पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/409

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४१०) खुद्द लेले यांच्या नांवेंहि आज्ञापत्र अंक २१८ चे दिले आहे, त्यांतील मुख्य मजकूर असा आहे:-“सायननिरयनपंचांगसंबंधानें तुह्मीं सविस्तर अर्ज केला त्याचे सर्व पुराव्याचा विचार पाहतां निरयनपंचांगें श्रुतिस्मृतिपुराण विहितकालदशंक नसल्याने फारच विचारास्पद झाली आहेत.आणि तुह्मी ठरविलेले सायन पंचांग उक्तकालदर्शक असल्याने प्रमाणभूत असून यावद्धर्मकृत्यांस ग्राह्य असल्याविषयी या श्रीजगद्गुरुसंस्थानकडून अभ्यनुज्ञा आहे. कळावें. श्रीमच्छंकरभगवत्पूज्यपादाचार्याणामवतारशकाब्दाः २३६२ मिति फाल्गुन शुक्ल २ स्थिरवार संवत १९४९ स्वारी मुक्काम लष्कर ग्वाल्हेर.*" जुनीं पंचांगे आणि सायन पंचांग यांत भेद दोन प्रकारचा आहे. पहिला प्रकार सायन पंचांगांतील वर्षमान भिन्न आहे आणि त्यांत अयनांश नेहमी शून्य असतात. दुसरा प्रकार ते इंग्रजी नाटि. आल्मनाकवरून किंवा Connaissance des Temps (कालज्ञान ) नांवाच्या फ्रेंच पंचांगावरून करितात; यामुळे त्यांतील ग्रहस्थिति दृक्प्रत्ययास बरोबर मिळणारी असते. . यांत अक्षांश आणि रेखा उज्जयिनीची आहे. पंचांगशोधनविचार. सांप्रत या देशांत बहुधा सर्वत्र चालणारी ग्रहलाववीय इत्यादि पंचांगें अनुभवाशी मिळत नाहीत. ह्मणून त्यांचे शोधन झाले पाहिजे. गेल्या ३० वर्षांत नवीं निघालेली ६ सूक्ष्म पंचांगें नुकतीच सांगितली, त्यांत सायन खेरीजकरून बाकीची ५ निरयन आहेत आणि त्यांतही अयनांश सर्वांचे सारखे नाहीत. पंचांगांत निरयनपद्धति न घेतां सायनमान घेतले पाहिजे असें माझें मत आहे. तर आतां या गोष्टीविषयी विवेचन सायननिरयनविवेकपूर्वक करितों. नाक्षत्र ( निरयन ) वर्ष आणि सांपातिक (सायन ) वर्ष यांची लक्षणे पूर्वी (पृ०१०) दिलीच आहेत. सांपातिक सौरवापक्षां नाक्षत्र लक्षणे. सौरवर्ष सुमारे ५१ पळे जास्त आहे. परंतु आमच्या सर्व ज्योतिषग्रंथांत घेतलेलें वर्ष सांपातिक सौरवर्षापेक्षां सुमारे ६० पळे जास्त आहे. आकाशांत ग्रहांची स्थिति सांगण्याकरितां कोणते तरी आरंभस्थान पाहिजे. आमच्या ज्योतिषग्रंथांचे आरंभस्थान शके ४४४ च्या सुमारे वसंतसंपाती होते. आणि आमच्या ग्रंथांचें वर्षमान सायनवर्षमानापेक्षा सुमारे ६० पळे जास्त असल्यामुळे ते आरंभस्थान वसंतसंपातापासून प्रतिवर्षी सुमारे ६० विकला । पुढे जात आहे. संपात आणि आमच्या ग्रंथांवरून येणारे आरंभस्थान यांमध्ये जें अंतर त्यास अयनांश ह्मणतात. संपातगतीचें ज्ञान प्रथम अयनचलनावरून झालें. अयनचलन जितके अंश झाले असेल ते अयनचलनांश किंवा अयनांश होत. तीच संज्ञा संपातचलनाच्या अंशांस लावू लागले. संपात हे आरंभस्थान मानून तेथून ग्रहस्थिति मोजली झणजे तींत हे अयनांश * दोन्ही आज्ञापत्रांच्या अस्सल प्रती लेले यांकडे आहेत. सूर्यसिद्धांताच्या वर्षमानाने सूक्ष्मतः पाहिले तर ५८ विकला पुढे जात आहे. याचे सविस्तर बिवेचन अयनचलनांत केलेच आहे,