पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/401

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४०२) एथे छापलेली मराठी व गुजराथी पंचांगें चालतात. अमदाबादचीही चालतात." याच मित्राने अमदाबाद एथे युनियन प्रिंटिंग छापखान्यांत बालबोध लिपीत गुजराथी व संस्कृत भाषेत छापलेलें एक पंचांग शके १८१० चे पाठविले. त्यांतील ग्रह तर सर्वांशी ग्रहलाघवावरून केलेले आहेत. तिथ्यादिकही बहुधा तिथिचिंतामणीवरूनच आहेत. बडोदा संस्थानांत ग्रहलाघवी पंचांगच चालते. यावरून सर्व गुजराथी प्रांतांत ग्रहलाघवी पंचांगें चालतात असें ह्मणण्यास हरकत नाही. पूर्वी मोठमोठ्या गांवांतून जोशी स्वतः पंचांग करीत असत. सांप्रतही क्वचित् करितात. परत हल्ला छापी पंचांग थोडक्यांत मिळते,यामुळे हस्तलिखित पंचांग बहुधा लोपला. पूर्वी निरनिराळे जोशी पंचांगें करीत असत, तेव्हा महाराष्ट्रांत व गुजराथेंतही ब्राह्म आणि आर्य या पक्षांचीही पंचांगें कोणी करीत असतील असे वाटते; व तसे उल्लेखही आढळतात. विश्वनाथाने एका ताजकग्रंथाच्या टीकंत ज्या पक्षाच्या मानाने पत्रिका केलेली असेल त्या पक्षाने वर्षफलांतील रवि करावा अशा अर्थाचें लिहिले आहे. मुहूर्तमार्तडग्रंथकार ( शक १४९३ ) देवगड ( दौलताबाद)च्या जवळ राहणारा होता. त्याने क्षयमासासंबंधे एक उदाहरण देऊन त्यांत ब्राह्मपक्ष आणि आर्यपक्ष यांवरून येणाऱ्या संक्रांतीचे व तिथीचे गणित दिले आहे, त्यावरून त्याच्या दृष्टीस त्या प्रांतांत त्या पक्षांची पंचागे पडत होती असे दिसते. नवसरीचा मित्र लिहितो की तेथील जोशी ब्रह्ममानसारणीवरून पंचांगें करितात, परंतु ती छापत नाहीत. गुजराथेंत ब्रह्मपक्षाचे बरेच प्राबल्य असावे असे इतर प्रमाणांवरूनही दिसते. छापी पंचांगामुळे दिवसेंदिवस पंचांग करणारेही जोशी दुर्मिळ होत चालले आहेत हा तोटा आहे, तरी सर्वत्र एकसारखी पंचांगें चालू लागली हा एका अर्थी फायदाही आहे. चंडूपंचांग ह्मणून एक पंचांग मारवाडी लोकांत चालते. तें जोधपूरची पलभा (६) आणि देशांतर धरून केलेले असते. या प्रकारची मुंबई एथे छापलेलीं कांहीं पंचांगें मजपाशी आहेत, त्यांत रवि आणि त्याच्या संक्रांति ब्राह्मपक्षाच्या असतात. व त्यांत अहर्गण दिलेला असतो तो करणकुतूहल ग्रंथावरून असतो. परंतु त्यांत दुसरा एक लघुअहगंण असतो व ग्रह करणकुतूहलावरून आणलेल्या ग्रहांशी जमत नाहीत व तिथ्यादिकांतही किंचित् भिन्नत्व आहे. यावरून करणकुतूहलास काही बीजसंस्कार देऊन एकादा ग्रंथ केलेला आहे व त्यावरून ते पंचांग करितात असे दिसते. काशी, ग्वाल्हेर, इत्यादि उत्तर हिंदुस्थानांतील पुष्कळ प्रांतांत मकरंद ग्रंथाचें फार प्राबल्य आहे. त्यावरून केलेले पंचांग त्या प्रांतांत तद्देशीय लोकांत चालतें (पृ. २५७ पहा). मद्रास एथे तैलंगी लिपीत छापलेले सिद्धांतपंचांग शक १८०९ चें मजपाशी आहे, ते सुमारें पलभा ३३ धरून केलेले आहे. यावरून व पूर्वी (पृ. ३८१) दिलेल्या त्याच्या हकीकतीवरून ते मद्रासच्या उत्तरेकडील तैलंगण प्रांतांत चालतें हैं स्पष्ट आहे. त्यांत रविसंक्रमणकाल दिले आहेत त्यांवरून त्यांतील रवि सूर्यसिद्धांतांतील आहे असे दिसते. परंतु बाकीचे ग्रह ग्रहलाघवी किंवा मकरंदी पंचा