पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/413

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४१४). समजा. एक ग्रह कोणा एका दिवशी प्रातःकालीं व स्थानी होता. तो द कडे चालला आहे व दररोज एक अंश चालतो आहे असे माहित आहे; तर तो व स्थानी आल्यापासून ९० दिवसांनी, र स्थानी आल्यापासून ७२ दिवसांनी, आणि स स्थानी आल्यापासून ६० दिवसांनी द स्थानी येईल, असे सांगता येईल. व ते अनुभवास बरोबर मिळेल. व हे आरंभस्थान मानले आणि त्या स्थानी तो ग्रह येईल ती वेळा वर्षारंभवेळा मानिली तर वर्षारंभापासून ९० दिवसांनी तो ९० अंशांवर आला असें ह्मणावे लागेल. तसेंच र आरंभस्थान मानले तर वर्षारंभापासून ७२ दिवसांनी ७२ अंशांवर आला असें, बस आरंभस्थान मानले तर वर्षारंभापासून ६८ दिवसांनी ६८ अंश आला असें ह्मणावे लागेल. ह्मणजे सापेक्षत्वाने त्याचे स्थान आणि तेथे असण्याचा त्याचा काल ह्या गोष्टी भिन्न भिन्न वाटतील, परंतु निरपेक्षतेने पाहिले तर इष्ट काली त्याचे स्थान आणि तेथे असण्याचा त्याचा काल ही एकच आहेत. यांत व हे सायनमानाचे, र हे केरोपंती शुद्ध निरयनमानाचे आणि स है परंपरागत निरयनमानाचे आरंभस्थान होय. यावरून हे उघड आहे की ग्रहस्थिति सांगण्यास पंचांग कोणत्याही पद्धतीचे असले तरी, ते ज्या ग्रंथांवरून तयार होते त्यांतील ग्रहगति आणि आरंभकाळची ग्रहस्थिति बरोबर असेल तर ते सर्वकाळ अनुभवास बरोबर मिळेल. आरंभस्थानांत फेरफार न करितां, ग्रहगतिस्थिति आमच्या ग्रंथांत शुद्ध नाहीत तेवढ्यापुरती ग्रंथशुद्धि करण्यास आमचे ज्योतिषी तयार होतील व आहेत, व इतक्यापुरती ग्रंथशुद्धि केलीच पाहिजे हे कोणीही समंजस मनुष्य कबूल करील. ग्रहणे, ग्रहयुति, ग्रहास्तोदय, या गोष्टी दोन खस्थ पदार्थांच्या अंतरावर अवलंबून आहेत. ह्मणून आरंभस्थान कोणतेही असले तरी ग्रहगतिस्थिति बरोबर आहेत तर त्या गोष्टी बरोबर मिळतील. पुष्कळोस वाटते, व मलाही या विषयाची तात्त्विक माहिती नव्हती तेव्हां वाटत असे की, केरोपंती पंचांगावरून ग्रहण मिळतें ह्मणून ते शुद्ध होय. व तें स्वीकारण्यास हेच मुख्य कारण पुढे करितात. (त्या पंचांगाची प्रस्तावना पहा).अज्ञजनास वळविण्यास हे चांगले साधन आहे. सायनपंचांगकार या गोष्टीस फारसे महत्व देत नाहीत. निरयनपद्धति अशास्त्र होय, सायनगणना सशास्त्र ह्मणून सायन पंचांग घ्यावें, सूक्ष्म ग्रहस्थिति काढण्यास साधन नसले तर ग्रहलाघवावरून तरी सायनपंचांग करावें, असें सायनपंचांगाच्या श. १८०७ च्या प्रस्तावनेत लिहिले आहे. केरोपंती पंचांगानें नक्षत्रे बरोबर मिळतील असें एक ह्मणणे आहे, तें साशी खरे नाही. सांप्रत चालू पंचांगांत में आरंभस्थान आहे ते कायम ठेवूनही नक्षत्रे मिळतील असें करितां येईल. याविषयी जास्त विचार पुढे करूं. एथे इतकेंच सांगावयाचें की ग्रहस्थिति सांगण्यास आरंभस्थान कोणतेही असले तरी ग्रहगति शुद्ध आहे तर ग्रहस्थिति दृक्प्रत्ययास मिळेल. आणि जुन्या पंचांगांपेक्षा नवीनांत भिन्नत्वाचा प्रकार जोग्रहगतिस्थितिशुद्धता तो सर्वांच्या मते ग्राह्य आहे. आपल्या देशांत सांपत चालणारी ग्रहलाघवीय इत्यादि पंचांगें, यांतील तिथ्या दिक आणि ग्रह यांत वास्तविक चुकी किती असते हें समग्रहलाघवी इत्यादि। पंचांगांची वास्ताविक जणे इष्ट आहे. ते एथे दाखवितों. वर सांगितलेली केरोपंती चुकी किती? इत्यादि पांच सूक्ष्म निरयन पंचांगें आणि सायन पंचांग ही