पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/399

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४००) नक्षत्रचक्राच्या आरंभाविषयी मागे (पृ. ३८६) सांगितलेच आहे. आतां या देशाच्या निरनिराळ्या भागांत कोणत्या प्रकारची पंचांगें चालतात याचा विचार करूं. बहुतेक प्रांतांतली पंचांगें मी पाहिली आहेत व निरनिराळ्या प्रांता- ती माझ्या संग्रहास आहेत. त्यांवरून सामान्यतः इतकें ह्मणतली पंचांगे. ण्यास हरकत नाही की, सर्व प्रांतांत एकाच पद्धतीची पंचांगें चालतात. त्यांत तिथिनक्षत्रयोगकरण यांची घटीपळे, संक्रमणकाल, स्पष्टग्रह, यांत थोडाबहुत फरक पडतो, तो, निरनिराळ्या प्रांतांतली पंचांगें सौर, ब्राह्म, आर्य या तीन पक्षांच्या निरनिराळ्या ग्रंथांस अनुसरून करितात यामुळे आहे. या तीन पक्षांविषयी पूर्वी (पृ. २४२) थोडेसे लिहिलेच आहे. ग्रहलाघवयंथांत (शक १४४२) हे तीन पक्ष अगदी स्पष्ट सांगितले आहेत. तीन पक्षः अमुक ग्रह अमुक पक्षाचा घेतला ह्मणजे मिळतो असें गणेश दैवज्ञाने सांगून त्याप्रमाणे ते घेतले आहेत. त्याच्या मताप्रमाणे सूर्यसिद्धांत, करणप्रकाश, करणकुतूहल हे अनुक्रमें सौर, ब्राह्म आणि आर्य या पक्षांचे ग्रंथ होत. (पृ. २६१ पहा). करणकुतूहलापूर्वीचा सर्वांशी त्यासारखा असा राजमृगांक ग्रंथ होता. मुहूर्तमार्तड नामक मुहूर्तग्रंथांतहि (शक १४९३) हे पक्ष स्पष्ट आहेत. तसेंच विश्वनाथी टीका इत्यादि ग्रंथांतही कोठे कोठे यांचे उल्लेख आढळतात. सांप्रतही या सर्व पक्षांचे अभिमानी ज्योतिषी आहेत. वैष्णवलोकांत आर्यपक्ष ग्राह्य मानतात. माध्व संप्रदायाच्या कृष्णामृतवाक्यार्थ ग्रंथांत विष्णोश्च जन्मदिवसाश्च हरदिनं च विष्णुव्रतानि विविधानि च विष्णुभं च । कायाणि चार्यभटशालत एव सवैः तसेंच "आर्यभटसिद्धांतसंमतकरणप्रकाशग्रंथः " ही वाक्ये आहेत असें सुधाकर लिहितात. स्मृत्यर्थसागर नामक धर्मशास्त्रग्रंथांत याच अर्थाची कांहीं स्फुट वाक्य आढळली. गणेश दैवज्ञाच्या वेळी या पक्षांचा अभिमान दृढ झाला होता ह्मणूनच सर्वांस संतुष्ट ठेवण्याकरितां त्याने अमक्या पक्षाचा अमुक ग्रह घेतला अशी युक्ति योजिली असे दिसते. एन्हवीं त्यास जे ग्रह घ्यावयाचे होते तेच “आर्यः सेषुभागः शनिः" अशा प्रकारे किंवा कांहीं बीजसंस्कार कल्पून एकाच ग्रंथांतून घेतां आले असते.राजमृगांक ग्रंथ शक ९६४ मधील आहे. लल्लोक्त बीज त्या पूर्वीचे सुमारे ३०० वर्षांचे आहे (तें आर्यसिद्धांतास देऊन करणप्रकाश झाला आहे.) आणि सांप्रतच्या सूर्यसिद्धांताचें प्राबल्यही लल्लाच्या काळाच्या सुमारासच झाले असावे. तव्हां हे पक्ष बरेच प्राचीन आहेत. परंतु राजमृगांक ग्रंथ *झाल्यापासून त्यांचा भद दृढ स्थापित होऊन त्यांचा विशेष अभिमान उत्पन्न झाला असावा. एकाच ग्रंथावरून गणित एक मनुष्य करूं लागला ह्मणजे त्याचे वंशज आणि शिष्य त्यावरूनच करणार. आणि त्यामुळे त्यांचा त्या ग्रंथाच्या पक्षाविषयी अभिमान वाढत जाणार हे साहजिक आहे. क्वचित् ह्या पक्षांच्या अभिमान्यांमध्ये परस्पर द्वेषही उत्पन्न झाला असेल असे वाटते. वस्तुतः ह्या पक्षांत भेद इतकाच की, त्यांची वर्षमानें व ग्रहगति किंचित् भिन्न असल्यामुळे सूर्यसंक्रमणास कांहीं घटिकांचा व ग्रहराश्यंतरास ग्रहांच्या शीघ्रमंद गतीप्रमाणे थोड्याबहुत दिवसांचा फरक पडतो. आणि त्या * ह्याच्या पूर्वीचा ह्याशी तुल्य एकादा ग्रंथ असल्यास अद्यापि माझ्या पाहण्यांत नाही.