पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/392

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चैत्र. चैत्र ज्येष्ठ (३९३) वास्तवपूर्णिमान्त अमान्त फाल्गुन [१ शुक्लपक्ष] मेघेकः[२ कृष्णपक्ष ] मेषेर्कः [३ शुल अधिमास. वैशाख [४ कृष्ण ] वृषेकः [५ शुक्ल ] वृषेर्कः वैशाख. ६ कृष्ण ] ट मिथुनेकः । ७ शुक्ल ] मिथुनेर्कः ज्येष्ठ. या उदाहरणांत वास्तविक पूर्णिमान्त मानाने आधिमास मुळीच येत नाही. कारण पूर्णिमेस संपणाच्या प्रत्येक महिन्यांत संक्रमण झालेले आहे. परंतु अमान्त मानाने तिसरा पक्ष आणि चवथा पक्ष मिळून अधिमास आहे. आणि तोच सांप्रत नर्मदोतर भागी आधिमास मानतात, यांत अशी मौज होते की अधिकाच्या पूर्वी व नंतर शुद्धाचा एकेक पक्ष असतो. ह्मणजे वरील आकृतींतील दुसरा पक्ष हा शुद्ध (आधिक नव्हे असा)वैशाख कृष्ण, पुढे तिसरा व चवथा पक्ष आधिकाचे आणि पुनः पांचवा पक्ष हा शुद्ध वैशाख शुक्ल असें होतें.* सांप्रत असे आहे. परंतु वराहमिहिराच्या वेळी ज्या पूर्णिमांत मासांत मेषसंक्रमण होईल, मग ते शुक्लांत होवो किंवा कृष्णांत होवो, तो चैत्र, अशी पद्धति होती, असे पंचसिद्धांतिकाविचारांत दाखविलेंच आहे. मासारंभ-तिथीचा आरंभ आणि सूर्याचे संक्रमण (राश्यंतर) ही दिवसांत कोणतेही क्षणी होऊ शकतात. आणि त्याच वेळी यथाक्रम चांद्र आणि सौर या मासांचा आरंभ वस्तुतः होतो. परंतु व्यवहारांत मासारंभ सूर्योदयीं धरणे सोईचे असते. ह्मणून प्रतिपदा तिथि ज्या दिवशी सूर्योदयीं असेल त्या दिवशी चांद्रमासारंभ मानितात.प्रतिपदा दोन दिवस उदयीं असेल तर पहिल्या दिवशी आरंभ मानितात. सौरमासारंभाचे निरनिराळे नियम प्रचारांत आहेत. ते असे:-(१)(अ) बंगाल्यांत सूर्योदय आणि मध्यरात्र यांच्यामध्ये संक्रमण झाले तर पर्वकाळ त्याच दिवशीं मानून मासारंभ दुसरे दिवशीं करितात. संक्रमण मध्यरात्रीनंतर सूर्योदयापूर्वी झाले तर पर्वकाळ दुसरे दिवशी धरून मासारंभ तिसरे दिवशी मानितात. (ब) ओढिया प्रांतांत अमली आणि विलायती सनांच्या महिन्यांचा आरंभ संक्रमणदिवशींच होतो; मग संक्रमण कोणत्याही वेळी होवो. (२) मद्रास इलाख्यांतही दोन निरनिराळे नियम आहेत. (अ)तामिळ प्रांतांत संक्रमण सूर्यास्तापूर्वी झालें तर त्याच दिवशी आणि अस्तानंतर झाले तर दुसऱ्या दिवशी मासारंभ मानितात. (ब) मलबार प्रांतांत संक्रमण अपराह्रारंभापूर्वी झाले तर त्याच दिवशी आणि नंतर झाले तर दुसरे दिवशी मासारंभ करितात. हे चार नियम त्या त्या प्रांतांतल्य पंचांगांवरून आणि इतर माहितीवरून लिहिले आहेत; परंतु ह्यांस अपवाद नसेल असें नाहीं. मद्रास एथे छापलेल्या शक १८१५ च्या एका तामिळ पंचांगांत

  • नांवांत दिसणारा हा अव्यवस्थितपणा टाळण्याकरितां या उदाहरणांतील दुसरा आणि तिसरा पक्ष मिळून झालेल्या महिन्यास पहिला वैशाख, आणि चवथा पांचवा मिळून दुसरा वैशाख असें ह्मणतात

त्रिचनापल्लीजवळील श्रीरंगमच्या उत्तरेस ५ मैलांवर कन्ननूर एथे देवळांत एक शिलालेख शाक ११९३ चा आहे, त्यांत (२) अ, ब यांतला एक नियम आहे असे सिद्ध झाले आहे. Epigraphia Inica. III. p. 10 पहा.