पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/393

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३९४). मध्यरात्रीपूर्वी संक्रांति झाली तर त्याच दिवशी आणि नंतर झाली तर दुसऱ्या दिवशी मासारंभ आहे. कलकत्ता हायकोर्टाच्या हुकमानें एक कोष्टक ( Chronological Tables) दरसाल छापत असते. त्यांतील इ. सन १८८२।१८८३ च्या पुस्तकांत विलायती सनाच्या महिन्याचा आरंभ याच नियमाने केला आहे. आतां पंचांगाच्या मुख्य पांच अंगांचा विचार करूं. तिथि, वार, नक्षत्र, योग आणि करण ही पंचांगाची पांच अंगें मानितात. सूर्यपंचांगाची अंगें. चंद्र आकाशांत एके ठिकाणी येतात, ह्मणजे त्यांचे भोग सारखे होतात, तेव्हां अमावास्येचा अंत होतो. पुढे सूर्यापेक्षां चंद्राची गति जास्त असल्यामुळे सूर्याच्या पुढे चंद्र जातो. त्या दोघांमर्थ्य १२ अंश अंतर पडण्यास जो काळ लागतो त्यास तिथि ह्मणतात. अर्थात् सूर्यचंद्र पुनः एकत्र होत तोपर्यंत, ह्मणजे एका चांद्रमासांत, (३६० - १२ =)३० तिथि होतात. चंद्रसूर्यांमध्ये ६ अंश अंतर पडण्यास जो काळ लागतो तें करण, वार सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत मोजतात. एकेक भाग ८०० कलांचा असे नक्षत्रमंडळाचे २७ भाग करून त्या प्रत्येक भागास, आणि तो ऋमिण्यास चंद्रास जो काळ लागतो त्यास, नक्षत्र ह्मणतात. आणि चंद्रसूर्याच्या भोगांची बेरीज (योग) करून तिजवरून ८०० कला बेरीज होण्यास जो काळ लागतो त्यास योग ह्मणतात. आमच्या लोकांत पंचांग करण्याची वहिवाट फार प्राचीन काळापासून आहे. पांच अंगें केव्हां के- ज्योतिःशास्त्राचे थोडेबहुत ज्ञान झाले तेव्हांपासून पंव्हां प्रचारांत आली. चांगाचा प्रचारं आहे असें ह्मणण्यास हरकत नाही. प्राचीन काळचे पंचांग आतांप्रमाणेच होते असें नाहीं, हे उघड आहे. ते पंचांगांबद्दल कधीं चतुरंग, व्यंग, द्वयंग किंबहुना एकांगही होते. आणि लिपिज्ञान होण्यापूर्वी. त्याचे ज्ञान तोंडींच परस्परांस करून देत असतील. परंतु ज्योतिःस्थितिदर्शक असें कांहीं तरी फार प्राचीन कालापासून चालत आले आहे. त्यास आपण ज्योतिदर्पण असें नांव देऊ. अमुक दिवस, नक्षत्रे, ऋतु, यांवर अमुक कृत्य करावी, असें वेदांतही आहे. त्यावरून ज्योतिर्दर्पण फार प्राचीन आहे हे स्पष्ट आहे. त्याचे पहिले अंग सावन दिवस हे होय. सांप्रत सावन दिवसाबद्दल वार हे अंग आहे. सावन दिवसानंतर नक्षत्रज्ञान झाले, आणि नक्षत्र हे दुसरे अंग बनले. पुढे तिथिज्ञान झाले. वेदांगज्योतिषकालीं ह्मणजे शकापूर्वी १४०० वें वर्ष या काली तिथि आणि नक्षत्रे किंवा सावन दिवस आणि नक्षत्रे ही दोनच अंगें होती. तिथि सुमारे ६० घटिका असते. ह्मणजे ती अहोरात्रदर्शक ह्मणावयाची. त्याप्रमाणे नुस्ता दिवस किंवा नुसती राव यांचे दर्शक ह्मणजे तिथ्यमित जें करण ते अंग तिथीनंतर लवकरच प्रचारांत आले असावें. आणि त्यानंतर वार आले असावे. अथर्वज्योतिषांत करणे आहेत आणि वारही आहेत. शकापूर्वी ५०० वर्षे ह्या काली मेषादि संज्ञा आमच्या देशांत प्रचारांत आल्या असाव्या असें मागें (पृ. १३८९) दाखविले आहे. राशींपूर्वी कांहीं शतकें वार आले असें अथर्वज्योतिष आणि याज्ञवल्क्यस्मृति यांवरून दिसते असेंही मागे सांगितले आहे. (पृ. १०६). याविषयी तिसऱ्या एका ग्रंथाचे प्रमाण आढळते. ऋगृह्यपरिशिष्टांत तिथि, करण, मुहूर्त,