पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/410

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४११) येतात, ह्मणन ती सायन होय. आणि आमच्या ज्योतिषसिद्धांतांप्रमाणे येणारे जें आरंभस्थान त्यापासून मोजली ह्मणजे तींत अयनांश येत नाहीत ह्मणून ती निरयन (अयनांशविरहित) होय. पहलाघवाप्रमाणे शके १८०९ यावर्षी अयनांश २२ अंश ४५ कला येतात. . ब्राह्मपक्षाच्या राजमृगांकादि ग्रंथांप्रमाणे आणि आर्यपआयनांशविचार. क्षाच्या करणप्रकाश ग्रंथाप्रमाणे २२।४४ येतात. सूर्यसिद्धां ताप्रमाणे २०४९।१२ येतात. मकरंदी पंचांगांत व बंगाल्यां तील पंचांगांत इतकेच मानतात असे दिसते. तसेंच पूर्वी सांगितलेल्या तैलंगी सिद्धांतीपंचगांत सायनसंक्रांति सर्व दिलेल्या असतात त्यांवरून गणित करून पाहतां त्यांतही। अयनांश इतकेच मानितात असे दिसते. परंतु २२।४४ किंवा २२।४५ मानर्णयांत जी चूक आहे त्यापेक्षां यांत जास्त आहे. मद्रास इलाख्याच्या तामिळ व मल्याळी भागांत ग्रहलाघवाइतकेच अयनांश घेतात. तसेंच काश्मीरांत सुमारें ग्रहलाघवाइतकेच घेतात असें पंचांगकौतुकादि ग्रंथांवरून दिसते. मेषसंक्रमण हा सौरवर्षारंभ होय. ह्मणून अयनचलनविचारांत (पृ० ३३८) सांगितल्याप्रमाणे कोणत्याही ग्रंथावरून स्पष्ट निरयनमेषसंक्रमण ज्यावेळी येईल त्यावेळी वेधाने स्पष्ट सायनरवि जितका येईल तितके अयनांश त्या ग्रंथावरून केलेल्या निरयन पंचांगांत धरिले पाहिजेत; झणजे अयनविषुवे बरोबर मिळतील. शक १८०९ यावर्षीचे निरनिराळ्या ग्रंथांवरून येणारे मेषसंक्रमणकाल पूर्वी ( पृ०४०३)दिले आहेत त्यावेळी फ्रेंच आल्मनाकवरून किंवा इंग्रजी नाटिकल आल्मनाकवरून सायनरविकाढून पाहतां निरनिराळ्या ग्रंथांचें वर्षमान घेणे तर अयनांश* मानिले पाहिजेत ते. शक १८०९ अयनांश अंश कला विकला मूलसूर्यसिद्धांत २२१ २७.६ सांप्रतचा सूर्यसिद्धांत २२३ २१.३ प्रथमार्यसिद्धांत, करणप्रकाश २०५५ ४७.८ द्वितीयार्यसिद्धांत ३८.२ राजमृगांक, करणकुतूहल ५७८ ग्रहलाघवांत वर्षमान सूर्यसिद्धांतांतले असून त्यावरून शक १८०९ मध्ये अयनांश२२।४५ येतात. परंतु ते वरीलप्रमाणे २२।३ मानले पाहिजेत. ह्मणजे सुमारे ४२ कलांची चूक आहे.त्या मानानें ग्रहलाघवांत सायनरवि आणि नाटिकल आल्मनाकवरून आलेला सायनरवि यांस अंतर + पडते.

  • मध्यमरावि घेतला तर सांप्रतच्या सूर्यसिद्धांताचे अनुसारी असे अयनांश शके १८०९ मध्ये २२।१८१४४ मानिले पाहिजेत. त्या मानाने इतरांचे जास्त पाहिजेत.

पूर्वी (पृ. ३३३ ) अयनविचारांत सूर्यसिद्धांतवर्ष आणि सायनवर्ष यांच्या अंतरांत सायनरविगति ५८.८ सांगून तितकी किंवा ५८.६ अयनगात मानावी झणून सांगितले आहे. ते सूक्ष्म आहे. ५८.७ गति मानून वर दिलेल्या शक १८०९ च्या अयनांशांवरून उलट गणित केले तर सूर्यसिद्धांताचे शून्यायनांशवर्ष शक १५७ येते. मागें (पृ. ३३७) १५० काढले आहे तें कालांतरसंस्कार आणि फलसंस्कारांत कालांतराने येणारा भेद यामुळे आहे.