पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/415

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४१६) मध्यम ग्रहांत अंतर हे होय, तसेंच मंदफल आणि शीघ्रफल यांतल्या फरकामुळेही कांहीं अंतर येतें. मंदफलाच्या फरकाविषयी विचार पूर्वी (पृ. ३६४) केलाच आहे. सायनपंचांग आणि ग्रहलाघवीपंचांग यांतील ज्या गोष्टींचा फरक आकाशांत सहज दिसेल अशा युति, अस्तोदय इत्यादि काही गोष्टी परिशिष्टांत दिलेल्या पंधरवड्यांत शास्त्रार्थाच्या कोष्टकांत आहेत. वर्षातल्या अशा गोष्टींची याद सायनपंचांगांत दरसाल दिलेली असते. त्यांतील सायनपंचांगांतलें गणित बरोबर मिळते, ग्रहलाघवीतले चुकतें, असा अनुभव पुष्कळांनी घेतला आहे. शक १८०० ची अशी यादी (प) परिशिष्टांत दिली आहे. तिचा अनुभव आला आहे. शक १८०६ या वर्षी ग्रपलाघवी पंचांगांत चैत्रांत चंद्रग्रहण नव्हते; सायनपंचांगांत व केरोपंती इत्यादि सूक्ष्मनिरयन पंचांगांत ते ग्रस्तोदित होते. शक १८१४ ग्रहलाघवी पंचांगांत वैशाखांत चंद्रग्रहण सूर्योदयापूर्वीच सुटत होतें, सायन इत्यादि सूक्ष्म पंचांगांत तें प्रस्तास्त होते. या दोन्ही वेळी सायन इत्यादि मूक्ष्मपंचांगांप्रमाणे अनुभव आला. ग्रहलाघवी पंचांगास दृक्प्रत्ययासंबंधे जी गोष्ट लागू तीच इतर प्रांतांतल्या मकरंदादि ग्रंथावरून होणाऱ्या पंचांगास लागू आहे. सारांश या देशांत सांप्रत सर्वत्र चालणारी पंचांगें आकाशांत अनुभवास मिळत नाहींत ; ह्मणून त्यांतील ग्रहगतिस्थिति शुद्ध झाल्या पाहिजेत. अर्थात् ती प. चांगें तयार करण्याचे शुद्ध ग्रंथ झाले पाहिजेत. ज्योतिषग्रंथांचा इतिहास या भागाच्या आरंभी दिला आहे, त्यावरून जागजागी दिसून येतें की गणिताप्रमाण प्रत्यक्ष अनुभव यावा ह्मणून पूर्व ग्रंथांस बीजसंस्कार देऊन नवीन ग्रंथ करण्याची परंपरा चालत आलेली आहे. त्याप्रमाणे सांप्रत केले पाहिजे. ही गोष्ट जन्या ज्योतिषांसुद्धां सर्वांस मान्य आहे. आतां जुनी व नवीं पंचांगे यांतील भिन्नत्वाचा दुसरा प्रकार, झणजे वर्षमान आणि तदनसार अयनांश यांचे भिन्नत्व, याविषयी विचार सायन आणि निरयन या मानांचं ग्राह्या- करावयाचा. यासमव पाहिल तर करावयाचा. यासंबंधे पाहिले तर सायनपंचांग एका बाजूस आणि जुनी निरयनपंचांगें व केरोपंती इत्यादि नवीं सूक्ष्म निरयनपंचांगें सर्व दुसऱ्या बाजूस येतात. तर यांचा ह्मणज सायन निरयन ह्या मानांत ग्राह्य कोणते याचा विचार करावयाचा. हा विचार चार रीतींनी करितां येईल. एक तार्किकदृष्टीने, दुसरा ऐतिहासिकदृष्टीने, तिसरा धर्मशास्त्रदृष्टीने आणि चवथा व्यावहारिकदृष्टीनें. प्रथमतः विषयाच्या समजुतीकरितां एक दोन गोष्टी सांगितल्या पाहिजेत. दिनरा त्रिमान ज्या दिवशी सारखे होते त्या दिवसास विषुव दिवस विषयप्रवेश.. ह्मणतात. दोन्ही संपातीं सूर्य येतो त्या दिवशी पृ. ४१२ वरील आळतींत व, त बिंदूत सूर्य येईल तेव्हां विषुवे होतात. आणि तो संपातापासून तीन राशींवर आकतींत उ, द स्थानी जातो तेव्हां उदग्दक्षिणायने लागतात. त्या चोहोंस सारखेच (संपातचलनाइतकें) चलन आहे. अर्थात् विषुवायने आणि दिनमान सायनरवीवर अवलंबून आहेत. सूर्य वसंतसंपाती आल्यापासून तुलासंपातीं जाईपर्यंत उत्तरंगोलार्धात असतो. आणि त्याच काली आपल्या देशांत दिनमान ३० घटिकांहून ग्राह्यत्व.