पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/412

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संपात हे आरंभस्थान मानून क्रांतिवृत्ताचे जे १२ सारखे विभाग त्यांस सायन राशि ह्मणतात आणि सारखे २७ विभाग त्यांस सायन नक्षत्रे ह्मणतात.* संपात चल असल्यामुळे सायनराशि आणि नक्षत्रे चल होत. रेवती किंवा दुसरी एखादी तारा आरंभस्थान मानून क्रांतिवृत्ताचे जे १२ किंवा २७ सारखे विभाग त्यांस स्थिर किंवा निरयन राशिनक्षत्रे ह्मणतात. या स्थिरचर संज्ञा आमच्या ग्रंथांत आहेत. असो. यावरून सायननिरयन पंचांगांचे लक्षण व स्वरूप लक्षांत येईल. केरोपंती पंचांग शुद्ध निरयन मानाचे होय. बापूढेव यांचे पंचांग व आमच्या ज्योतिषग्रंथांवरून केलेली पंचांगे यांतील वर्षमान वास्तवनिरयन वर्षाबरोबर नाही. परंतु त्यांत अयनांश वर्षमानानुसार मानले आहेत. यामुळे त्यांतील ग्रहस्थिति अयनांशविरहितच असते. ह्मणून त्यांस निरयन पंचांगे व त्यांतील राशिनक्षत्रांस निरयन राशिनक्षत्रे ह्मणण्यास हरकत नाही. तसेच त्यांचे वर्षमान वास्तवनाक्षत्रवर्षाहून थोडे जास्त आहे; यामुळे आरंभस्थान स्थिर होत नाही, तरी ते स्थिर असावे असा सर्व सिद्धांतांचा हेतु आहे. कारण त्यांत नक्षत्रभोग सर्वकाल एकच मानले आहेत. झणून आमच्या सिद्धांतागत आरंभस्थानापासून जे १२ किंवा २७ सारखे विभाग तेही स्थिर राशिनक्षत्रे होत. वर लिहिलेल्या सहा सूक्ष्म पंचांगांत जुन्या पद्धतीच्या पंचांगाहून भिन्नतेचा एक प्रकार सारखाच आहे. तो असा की ह्या तिहींतील ग्रहग्रह स्थिति शुद्ध सा- गतिस्थिति दृकप्रत्ययास बरोबर मिळते. त्यासंबंधे प्रथम विधणे कोणत्याही पद्धतीने शक्य आहे. " चार करूं.पंचांग कोणत्याही पद्धतीचे असो; त्यावरून अमुक वेळी ग्रहण होईल, अमुक वेळी दोन ग्रहनक्षत्रांची युति होईल, असे असले तर ते अनुभवास आले पाहिजे; नलिकावेधाने अमुक ग्रह अमुक काली अमक्या ठिकाणी दिसेल असें गणितानें आलें तर त्याप्रमाणे दिसले पाहिजे. तरच ते पंचांग ग्राह्य होय हे कोणीही कबूल करील. पंचांगाप्रमाणे असा अनुभव येण्यास पंचांगगणितांत दोन गोष्टी बिनचूक असल्या पाहिजेत. एक गृहस्थ अमुक वेळी पुण्यास होता; तो मुंबईकडे चालला आहे; तो अमुक कालांत अमुक कोस चालतो असें बरोबर माहित असेल तर तो अमुक वेळी मुंबईस असेल असें सांगतां येईल व ते बरोबर अनुभवास येईल. त्याप्रमाणे ग्रहांची कोणा एका कालची स्थिति आणि त्याची गति ह्या दोन गोष्टी बरोबर माहित असतील तर इष्ट कालीं तो ग्रह को असेल हे बिनचूक सांगतां येईल व ते बरोबर मिळेल. मग ती ग्रहस्थिति कोठून का मोजलेली असेना. वरील (पृ. ४१२) वर्तुलांत व पासून र बिंदु १८ अंशांवर, स बिंदु २२ अंशांवर आणि द बिंदु ९० अंशांवर आहे असे

  • सायन हे विशेषण राशि, नक्षत्रे, मास यांस व पंचांगास लावणे अप्रशस्त असा कोणी आक्षेप घेतात. सायन हे विशेषण ग्रहांस ( ग्रहस्थितीस ) लावण्यास हरकत नाहींच; व त्याप्रमाणे भास्कराचार्यादिकांनी लाविले आहे. मग सायन ग्रहस्थितीसंबंधे जी राशिनक्षनें त्यांस सायन ह्मणण्यास कोणती हरकत ? त्याप्रमाणेच सायन गणनेने किंवा सायन ग्रहांवरून केलेले में पंचांग तें सायन पंचांग असें लाघवार्थ ह्मणण्यास हरकत नाही. तो एक पारिभाषिक शब्द होय. सायन पंचांगसंबंधे इंदूर एथे झालेल्या वादांत सायन हा बहुव्रीहि समास अर्थात् गौण झणून सायन पंचांग गौण अशी एक कोटी निघाली होती, तिच्यासारखीच 'सायन पंचांग ही सज्ञा अशुद्ध' ही शंका होय.