पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/414

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४१५) सध्या इंग्रजी नाटिकल आल्मनाक किंवा फ्रेंच कानेडिटेम ( कालज्ञान ) यावरून करितात. परंतु त्या प्रत्येकाचे आरंभस्थान परस्परांपासून किंवा ग्रहलाघवस्थानाहून भिन्न आहे. यामुळे ग्रहलाघवी पंचांगाची चूक वास्तविक किती आहे हे त्यांशी त्याची नुस्ती तुलना करून समजणार नाही, असें वर आकृतीवरून विचार केला आहे (पृ.४१२) त्यावरून, लक्षात येईल. शक १८०८ च्या सायनपंचांगाबरोबर ग्रहलाघवी पंचांग जोडलेलें आहे; आणि त्यांतच सक्ष्मनिरयन पंचांग या नांवाचें तिसरं पंचांग आहे; तें पुष्कळांनी पाहिलेच आहे. त्यांतील फाल्गुन शुक्लपक्षाचे ग्रहलाघवी आणि सूक्ष्मनिरयन पंचांग शेवटी (प) परिशिष्टांत दिले आहे. सूक्ष्म निरयन पंचांगांत अयनांश ग्रहलाघवाइतके (शक १८०८ मध्ये २२।४४) घेतले आहेत. ग्रहलाघवांत वर्षमान सूर्यसिद्धांताचें आहे. त्या मानाने शक १८०८ मध्ये अयनांश २२।२ घेतले असते तर ग्रहलाघबी पंचांगाची चूक अगदी बरोबर समजली असती. तथापि परिशिष्टांत दिलेल्या पंचांगांवरूनहि वास्तविक चूक बहुतेक बरोबर काढितां येईल. दोन्ही पंचांगें उज्जनीची आहेत, आणि घटीपळे दोहोंत मध्यमोदयापासून आहेत. यामुळे तुलना बरोबर होईल. तिथीची तुलना करून पाहतां फाल्गुन शुक्ल ९ शुक्रवार, ही तिथि सूक्ष्माहून ग्रहलाघवींत १३ घ. ४५ प. कमी आहे; आणि कृष्णपक्ष परिशिष्टांत दिला नाही, परंतु त्यांत षष्ठी १३ घ.५९ प. जास्त आहे. ग्रहलाघवीत शुक्ल ९ रोजी मृगनक्षत्र १५ घ. २४ प. कमी आहे, आणि त्याच वेळी त्यांत विष्कंभ योग १७ घ. २३ प. कमी आहे. तिथिनक्षत्रयोगघटीत याहून जास्त चूक बहुधा पडत नाही. चूक पडते ती शुक्ल किंवा कृष्ण ८ च्या सुमारास फार पडते; पौर्णिमा अमावास्या यांच्या सुमारास फारच थोडी पडते. याचे कारण चंद्राचा फलसंस्कार आमच्या ग्रंथांतला पर्वातींचा फार चुकत* नाही. मध्ये आमचा चंद्र कधी २ अंश व कधी ३ अंश देखील चुकतो. यामुळे तिथिनक्षत्रयोगघटीपळांत इतका फेर पडतो. आमच्या ग्रंथांत रविपरमफल सुमारे २ अंश १० कला आहे. युरोपियन कोष्टकांत सांप्रत १।५५ आहे. यामुळे रवि कधीं बरोबर मिळतो, कधी १५ कलांपर्यंत चुकतो. आमच्या ग्रंथांवरून तिथीचे लघुतम मान सुमारे ५४ घटी आणि महत्तम सुमारे ६६ घटी आहे. परंतु नाटिकल आल्मनाकवरुनहीं मानें अनुक्रमें ५० व ६६ घटी येतात. (हा फरक चंद्राच्या फरकामुळेच होतो). यामुळे तिथिनक्षत्रक्षयवृद्धि नाटिकल आल्मनाकवरून केलेल्या पंचांगांत काही जास्त होतात. शक १८०९ च्या बारा महिन्यांत सायन पंचांगांत किंवा केरोपंती पंचांगांत तिथिक्षय १६ आणि तिथिवृद्धि १० होत्या. ग्रहलाघवीत क्षय १३ व वृद्धि ७ होत्या. शक १८०८ मध्ये सूक्ष्मनिरयनांत नक्षत्रांचे क्षय १०, वृद्धि १३, आणि ग्रहलाघवीत क्षय ९, वृद्धि १२ होत्या. ग्रहलाघवी पंचांगांत एथे दिलेल्या फाल्गुन शुक्लांत मंगळाची चुकी सुमारे १ अंश १ कला, गुरूची ३।२६, शुक्राची १६, शनीची २।४०, आणि राहूची ४१ कला आहे. याहून जास्त चूक बहुधा पडत नाही. बुधाची चुकी कृष्णपक्षांत ३।३१ आहे. कधी कधी ती ९ अंशांपर्यंत आढळलेली आहे. या अंतराचे मुख्य कारण दोहोंच्या

  • पृष्ठ ३६४६८ पहा.