पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/403

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४०४ ) एकंदरीत पाहतां सांप्रत ग्रहलाघव आणि तिथिचिंतामणि ह्या ग्रंथांचा प्रसार सर्वांत जास्त आहे. त्याच्या खालोखाल मकरंदाचा आहे. अथप्राधान्य. या तीन ग्रंथांतलें वर्षमान सांप्रतच्या मूर्यसिद्धांताचें आहे. बंगाला आणि तैलंगण ह्यांत हेंच वर्षमान आहे. तेव्हां या देशाच्या सुमारे पांचषष्ठांश (1) भागांत हे वर्षमान चालते. मारवाडांत ब्रह्मपक्षाचें चालते. द्राविड आणि मलबार प्रांतांत आर्यपक्षाचें चालतें. काश्मीरांत मूलमूर्यसिद्धांताचें चालतें. छापी पंचांगें होण्यापूर्वी सर्व मोठमोठ्या गांवचे ज्योतिषी पंचांगें करीत असत. या वेळी कचित् निरनिराळ्या पक्षांची पंचांगें करीत असतील; परंतु सामान्यतः वर सांगितलेल्या प्रकारचीच व्यवस्था असावी. हल्ली तर आहेच. ज्योतिषसिद्धांतकालाच्या आरंभापासून कोणत्या सिद्धांतग्रंथाचे, करणग्रंथाचे आणि सारिणीयथाचें पंचांगगणितांत प्राधान्य कोठे केव्हां होते हैं मध्यमाधिकारांत सविस्तर आलेच आहे. सांप्रत ह्या देशांत चालणारी सर्व निरयन पंचांगें इनत्यास येत नाहीत, ह्मणून ज्यांतील गणित दृक्प्रत्यास येईल अशी काही सूक्ष्म नवी१९ वान पंचांगें निघालीं आहेत त्यांचे वर्णन करितों चांगें. केरोपंती झणजे नवीन अथवा पटवर्धनी पंचांग-हें पंचांग शक १७८७ पासून छापूं लागले. यांत अक्षांश आणि रेखा मुंबईची घेतली आहे. कैलासवासी केरो लक्ष्मण छचे हे याचे कर्ते होत. आणि कै. वा. आबासाहेब पटवर्धन हे याचे प्रवतक होत. या पंचांगाचे गणित प्रथमतः काही वर्षे स्वतः के रोपंतांनी केले असेल असे वाटते. पुढे त्यांच्या देखरेखीखाली वसई एथील आबा जोशी मोघे हे करीत व ते निवर्तल्यावर त्यांचे वंशज करितात. केरोपंतांच्या मागें पंचांगग णित त्यांचे चिरंजीव निळकंठ विनायक छत्रे यांचे देखरेखीखाली होत असते. केरोपंतांचे दुसरे एक चिरंजीव आणि कोणी शिष्य हेही कांहीं गणित करितात असे समजते. रत्नागिरी एथील जगन्मित्र छापखान्याचे मालक जनार्दन हरि आठले' यांस या पंचांगाचा चांगला अभिमान आहे. ते शक १७९१ पासून १८११ पर्यंत हे पंचांग स्वतःच्या खर्चाने छापीत असत. या पंचांगास प्रथम नवीन पंचांग असें नांव होते. या पंचांगाचे गणिताचा खर्च आबासाहेब पटवर्धन करीत व हल्ली त्यांचे वंशज करितात, आबासाहेब यांस या विषयाची फार आवड असे. त्यांनी तीनचार हजार रुपये खर्च करून काही यंत्रे विकत घेतली होती आणि स्वतः ते वेध करीत असत. या पंचांगाच्या पद्धतीचे कल्पक केरोपंत खरे, तरी आबासाहेबांचे उत्तेजन नसते तर हे पंचांग उदयास आले नसते. पटवर्धनांच्या स्मरणार्थ शक १७९९ पासून या पंचांगास नवीन अथवा पटवर्धनी पंचांग असें नांव ठेविलें. शक १८१२ पासून पुणे येथील चित्रशाळेचे मालक वासुदेव गणेश जोशी हे आपल्या खर्चाने पंचांग छापतात. पंचांगाचा खप थोडा यामुळे खर्च बाहेर पडत नाही.आठले आणि जोशी यांनी छापण्याचे पत्करले नसते तर हे पंचांग कधींच लयास गेले असते. परंतु त्यांचे नुसते आभारही प्रसिद्धपणे कोणी मानिले नाहीत. इतकेच नाही तर ते स्वतःच्या खर्चानें छापतात ही गोष्टही कोणी प्रसिद्ध केली नाहीं. या देशांत सर्वत्र चालणान्या सर्व पंचांगांहून केरोपंती पंचांग दोन प्रकारांनी