पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/388

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३८९) (गत) ता०१७ जून ८०३ रोजी होतो. आणि पुढे तारण संवत्सर आषाढ शुक्ल प्रतिपदा बुधवार ता० १२ जून ८०४ रोजी लागतो. मणजे ताम्रपटले खांतल्या दि वशी सुभानु होता. यावरून शक ७२६ पर्यंत वास्तव बाहदक्षि त्य स्पत्य मान दक्षिणेत चालत होते. निदान तुंगभद्रेच्या कांठसंवत्सर. च्या प्रदेशांतला हा लेख आहे त्या प्रदेशांत तरी चालत होते, असे सिद्ध होते. दुसरीही अशी काही उदाहरणे आहेत. वास्तविक वार्हस्पत्य मानाने संवत्सरारंभ चैत्रशुक्ल प्रतिपदेस होत नाहीं; आणि ८५ वपांत एकसंवत्सराचा लोप होतो; ही भानगडाचा पद्धति सोडून नेहमी चांद्र किंवा सौर वर्षाबरोबर संवत्सरारंभ करणे ही साधी पद्धति स्वीकारावयाचा कल होणे हे स्वाभाविक आहे. त्याप्रमाणे, किंवा दर ८५ वर्षांनी एका संवत्सराचा लोप करण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे दक्षिणेतील पद्धति सुरू झाली असावी. आणि वास्तव बार्हस्पत्य मानानें जो संवत्सर येतो तोच सांप्रतच्या दक्षिण पद्धतीने ज्या काली येत होता त्या काली चांद्रसौरपद्धति दक्षिणेत प्रचारांत आली असावी हे उघड आहे. शक ७४३ पासून ८२७ पर्यंत दोन्ही पद्धतींनी एकच संवत्सर येत असे. पुढें उत्तरेकडे नियमाप्रमाणे एक संवत्सराचा लोप व्हावयाचा त्याप्रमाणे केला, आणि दक्षिणेत करण्याचे बंद झाले, यामुळे दक्षिणेतील संवत्सर मागे पडूं लागले.शक १८१८ च्या आरंभी दक्षिणेत दुर्मुख झणजे ३० वा संवत्सर आहे, आणि उत्तरे. कडे ४२ वा कीलक संवत्सर आहे. असो; सारांश शक २७ पासून दक्षिणेत चांद्रसौर संवत्सर सुरू झाले. पूर्णिमान्त आणि अमान्त मास-वेदकाली मासांच्या पूर्णिमान्त आणि अमान्त ह्या दोन्ही पद्धति होत्या असें पहिल्या भागांत दाखविलेंच आहे (पृ. ४१). सांप्रत नर्मदोत्तर भागी पूर्णिमान्त आणि दक्षिणभागी अमान्त मान चालते. परंतु कार्तिक स्नानें इत्यादि कांहीं धर्मकृत्यांत दक्षिणेतही पूर्णिमान्त मान घेतात. वर षष्ठिसंवत्सरचक्रविचारांत शकवर्ष ७२६ मधले एक उदाहरण दिले आहे, त्यावरून त्यात दक्षिणेत किंवा तुंगभद्रेपर्यंत तरी पूर्णिमान्त मान नेहमींच्या प्रचारांत होते. त्या काला च्या पूर्वीचीही काही उदाहरणे या प्रकारची आहेत. हरिहर राजाचा मंत्री मा. धवाचार्य (विद्यारण्य ), याचा ताम्रलेख *आहे त्यांत “शक १३१३ वैशाखमा कृष्णपक्षे अमावास्यायां सौम्यदिने सूर्योपरागपुण्यकाले" असें आहे. त्यांत पणि मान्त मानाच्या वैशाखाने मात्र अमावास्येस बुधवार आणि ग्रहण येते; अमीर मानाने येत नाही. यावरून शकाच्या १४ व्या शतकांत देखील दक्षिण हिंदुस्थान पूर्णिमांत मानाचा उपयोग कधी कधी करीत असे दिसते. सांप्रत उत्तर हिंदुस्थानांत पूर्णिमान्त मान चालतें खरें, तरी मासास नांव दर आणि अधिक मास धरणे या गोष्टी अमांत मानानेच चालतात. याविषयी कि वेचन पुढे केले आहे. जेथे मास सौर आहेत तेथे पूर्णिमान्त अमान्त हा विचा रच नाहीं हे सांगावयास नकोच.

  • Memoirs of Savantvadi State, p. 287.