पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/400

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४०१) पक्षांस ते ते सिद्धांत केवळ नांवाला आधारभूत आहेत असें पूर्वी त्या त्या सिद्धांतांच्या विचारांत दाखविलेंच आहे. ज्या ज्या वेधका ज्योतिष्यास ग्रहस्थितीस अंतर दिसून आले त्याने त्याने आपल्यास वाटतील तसे बीजसंस्कार वेळोवेळी कल्पिले आहेत. तेव्हां पक्षविशेषाविषयीं दुरभिमान बाळगणे व्यर्थ होय. या प्रांतांत छापलेले अगदी जुनें पंचांग शकवर्ष १७५३ चे माझ्या पाहण्यांत आले आहे. यावरून त्या सुमारास महाराष्ट्रांत पंचांग छापू पंचांगाचं गणित आ- . गत आ. लागले असे दिसते. मुंबई व पुणे एथे मराठी (बालबोध) णि प्रसिद्धि. लिपीची पंचांगें छापतात ती सर्व ग्रहलाघव आणि लघुचिंतामणि यांवरून केलेली असतात: लघुचिंतामणीवरून तिथिनक्षत्रयोगवटीप काढितात आणि बाकी गणित ग्रहलाघवावरून करितात. कोंकणांत लघुचिंतामणीपेक्षा बृहचिंतामणीचा प्रचार जास्त आहे. तीवरून आलेली तिथ्यादिवटीपळे कांहीं पळांनी सूक्ष्म असतात. मुंबई व पुणे एथील पंचांगें पलभा ४ आणि देशांतर पश्चिम ४० योजनें धरून केलेली असतात. बरीच वर्षे बहुतेक छापखान्यांत छापलेल्या पंचांगाचे गणित वसई येथील आबा जोशी नोघे हे करीत असत. सुमारे शक १७९८ पासून त्यांचे चिरंजीव पांडुरंग आवा हे करीत. शक १८१८ पासून त्यांचे चिरंजीव रामचंद्र पांडुरंग हे करितात. निर्णयसागर छापखान्यांतलें पंचांग बरीच वर्षे वस. ईचेच चिंतामाणि पुरुषोत्तम पुरंदरे जोशी हे करितात. हें व गणपत कृष्णाजीच्या छापखान्यांतलें पंचांग मोघे यांनी केलेले यांत कांहीं गणित इतरांहून किंचित् जास्त सूक्ष्म असते एवढेच. वस्तुतः मुंबई, पुणे, एथे छापलेली सर्व पंचांगे अगदी एकच होत. आणि ही सर्व महाराष्ट्रांत चालतात असें ह्मणण्यास हरकत नाही. मुंबईपुण्याची पंचांगें हैद्राबादसंस्थानांतील सर्व महाराष्ट्रभाषा बोलणान्या लोकांत आणि हद्दीवरच्या तैलंगी व कानडी मुलुखांतही खपतात असें बुकें विकणा-या पुष्कळांनी मला सांगितले आहे. महाराष्ट्रांत कांही जिल्ह्यांच्या मुख्य ठिकाणी कधी कधी पं. चांगें छापतात तीही ग्रहलाघवीच असतात. बेळगांव, धारवाड, या ठिकाणी छापलेली पंचांगें त्यांच्या आसपासच्या प्रांतांत चालतात, तीही ग्रहलाघवीच असतात. विजापूर, कारवार, या जिल्ह्यांत अहलाववी पंचांगच चालतें. मद्रास इलाख्यांतील बलारी जिल्ह्यांत हेच चालते. त्या इलाख्यांतील इतर कानडी जिल्ह्यांतही हेच पंचांग चालत असावे असे दिसते. व-हाड आणि नागपूर या प्रांतांत ग्रहलाघवी पंचांगच चालतें. इंदूर आणि ग्वाल्हेर या संस्थानांत सांप्रत सरकारी किंवा सरकारच्या आश्रयाने जी पंचांगें छापतात व जी अर्थातच त्या प्रांतांतल्या बऱ्याच किंबहुना सर्व लोकांत चालतात, तीही ग्रहलाघवी असतात. याप्रमाणे जेथें दक्षिणीलोकांचे प्राबल्य किंवा वस्ती बरीच आहे तेथे ग्रहलाघवी पंचांगें चालत असतील असें वाटते. मुंबई एथे " अखबारे सौदागर " छापखान्यांत गुजराथी लिपीत आणि गुजराथी व संस्कृत भाषेत छापलेलें एक पंचांग मजपाशी आहे, ते सर्वांशी मुंबईच्या मराठी पंचांगांप्रमाणे आहे. याप्रमाणेच मुंबईस छापून तेथे व इतरत्र गुजराथी लोकांत चालणारी सर्व पंचांगें असतील असे वाटते. नवसरी येथून एक मित्र लिहितो की " एथे मुंबईस छापलेल्यांशिवाय दुसरी पंचांगें चालत नाहीत. सुरतेकडेही मुंबईची पंचांगें चालतात.? काठेवाडांतून एक मित्र लिहितो की, “या प्रांतांत मुंबई