पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/405

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४०६) सर्व लोकांच्या संतोषाकरितां होय. कारण पंचांगाच्या प्रस्तावनेत ते ह्मणतात:"महाराजाधिराजद्विजराजश्री ५ मदीश्वरीप्रसादनारायणसिंहबहादुराख्येन श्रीकाशीनरेशेन .. आदिष्टः पंचांगकरणे प्रवृत्तोहं. भवति यद्यप्यत्र सायनगणनैव मुख्या तथाप्यस्मिन् भारतवर्षे सर्वत्र निरयनगणनाया एव प्रचारात् सामान्य जनप्रमोदायेदं... तिथिपत्रं निरयनगणनयैव व्यरचयं" - बापूदेवांचें पंचांग इंग्लिश नाटिकल आल्मनाकवरून तयार होते. त्यांत अक्षांश आणि रेखा काशीची घेतली आहे. मूर्यसिद्धांतादि ग्रंथांवरून साधलेला रवि आणि सूक्ष्म सायनरवि यांच्या अंतराइतके अयनांश घेतले आहेत असे ते लिहितात. नाटिकल आल्मनाकमधील सायनरवि आणि बापदेव यांच्या पंचांगांतील निरयनरवि यांच्या तुलनेवरून पाहतां शक १८०६मध्ये त्यांनी अयनांश सुमारे २२ अं. १ कला घेतले आहेत. या वर्षी सूर्यसिद्धांतावरून अमान्त चैत्र कृ. १ शुक्रवार, काशी स्पष्ट सूर्योदयापासून घ. ३० प.२६ यावेळी मेषसंक्रमण होते. बापूदेव यांच्या पंचांगांत ते त्याच दिवशीं घ. ३१ प. १२ यावेळी आहे. हे सूर्यसिद्धांताच्या पुढे ४६ पळे आहे. तरी इतर कोणत्याही सिद्धांताशी जमत नाहीं; यावरून त्यांनी सूर्यसिद्धांताचा रवि घेतला आहे, दुसन्या ग्रंथांतला घेतला नाही, असे सिद्ध होतें.४६ पळांचें अंतर ही चूक असावी. केरोपंतांचा त्यांचा वादविवाद झाला त्यांत १४ जून १८८० च्या पुणे एथील. ज्ञानप्रकाश पत्रांत सूर्यसिद्धांताचा रवि घ्यावा असे ते स्पष्ट ह्मणतात. मात्र तो मध्यम घ्यावा असे त्यांनी तेथे झटले आहे. वरील सूर्यसिद्धांताच्या मेषसंक्रमणकाली सायनरवि नाटिकल आल्मनाकवरून २२१०३१ येतो तितके अयनांश घेतले पाहिजेत. बापूदेव यांनी २२।११० घेतले आहेत. यावरून, त्यांनी स्पष्टरवीचें अंतर पंचांगांत घेतले आहे, मध्यमाचें नाही. बापूदेवाच्या मागे त्यांच्या कोणी शिष्यांनी पंचांग करून छापविण्याचे काम अजून चालू ठेविले आहे. इतर पंचांगांहून बापूदेव यांच्या पंचांगांत भिन्न प्रकार वस्तुतः एकच आहे. तो हा की ते नाटिकल आल्मनाकवरून केलेले असते, यामुळे त्यांतील ग्रहगतिस्थिति शुद्ध येऊन ते दृक्प्रत्ययास मिळते. अयनांशांत थोडा फरक आहे, परंत तो वस्तुतः फरक नव्हे. सूर्यसिद्धांतागत रवि आणि नाटिकल आल्मनाकचा रवि यांचे अंतर ते अयनांश मानल्यामुळे वर्षमान सूर्यसिद्धांतांतलेच घेतल्यासारखे होते. या पंचांगाविषयीं जास्त बिचार पुढे पंचांगशोधनविचारांत केला आहे. इंग्रजी नाटिकल आल्मनाकवरून होणारी आणखी दोन सूक्ष्म निरयन पंचागे माझ्या पाहण्यांत आली. ती दोन्ही निरयन मानाची आहेत. ठुसरी सूक्ष्मान तंजावर प्रांतांतील तिरुवादि एथील सुंदरेश्वर औती आणि वेंकटेश्वर दीक्षित हे शक १७९८ पासून तामिळ लिपीत एक समसौरपंचांग काढित असतात. त्यांत शक १८१५ च्या आरंभी २२।१० ह्मणजे रघनाथाचार्यांच्या पंचांगाइतकेच अयनांश आहेत. त्या वर्षी मेषसंक्रमण भौमघ. ५१ प. ३१ या वेळी आहे. तिरुवादि एथे ज्योतिस्तंत्रसभा या नावाची एक निघाली होती असे दिसते. तिचे अध्यक्ष चिदंबरम् अयर यांनी इ. स. १८८३ Hinda Zodiac या नावाचे एक लहानसें पुस्तक लिहिले आहे. त्यांत ते लिकी सदरहू पंचांग कुंभकोण एथील शंकराचार्याच्या आज्ञेने निघते.