पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/407

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४०८) उद्गार त्यांचे निघाले. यामुळे त्यांशी वाद करण्याचें लेले यांनी सोडून दिले. त्याचं सुमारास व पुढे सायनपंचांगासंबंधी बरेच लेख ठाणे येथील अरुणोदयपत्रांत लेले व मोडक यांनी व मी लिहिले. त्या पत्रकर्त्यांनी आश्रय दिल्यामुळे शके १८०४ व १८०५ या वर्षी त्या पत्राबरोबर सायनपंचांगाचे पंधरवडे प्रसिद्ध झाले. पुढे कृष्णराव रघुनाथ भिडे यांच्या प्रयत्नाने तुकोजीराव होळकर यांचा आश्रय मिळून शके १८०६ पासून स्वतंत्र सायनपंचांग प्रसिद्ध होऊ लागले. व चार वर्षे त्या आश्रयाच्या पैशाने छापलें. तुकोजीमहाराज शके १८०८ या साली निवर्तले. यामुळे तो आश्रय पुढे सुरू राहिला नाहीं; व भिडे यांसारखा खटपटी दुसरा कोणी त्या मंडळींत नसल्यामुळे दुसरे कोणाचाही आश्रय मिळाला नाही. तरी शके १८१० पासून चार वर्षे लेले यांनी बहुतेक पदरच्या खर्चानें छापविलें. शक १८१३ पासून चार वर्षे मी बहुतेक पदरच्या खर्चाने पंचांग छापवितों. ज. बा. मोडक शक १८११ अखेर निवर्तले. लेले शक १८१७ मध्ये निवर्तले. शक १८१८ च्या पंचांगाचे पं. धरवडे ठाणे एथील अरुणोदयपत्रकर्ते छापून त्या पत्राबरोबर प्रसिद्ध करित आहेत. या पंचांगाचे गणित पहिल्या वर्षी लेले यांनी केले. शक १८०५ चे तिघांनी केले. " पुढे १३ वर्षे गणित व इतर सर्व व्यवस्था मुख्यत्वें मी करितों. पटवर्धनी पंचांगापमाणे याच्या गणिताचा खर्च कोणी देत नाहीं, इतकेच नाही, तर पंचांगाचा खप थोडा असल्यामुळे ते छापण्याच्या खर्चाची व्यवस्था आह्मांसच पहावी लागते. श्रीजगद्गुरु शंकराचार्य, द्वारका एथील शारदामठाचे अधिपति, यांची स्वारी शक १८१५ मध्ये लष्कर ग्वाल्हेर एथें असतां वि. र.लेले यांनी त्यांस चालू ग्रहलाघवी, पटवर्धनी, बापूदेव यांचे आणि सायन ही पंचांगे दाखवून ग्राह्य पंचांग कोणतें याचा निर्णय करण्याविषयी विनंति केली. तेव्हां जगद्गुरूंनी साधकबाधक सर्व गोष्टींचा विचार करून सायनपंचांग सर्वांनी ग्राह्य करावें असें सकल भरतखडस्थ जनांस आज्ञापत्र प्रसिद्ध केले. तें एथे देतों : ॥ श्रीशारदांबा विजयतेतराम् ॥ श्री द्वारका धीशो विजयते जगद्गुरु श्रीमच्छङ्क राचार्य श्रीशारदामठ द्वारका संस्थाना धीश्वर महा श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्यवर्यपदवाक्यप्रमाणपारावारपारीणयमनियमासनप्राणायामप्रत्याहारधारणाध्यानसमाध्यष्टांगयोगानुष्ठाननिष्ठतपश्चयांचरणचक्रवर्त्यनाद्यविच्छिन्नगुरुपरंपराप्राप्तषण्मतस्थापनाचार्यसांख्यत्रयप्रतिपादकवैदिकमार्गप्रवर्तकनिखिलनिगमागमसारहृदयश्रीमत्सुधन्वनः