पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/396

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३९७ ) झाले हे समजत नाही. तेव्हां वार कोठे उत्पन्न झाले हे निश्चयाने सांगता येत नाहीं. कदाचित् ते ग्रीसांत झाले असतील. पण या तीन देशांहून इतरत्र ते झाले नाहीत. इतर राष्ट्रांत वारांचा प्रचार किती प्राचीन आहे हे पाहूं गेलें तर याविषयीं कनिंघम लिहितो की " (रोमन लोकांतला) टिब्युलस हा इ. स. पू. २० मध्ये शनिवाराचा उल्लेख करितो. तसेंच जुलिअसफंटिनस (इ. स. ७० पासून ८०) ह्मणतो की जरुसलेम शनिवारी घेतले. यावरून रोमनलोकांनी इ. स. च्या आरंभाच्या सुमारास वारपद्धति स्वीकारली होती. परंतु त्या सुमारास किंवा त्यापूर्वीच इराणी लोकांस आणि हिंदुलोकांस वार माहीत होते. सेलसस हा आगस्टस (इ. स.पू. २७) आणि टायबेरिअस या रोमन राजांच्या कारकीदीत होता. तो ह्मणतो की इराणांतील देवळांस सात ग्रहांच्या नांवांची दारे असत, आणि त्या ग्रहांस प्रिय जे धातु व रंग ते त्या दारांचे असत." आमच्या देशात आजपर्यंत अनेक ताम्रपट व शिलालेख सांपडले आहेत. त्यांत वाराच्या प्राचीनतम उपयोगाचे उदाहरण शके ४०६ मधील आहे. मध्यप्रांतांतील एरन एथे बुधगुप्त राजाचा एक शिलालेख एका स्तंभावर आहे. तो गुप्तवर्ष १६५ झणजे शक४०६ आषाढ शुक्ल १२ गुरुवार या दिवशींचा आहे. ज्या ग्रंथाचा काल याच्या पूर्वीचा असें प्रत्यक्ष त्या ग्रंथांत लिहिले आहे असा ज्योतिषाचा एखादा पौरुष ग्रंथ सांप्रत उपलब्ध नाही. "करण आकाशांतील ग्रहांची कोणती स्थिति दाखवितात हे काही समजत नाही, यांचा उपयोग फलग्रंथांस मात्र आहे." असें केरोपंतनाना ह्मणतात; परंतु ते बरोबर नाही. तिथीचे अर्ध करण होय. तिथि जशी चंद्रसूर्यांमध्ये १२ अंश अंतर वाढले असें दाखविते, तसे करण ६ अंश अंतर वाढले असे दाखविते. आणखी करण सुमारे ३० घटिका असते, यामुळे तो एक प्रकारचा योग्य कालविभाग आहे. केरोपंतांनी करणांविषयी मटले आहे तसें विष्कंभादि २७ योगांविषयी मात्र ह्मणतां येतें. एक मनुष्य पुण्यापासून १० कोसांवर आहे आणि दुसरा २० कोस आहे. दोघांची बेरीज ३० कोस झाली. या ३० कोसांनी दोघांपैकी कोणाचीही स्थिति समजण्यास काही उपयोग नाही. आणि योग हे अंग पंचांगांत इतरां च्या मागाहून बऱ्याच शतकांनी शिरले असे मला वायोग केव्हां उत्पन्न झाले. टते. पंचसिद्धांतिकेंत तिथिनक्षत्रे काढण्याची रीति असुन योग काढण्याची नाही. तसेंच बृहत्संहितेंत नक्षत्रांच्या फलांचा पुष्कळ विचार असून योगांचा काहीच नाही. यावरून वराहमिहिराचे वेळी योग नव्हते असें मला वाटते. आर्यभटानें तिथिनक्षत्रे काढण्याची रीति दिली नाही यावरून त्याच्या संबंधे योगांविषयीं कांहीं ह्मणतां येत नाही. ब्रह्मगुप्ताने ब्रह्मसिद्धांतांत तिथिनक्षत्रे काढण्याची रीति दिली आहे, तेथे योग काढण्याची एक आर्या आहे. परंतु

  • इंडि. आंटिक्क. पु. १४ पृ. २-४ W+ कोणत्या ग्रहाला सोने इत्यादि कोणता धातु आणि कोणता रंग प्रिय हे आमच्या ग्रंथांतही सांगितलेले असते. कोणी गृहस्थ सात वारी निरनिराळ्या सात रंगांची पागोटी घालितात हे मसिद्ध आहे.

म. सा. को. १. १६३.