांगकालांतल्या बहुतेक ग्रंथांत वसंतारंभी वरिंभ आहे. तेव्हां वेदांगकाली प्रत्यक्षतः किंवा निदान हेतुतः तरी सायन वर्षच ग्राह्य होतें. आतां ज्योतिःसिद्धांतकालांतल्या पद्धतीचा विचार करूं. सूर्यसिद्धांतात पुढील वाक्ये आहेत: भचबानाभौ विषुवद्वितयं समसूत्रगं ॥ अयनद्वितयं चैव चतस्रः प्रथितास्तु ताः ॥ ७ ।। तदंतरेषु संक्रातिद्वितयं द्वितयं पुनः ॥ नैरंतर्यात् तु संक्रांते यं विष्णुपदीद्वयं ॥ ८ ॥ 'भानोर्मकरसंक्रांतेः षण्मासा उत्तरायणं । कोदेस्तु तथैव स्यात् षण्मासा दक्षिणायनं ।। ९॥ मानाध्याय. यांतील कर्क, मकर, इत्यादि संक्रांति सायनच घेतल्या पाहिजेत. नाही तर "सूर्याच्या मकरसंक्रमणापासून उदगयन इत्यादि वाक्यांची गति होत नाही. आतां यावर कोणी ह्मणेल की अयनचलनाचे ज्ञान नव्हते तेव्हांची ही वाक्ये आहेत. हे झणणे कबूल केलें तरी, दोन अयनांचें वर्ष होते, असें वरील श्लोकांवरून गर्भित होते. यावरून, आणि वरच्यांच्या पुढला श्लोक द्विराशिनाथा ऋत वस्ततोपि शिशिरादयः मेषादयो द्वादशैते मासास्सैरेव वत्सरः ॥ १०॥ अर्थ-त्या [ मकरा ] पासून दोनदोन राशींचे शिशिरादि ऋतु होत. हे मेषादि बारा मास होत. त्यांनी वर्ष होतें. यांत १२ मासांचा एक ऋतुपर्यय आणि तेच एक वर्ष असा अर्थ आहे. यावरून सायनमान मूर्यसिद्धांतास तत्त्वतः ग्राह्य आहे. विषुवदिवशीं सौर वर्षारंभ असें बह्मगुप्ताचे मत होते. अर्थात वर्ष सायनमानाचे घेतले पाहिजे असे त्याचे मत होते, असें ब्रह्मगुप्तविवेचनांत सविस्तर दाखविलेंच आहे (पृ. २१९-२१). आणखी असें की आमच्या ज्योतिषग्रंथांत जें वर्षमान आहे तें वास्तव नाक्षत्र सौरवर्षाच्या मानाहून सुमारे ८ पळे जास्त आहे. यावरून ते नाक्षत्रसौरच आहे असें ह्मणतां येत नाही. सूर्य ज्या नक्षत्री असतो तें नक्षत्र दिसत नाही यामुळे नाक्षत्रसौर वर्षाचें मान ठरविण्यापेक्षा सायन सौरवर्षाचें मान ठरविणे सोपे आहे. आणि ब्रह्मगुप्ताने विषुवसंपाती सूर्याच्या येण्यावरून वर्षमान ठरविले, त्याप्रमाणे त्याच्या पूर्वीच्या ज्योतिष्यांनीही ते त्याच धोरणाने ठरविले असेल हे जास्त संभवते. ह्मणजे सायन वर्षमान ग्राह्य असा त्यांचा तत्त्वतः हेतु असावा असे दिसते. तेव्हां एकंदरीत, वेदकालाच्या शेवटापासून संपात गतीचे ज्ञान होईपर्यंत चैत्रादि संज्ञांच्या प्रचारामुळे, आणि वर्षमान में मानले होते तें सायन वर्षमानापेक्षां निरयन वर्षमानाशी जास्त जवळ आहे यामुळे, परिणाम निरयनवर्षमान घेतल्यासारखा किंवा त्याच्या जवळ जवळ झाला, तरी सायन वर्षमान घ्यावे असा हेतु होता याविषयी काही संशय नाही. आणि तसा असणे स्वाभाविकच आहे. चैत्रांत पावसाळा यावा ही गोष्ट कोणासही संमत होणार नाही. शककालाच्या सातव्या शतकाच्या सुमारास अयनचलनाचें ज्ञान आमच्या