पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/402

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५ १४ सौरपक्ष गांतल्यांशी मिळत नाहीत. तेव्हां ते कशावरून केलेले असतात नकळे. सूर्यसिद्धांतास कांहीं तरी दुसरा बीजसंस्कार देऊन ते त्यांत साधले असावे असे वाटते. कोची एथे मल्याळी लिपीत छापलेलीं कांहीं पंचांगें मजपाशी आहेत. त्यांत शक १८०९चें मेषसंक्रमण अमान्त चैत्र कृष्ण ५मंगळवारी घ.८ प.५७ या वेळी आहे. निरनिराळ्या पक्षांच्या स्पष्ट मेषसंक्रमणकालास सांप्रत किती भेद पडतो हे समजण्याकरितां निरनिराळ्या ग्रंथांवरून आलेले मेषसंक्रमणकाल देतों: शक १८०९अमान्त चैत्र क ०५ भौमवार (ता.१२ एप्रिल १८८७) उज्जनी मध्यमोदयापासून घटी पळे मूळ सूर्यसिद्धांत १३ १८ सांप्रतचा सूर्यसिद्धांत प्रथमार्यसिद्धांत, करणप्रकाश ७ ३१ आर्यपक्ष द्वितीयार्यसिद्धांत १० २५ राजमृगांक, करणकुतूहल १० ४५ ब्राह्मपक्ष ब्रह्मगुप्तसिद्धांतावरून हे संक्रमण चैत्र कृष्ण ३ रविवारी घ. ५४ प. ४६ या वेळी ह्मणजे सुमारे सवा दिवस पूर्वी येते. परंतु ब्रह्मसिद्धांत सुमारे शक ९६४ पासून प्रत्यक्ष उपयोगांत नाही हे पूर्वी सांगितलेच आहे. वरील मल्याळी पंचांगाचा संकमणकाल ८।५७ आहे. हा प्रथमार्यसिद्धांताशी जमतो. १ घ. २६ पळांचा फरक आहे तो देशांतर, चर, यांमुळे आहे. यावरून ते पंचांग आर्यपक्षाचे आहे असें सिद्ध होते. त्यांतील इतर ग्रहही काही करणप्रकाशगत ग्रहांशी मिळतात.* काही मिळत नाहीत ते कांहीं बीजसंस्कार निराळा असेल यामुळे मिळत नाहीत असे वाटते. इतर काही प्रमाणांवरूनही मल्याळी आणि तामिळ भाषा चालणान्या मद्रास इलाख्यांतील प्रांतांत आर्यपक्ष चालतो असे दिसते. वाक्यकरण नांवाच्या ग्रंथावरून तेथली पंचांगें करितात असे समजतें. तो ग्रंथ मी पाहिला नाही. तथापि त्या अथवा आर्यसिद्धांतानुसारी एकाद्या ग्रंथावरून पंचांग करितात हे निःसंशय आहे. कलकत्ता एथे छापलेलें एक पंचांग मजपाशीं आहे. ते प्रत्यक्ष कोणत्या ग्रंथावरून केलें आहे हे समजत नाहीं, तथापि त्यांत वर्षमान सूर्यसिद्धांताचे आहे. यावरून बंगाल्यामध्ये ते वर्षमान चालतें. काश्मीरांत खंडखायग्रंथानुसार पंचांगें पुष्कळ काळ ह्मणजे सुमारे शक १५८० पर्यंत करित असत व सांप्रतही करित असतील असें पंचांगकौतुक (पृ. २९१) ग्रंथावरून दिसते. मात्र खंडखाद्य ग्रंथ निजरूपानेच आजपर्यंत चालत आला आहे असें नाही. त्यास अनेक प्रकारचे बीजसंस्कार दिले आहेत असें टीकाग्रंथांवरून दिसते. खंडखाद्यावरून येणारा रविसंक्रमणकाल मूलसूर्यसिद्धांताप्रमाणे आहे, व तो इतरांपेक्षां सांप्रतच्या सूर्यसिद्धांतास विशेष जवळ आहे. .

  • तैलंगी आणि मल्याळी लिपि मला जरी चांगली समजत नाहीं तथापि मोठ्या प्रयत्नाने वाचून दोन्ही पंचांगांतली वर दिलेली माहिती काढली आहे, ती बिनचूक आहे अशी मला खात्री आहे.