पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/406

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४०७ ) अजितमकाश या नांवाचें शक १८१८ चे पंचांग राजपुतान्यांतील खेतडीचे राजे अजितसिंह यांच्या आज्ञेनें रूडमल्ल नांवाच्या ज्योतिष्याने केलेले पाहण्यांत आले. हे या वर्षापासूनच निघू लागलें असे दिसते. यांत वर्षाच्या आरंभी अयनांश २२।११ मानिले आहेत. नाटिकल आल्मनाकवरूनच हे केलेले आहे. व यांत गणितास अक्षांश आणि रेखा खेतडीची घेतली आहे. अक्षांश २८ आणि कालात्मक देशांतर उज्जनीपासून पश्चिमेस ३ पळे दिले आहे. सायनपंचांग-या देशांत सांप्रत जी पंचांगें सर्वत्र चालतात, त्यांत दिनमान ज्या दिवशी वाढू लागते किंवा कमी होऊ लागते त्याच दिवशी वस्तुतः सूर्याचे उदगयन आणि दक्षिणायन यांची प्रवृत्ति होते. आणि त्याप्रमाणे आकाशांत प्रत्यक्ष अनुभव येऊ लागतो. असे असून त्याच दिवशी त्या पंचांगांत अयनप्रवृत्ति का लिहित नाहीत, तसेंच मकरकर्क संक्रांति त्यामागून सुमारे २२ दिवसांनी कां होतात, अशी शंका साधारण विचार करणाऱ्या मनुष्यास येणे साहजिक आहे. अशा प्रकारची शंका आणि तदनुसार केलेले शोध यांचें फल सांप्रत प्रसिद्ध होणारें सायनपंचांग होय. याचे मूळचे उत्पादक लेले, जनार्दन बाळाजी मोडक व मी असे तिघे होत. या प्रत्येकाच्या मनांत सायनगणनेच्या पंचांगाची कल्पना स्वतंत्रपणे उद्भवलेली आहे. त्यांत सांप्रतच्या सायनपंचांगाचे मुख्य उत्पादक विसाजी रघुनाथ लेले होत. केरोपंत छत्रे यांनी आबासाहेब पटवर्धन यांच्या साह्यानें पंचांगसुधारणेचा प्रयत्न सुरू केला व ते पंचांग छापूं लागले. तेव्हां पंचांगांत अर्धवट सुधारणा करण्यापेक्षा पूर्ण सुधारणा होईल तर बरें, व ती केरोपंतांच्या हातून होण्यासारखी आहे, असें वाटून सन १८७२ (शक १७९४ ) पासून लेले यांनी इंदुप्रकाशपत्रद्वारे केरोपंती पंचांगावर आक्षेप घेण्यास आरंभ केला. प्रथम गोविंदराव सखाराम नांवाच्या कोणा गहस्थाच्या नांवें इंदुप्रकाशांत पत्र छापवून पंचांगांत सुधारणा करणे तर सायन वर्ष घ्यावे इत्यादि सूचना केली. त्याचे उत्तर केरोपंतांनी दिले की निरयनपंचांगाने चालणारा मी एकटाच आहे असे नाही, काशीपासून रामेश्वरापर्यंत लोक त्या मानाने चालणारे आहेत. त्यांपैकी कोणी सदर आक्षेपावर उत्तर देतील; कोणी न दिल्यास मी देईन. पुढे पुष्कळ वर्षे केरोपंतांनी उत्तर दिलेच नाही. तेव्हां लेले यांणी स्फुटवक्ता अभियोगी हे नांव धारण करून वारंवार वर्तमानपत्रद्वारे चर्चा चालविलीच होती. केरोपंत, किंवा सायनगणना सशास्त्र आहे असें तोंडाने झणणारे बापूदेव, यांपैकी कोणी तरी सायन पंचांग सुरू करतील अशी त्यांस आशा होती, व त्यांनी तें श्रेय घ्यावे अशी त्यांची मनःपूर्वक इच्छा होती. परंतु बापूदेव यांचे निरयन पंचांग सुरू झाले. व निरयन पंचांगांत वर्षमान आणि अयनांश किती व्यावे याबद्दल सन १८८० च्या सुमारास बापदेव आणि केरोपंत यांचा वाद ज्ञानप्रकाशपत्रद्वारे झाला, तेव्हां दोघांसहीलेले यांनी सायनपंचांग स्वीकारण्याची विनंति केली, तिचा काही उपयोग झाला नाही. केरोपंतांनी सायनगणना ऋतुसंबंधे खरी तरी आम्हांस त्या गणनेचे पंचांग करणे पसंत नाही अशा अर्थाचे उत्तर लेले यांस दिले. व धर्मशास्त्रोक्त कृत्ये यथाकालीं व्हारी अशा हेतूनें पटवर्धनी पंचांग सुरू केलें असें त्या पंचांगाच्या प्रस्तावनेत केरोपंत ह्मणत सत तरी सदरहू लेले यांस दिलेल्या उत्तरांत धर्मशास्त्रास झुगारून देण्यासारखे काही