पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/397

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३९८ ) पुणे कालेजांतल्या ज्या प्रतीवरून मी आपली प्रत उतरली आहे तींत ती आर्या ६२ व ६३ यांच्या मध्ये आहे. परंतु ती सोडून आयांचे अनुक्रमांक बरोबर आहेत. ह्मणजे त्या आर्येस अनुक्रमांक नाही. ती ज्या (२ न्या) अध्यायांत आहे त्यांत एकंदर ६७ आर्या आहेत असें ब्रह्मगुप्ताने शेवटीं मटले आहे. परंतु योगाची आर्या धरली तर ६८ होतात. आणखी त्या आर्येवर पृथूदकाची टीका नाहीं व पृथूदक टीकेच्या पुस्तकांत ती आर्या नुसती देखील दिलेली नाही. आणखी असें की तिथिनक्षत्रकरण हे शब्द एकत्र असे ब्रह्मगुप्ताच्या लिहिण्यांत पुष्कळ वेळा आले आहेत, परंतु त्यांत योग हा शब्द कोठेच नाही. ते उल्लेख असे: संक्रांतिभतिथिकरणव्यतिपातायंतगणितानि ॥ ६६॥ ज्यापििधस्पष्टीकरणदिनगतिचरार्धभतिथिकरणेषु ॥ ६७ ॥ अध्याय.२ संक्रांतेरायंतौ ग्रहस्य यो राशिभतिथिकरणांतान् ॥ व्यतिपातायंती वा यो वेत्ति स्फुटगतिज्ञः सः ॥ ६ ॥ एवं नक्षत्रांतानिथिकरणांताच्छशिप्रमाणार्धात् ॥ ३१ ॥ अध्याय. १४ याप्रमाणे ब्रह्मसिद्धांतांत चार स्थळी नक्षत्रतिथिकरणांचा उल्लेख एकत्र असून त्यांत योग नाहीत. खंडखाद्य ग्रंथात योग काढण्याविषयी एक आयी हल्ली आहे, परंतु ती वरीलप्रमाणेच प्रक्षिप्त होय. बेरुणीने खंडखाद्यांतल्या पुष्कळ गोष्टी दिल्या आहेत, परंतु योग दिले नाहीत. करणतिलकांत २७ योग आहेत असें तो ह्मणतो. खंडखायांत योग काढण्याची रीति असती तर योगांविषयीं खंडखायाचा आधार दि. ल्यावांचून बेरुणी राहता ना. यावरून ब्रह्मगुप्ताच्या वेळी योग नव्हते. अथर्वज्योतिषांत अमुक मुहूर्त, तिथि, करणे, यांवर अमुक कर्मे करावी असें सांगितले आहे. त्यांत योगांवरची कर्मे सांगितली नाहीत; व पुढे बदले आहे की चतुर्भिः कारयेत्कर्म सिद्धिहेतोविचक्षणः ।। तिथिनक्षत्रकरणमुहूर्तनेति नित्यशः ।। यांत शुभ कर्म करण्यास तिथिनक्षत्रकरणमुहूर्त हीच सांगितली आहेत, यागे नाहीत. परंतु पुढे तिथिरेकगुणा प्रोक्का नक्षत्रं च चतुर्गणं ।। वारश्चाष्टगुणः प्रातः करणं षोडशान्वितं ॥ ९ ॥ द्वात्रिंशद्गुणों योगस्तारा षष्टिसमन्विता ।। चंद्र ः शतगुणः प्रोक्तः ॥ ९१ ॥ यांत योग शब्द आला आहे. परंतु त्याचा अर्थ अमुक नक्षत्री अमुक वार असेल तर अमुक,योग होतो असे २८ योग फलग्रंथांत आहेत, तशांतला काही असावा. किंवा तो श्लोक प्रक्षिप्त असावा. ऋगृह्यपरिशिष्टांत योग नाहींत. लल्लाच्या धीवृद्धिदतंत्रांत योग आहेत; परंतु ते प्रक्षिप्त असावे किंवा त्याच्या वेळी त्यांच्या प्रांतांत नुकतेच प्रचारांत आले असावे. एकंदरीत शके ६०० पर्यंत

  • इंडिया, भाग २ पृ० २०९