पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/394

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३९५) नक्षत्रे, तिथींच्या नंदादिसंज्ञा, दिनक्षय ही आली असून वार मात्र आहेत, मेषादि राशि नाहींत. हे तीनही ग्रंथ मेषादि संज्ञा प्रचारांत येण्यापूर्वी झाले. आणि ते एककालींच झाले असतील असे नाही. यावरून मेषादि संज्ञांच्या अगोदर काहीं शतकें तरी वार प्रचारांत आले. वार आणि मेषादि संज्ञा मूळ कोठेही उत्पन्न होवोत, त्या सर्वत्र पसरावयास फार अवकाश लागावयाचा नाही. कारण त्यांत गणिताची वगैरे भानगड कांही नाही. यावरून वार आणि मेषादि संज्ञा कोठेही उत्पन्न झाल्या असोत, त्या आमच्या देशांत एककाली प्रचारांत आल्या नाहीत. आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे मेषादिकांपूर्वी सुमारे ५०० वर्षे झणजे शका पू. १००० वर्षे या काली वार आमच्या देशांत प्रचारांत आले असावे. निदान श. पू. ४०० याहून ते अर्वाचीन नाहीत.* करण हा कालविभाग तिथीवरून सहज सुचण्यासारखा आहे. यामुळे तो तिथीनंतर लवकरच आणि वारांपूर्वीच प्रचारांत आला असावा. वेदांगकालच्या ज्या ग्रंथांचा विचार झाला त्यांपैकी अथर्व ज्योतिष, याज्ञवल्क्यस्मृति आणि ऋक्गृह्यपरिशिष्ट ह्यांत मात्र वार आहेत. आणि या तिहींपैकी याज्ञवल्क्य स्मृतीत करणे नाहीत, बाकी दोहोंत ती आहेत. यावरून वारांपूर्वी करणे प्रचारांत आली नसतील असें मनांत येते. तसे असल्यास दोन्ही बहुधा एककालींच प्रचारांत आली असतील. अथवा करणें वारांच्या मागाहून लवकरच आली असतील. शकापूर्वी ४०० याहून ती अर्वाचीन नाहीत. शनिवार, रविवार, सोमवार असा जो वारांचा क्रम आहे त्याची उपपत्ति मागे (पृ. १३७) सांगितली आहे. तीवरून दिसून येते की त्या क्रमाला होरा हा कालविभाग कारण आहे. कदाचित् वारांची उपपत्ति आणखी अशी करितां येईल की चंद्रापासून ऊर्ध्वक्रमाने घटिकाधिपति मानले तर पहिल्या दिवसाच्या प्रथम घटिकेचा अधिप चंद्र घेतला असतां दुसन्याच्या प्रथम घटीचा मंगळ होतो. ह्मणजे चंद्रापासून ५ वा दिनाधिप होतो. आणि वराहमिहिराने उर्ध्वक्रमेण दिनपाश्च पंचमाः ॥४०॥ पं. सि. त्रैलोक्यसंस्थान. यांत 'पांचवा दिनाधिप । असेंच झटले आहे. परंतु वराहमिहिरादिकांनी होराधिप सांगितले आहेत, तसे घटिकाधिप कोणी सांगितले नाहीत. अर्थात् घटिकाधिपांवरून दिनाधिपांची आणि वारांची उत्पत्ति कोणीच सांगितली नाही. आणखी असें की या पद्धतीत सोमवार पहिला येतो. परंतु सोमवार पहिला कोठेच

  • रोमक सिद्धांताचा काळ अगदी अर्वाचीन मटला तरी तो शकारंभानंतर नाही. त्याच्या पूर्वीचे सूर्यादिक प्राचीन ४ सिद्धांत, त्यांच्यापूर्वी ज्योतिषसंहिता आणि त्यापूर्वी मेषादि संज्ञा. तेव्हां मेषादिसंज्ञाप्रचाराचा काळ अगदी अर्वाचीन झटला तरी श. पू. ३०० याहून अर्वाचीन नाही. त्यापूर्वी १०० वर्षे तरी वार.

महाभारतांत मेषादि संज्ञा नाहीत, त्यांच्या पूर्वीचे वार नाहीत आणि करणेही नाहीत. तेव्हां महाभारतरचनाकाल अगदी अर्वाचीन हाटला तरी श. पू. ४०० याहून अर्वाचीन नाही. ऋक्गृह्यपरिशिष्ट, अथर्वज्योतिष, याज्ञवल्क्यमात, यांचा काल शका. पू. ३०० याहून अर्वाचीन नाही.