पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/404

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४०५) भिन्न आहे. पहिला प्रकार असा की ह्यांत रेवतीयोगतारा (झिटापिशियम) शक ४९६ मध्ये संपांती होती ह्मणून त्या वर्षी अयनांश शून्य मानून अयन गति वास्ताविक ह्मणजे सुमारे ५०२ विकला मानिली आहे. आणि अर्थातच वर्षमान वास्तविक नाक्षत्रसौर मणजे ३६५ दि. १५ घ. २२ प. ५३ वि. मानले आहे. आणि तदनुसार कोणत्याही वर्षां रेवतीतारेचे संपातापासून जें अंतर तितके अयनांश मानिले आहेत. शक १८०८ च्या आरंभी अयनांश १८ अं.१७ कला * मानले आहेत. दुसरा मुख्य प्रकार असा की यांतील ग्रहगतिस्थिति शुद्ध असल्यामुळे या पंचांगाप्रमाणे ग्रहणे, ग्रहयुति, इत्यादि गोष्टी दृक्प्रत्ययास बरोबर + मिळतात. हे पंचांग इंग्लिश नाटिकल आल्मनाकवरून करितात. यामुळे व तें इंग्लिश पंचांग फारच सूक्ष्मपणे दृक्प्रत्ययास मिळणार असल्यामुळे केरोपंती पंचांग तसेंच असणे हे साहजिक आहे. पुढे पंचांगशोधनविचारांत या पंचांगाचे जास्त विवेचन केले आहे. हे पंचांग ज्यावरून करितां येईल असा एकादा संस्कृत किंवा मराठी ग्रंथ केरोपंतांनी केला नाही. वेंकटेश बा. केतकर यांनी तसा ग्रंथ नुकताच केला आहे (पृ. ३०२, ३०६ पहा). दृग्गणितपंचांग. हे मद्रास येथील रघुनाथाचार्य यांनी शक १७९१ पासून सुरू केलें (पृ० ३०५ पहा). हे इंग्रजी नाटिकल आल्मनाकवरून केलेले असते. तें द्राविड आणि तैलंगी अशा दोन्ही लिपति छापितात. यावरून त्याचा खप त्या प्रांतांत फार आहे असे दिसते. याला शिरिय (लघु) ह्मणतात. रघुनाथाचार्य असतां ते आणखी पेरिय (बृहत् ) दृग्गाणितपंचांग काढित असत असे समजतें. रघुनाथाचार्यांचे पुत्र वेंकटाचार्य यांनी केलेलें द्राविड लिपीत छापलेलेशक १८१८ (वर्तमानकालि ४९९८) या वर्षाचें शिरिय सौर पंचांग मजपाशी आहे, त्यांत शक १८१९ चें मेषसंक्रमण रविवारी (ता. ११ एप्रिल १८९७ रोजी)घ, ५२ प.४३ यावेळी आहे. सूर्यसिद्धांतावरून स्पष्टमेषसंक्रमण याच वेळेच्या सुमारास होतें. ( फारच थोडा फरक येतो.) यावरून सूर्यसिद्धांतागत स्पष्टरवि आणि नाटिकल आल्मनाकवरून आलेला सायन स्पष्टरवि यांत जें अंतर तितके-शक १८१९ च्या आरंभी २२।१५ --अयनांश यांत मानिले आहेत असे सिद्ध होते. यांत अक्षांश आणि रेखांश ही मद्रासची असावी असे वाटते. बापूदेव यांचें पंचांग.-पंडित बापूदेवशास्त्री यांस सायनगणना मान्य आहे. सन १८६३ च्या सुमारास सायनगणनेच्या सशास्त्रतविषयी त्यांनी इंग्रजीत एक व्याख्यान दिले होते ते छापलेले आहे, त्यावरून सायन पंचांग सशास्त्र होय असें त्यांचे मत दिसून येते; परंतु शक १७९८ पासून ते काशी येथील महाराजांच्या आश्रयाने निरयन पंचांग करून छापूं लागले, ते केवळ निरयन पंचांगाने चालणाऱ्या

  • झिटापिशियमच्या स्थिती वरून फार सूक्ष्म गणित करून पाहतां शके १८०८ च्या आरंभी अयनांश २०१७१० पाहिजेत. पटवर्धनी पंचांगांत १० विकलांची चूक आहे.

+ ग्रहांचे अस्तोदय कधी कधी मिळत नाहीत, याचे कारण निराळं आहे. पुढे उदयास्ताविकारांत त्याचा विचार केला आहे. +चिंतामणि हे रघनाथाचार्यांचे आडनांव होय. ते कांचीच्या पूर्वेस ८ मैलांवर कावांडलम झणून खेडे आहे तेथले राहणारे होते असें नटेशशाली लिहितात.