पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/395

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३९६ ) नाही. यावरून होरा या कालविभागापासूनच वारांची उत्पत्ति होय. आणि तो विभाग व होरा हा शब्द मूळचा आमचा नाही. वारांच्या उत्पत्तीचा संबंध होरा या पदार्थाशी आहे, तसाच तो याहून फार महत्वाच्या दुसऱ्या एका गोष्टीशी आहे. होराधिप शनि, गुरु इत्यादि क्रमाने मानितात हे मागे सांगितलेच आहे. तेव्हां ज्याने होराधिप ठरविले त्यास पृथ्वीभोवती फिरणाऱ्या ग्रहांचा चंद्र, बुध, शुक्र इत्यादि अनुक्रम माहित होता, अर्थात् ग्रहगतीचे बरेच ज्ञान होतें. ज्योतिषाच्या प्राचीन इतिहासांत ही गोष्ट फार महत्वाची आहे. आमच्या ज्योतिषगणितग्रंथांत ग्रहगति सांगितल्या असतात, त्या रवि, चंद्र, मंगळ, अशा झणजे वारांच्या क्रमाने असतात; चंद्र, बुध, शुक्र, अशा क्रमाने नसतात. वार प्रचारांत येण्यापूर्वी गत्यनुसारी ग्रहक्रमाचें ज्ञान झाले असते तर चंद्र, बुध, शुक्र या क्रमानें गति आल्या असत्या, रवि, चंद्र, मंगळ या क्रमाने आल्या नसत्या; परंतु तशा त्या आहेत. यावरून ग्रहक्रमज्ञानाच्यापूर्वी वारक्रमाचें मनावर ठसलेलें महत्व किंबहुना पूज्यत्व हेच त्या गोष्टीचे कारण होय. दुसरें असें की ज्योतिषसंहिताग्रंथांत ग्रहचारप्रकरणांत रवि, चंद्र, मंगळ अशा क्रमानेच वर्णन असते. काही तरी संहिताग्रंथ सूर्यसिद्धांतादि गणितग्रंथांहून प्राचीन आहेत. आणि वारोत्पत्तीस अवश्य इतकें ग्रहगतिज्ञान त्या संहिताग्रंथांत दिसून येत नाही. तेव्हां या दोन गोष्टी आणि होरा हा कालविभाग आमचा नव्हे ही गोष्ट यांवरून वारांची उत्पत्ति आमच्या देशांतली नव्हे असें सिद्ध होतें. वरील गोष्टींत एक गोष्ट गर्भित होते की गत्यनुसारी ग्रहक्रमाचे ज्ञान आमच्या लोकांस स्वतंत्रपणे झाले असले तरी त्यापूर्वी तें परदेशांत झाले होतें. पृथ्वीवर हल्ली जेथे वार प्रचारांत आहेत तेथे ते सातच आहेत. आणि त्यांचा क्रमही सर्वत्र एकच आहे. यावरून वारांची उत्पत्ति कोठे तरी एकाच ठिकाणी झाली असली पाहिजे. कोणी युरोपियन विद्वान् ह्मणतात की ती इजिप्त देशांत झाली. कोणी ह्मणतात खाल्डियांत झाली. कनिंघम लिहितो की * "डायन काशिअस (इ. स. २००) लिहितो की वारांची पद्धति इजिप्त देशांतली आहे. परंतु इजिप्तचे लोक महिन्याचे विभाग ७ दिवसांचा आठवडा असे करीत नसत, तर दहा दहा दिवसांचा एकेक असे भाग करीत," यावरून वार मूळचे इजिप्तचे नव्हत असें ह्मणतां येईल; परंतु त्या देशांतली प्राचीन लिपि आणि प्राचीन भाषा यांत निष्णात असा रेनुफ नामक विद्वान् आपल्या इ. स. १८९०च्या पुस्तकांत लिहितो की अहोरात्राच्या होरा अथवा होरस् ह्या इजिप्त देशांत देवता होत्या. यावरून होरा हा शब्द आणि तो कालविभाग प्राचीन इजिप्तांत होता है निःसंशय आहे. यावरून तेथे वार उत्पन्न होण्याचा संभव आहे. होरा हा शब्द ग्रीक असें हल्ली समजतात. परंतु तो कालविभाग बाबिलोनच्या ह्मणजे वस्तुतः खाल्डियाच्याच लोकांपासून ग्रीकांस मिळाला असें हिराडोटस (इ. स. पू. ५वे शतक) लिहितो (पृ. ३४९ पहा ). गत्यनुसारी ग्रहक्रमाचें ज्ञान खाल्डिया आणि इजिप्त या दोहोंपैकी एकाया राष्ट्रास होते की काय, असल्यास कोणास होते व ते प्रथम कोणास

  • Indian Antiquary, XIV, p. 1-4. माझें धर्ममीमांसा पुस्तक, भौतिकधर्म, पृ. १२७.