पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/387

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३८८) आहे.) तसेंच दक्षिणेतील मृगवर्मा नांवाच्या कदंब राजाचे दोन लेख सापडले आहेत, त्यांतही असे संवत्सर आहेत. वेदांगज्योतिषांतील युग पांच वर्षांचे आहे, त्याप्रमाणे गुरूच्या ५ वर्षांचे एक युग कल्पिलें. अर्थात् त्यांत सुमारे ६० सौर वर्षे आली. आसाठ संवत्सर, णि त्यांच्या संवत्सरांस प्रभव इत्यादि नांवें ठेविली. या प्रमाणे षष्टिसंवत्सरचक्र उत्पन्न झाले. हे अर्थातच द्वादशसंवत्सरचक्राच्या मागाहून उत्पन्न झाले असावें. वर्षसंख्या मोजण्यास हे त्याहून जास्त सोईचे आहे. प्रथम ह्याचेही संवत्सर गुरूच्या उदयापासून मोजीत असत. परंतु पुढे ती पद्धति सोडून गुरूच्या मध्यमराशिभोगकालावरून ते मोजू लागले. गुरूला मध्यमगतीने एक राशि कमिण्यास सूर्यसिद्धांताप्रमाणे ३६० दि. 1 घ. ३६ प. लागतात.* हे एका बार्हस्पत्य संवत्सराचें मान सौरवर्षाहून थोडेसें कमी आहे. झणून सुमारे ८५ सौरवर्षांत ८६ बार्हस्पत्य संवत्सर होतात. ह्मणजे एका बार्हस्पत्य संवत्सराचा लोप होतो. तसेंच वर्षांत कोणत्याही दिवशी याचा आरंभ होऊ शकेल हे उघड आहे. ह्या संवत्सराची दुसरी एक पद्धत आहे. तींत संवत्सराचा लोप मुळीच करीत नाहीत. झणजे सौरवर्षाइतकेंच त्या संवत्सराचें मान मानल्यासारखे होते. आणि त्यामुळे त्या संवत्सरास सौरसंवत्सर, किंवा चांद्रवर्षांबरोबर त्याचा आरंभ होतो, ह्मणून चांद्र संवत्सर ह्मणतात. सांप्रत नर्मदेच्या उत्तरेस बार्हस्पत्य संवत्सर चा लतात आणि नर्मदेच्या दक्षिणेस चांद्रसौर संवत्सर चालचांदसौर संवत्सर. तात. नर्मदेच्या दक्षिणेस चालणान्या संवत्सरासही कोणी बार्हस्पत्य संवत्सर ह्मणतात, परंतु ती चूक आहे. आतां त्यांमध्ये बार्हस्पत्यत्व राहिले नाही. दक्षिणची ही पद्धति मूळची नव्हे. सांप्रतचा रोमशसिद्धांत आणि शाकल्योक्त ब्रह्मसिद्धांत यांत मात्र चांदसौर संवत्सरपद्धतीचा उल्लेख आहे. परंतु ते ग्रंथ इतर ज्योतिषसिद्धांतांइतके प्राचीन नाहींत. इतर सर्व सिद्धांतांत संवत्सर बार्हस्पत्य मानाचे मात्र सांगितले आहेत. ज्योतिष ग्रंथांत सावनादि निरनिराळी माने सांगितलेली असतात त्यांतही बार्हस्पत्यमान संवत्सरांकरितां असें झटले असते. दक्षिणेतही पूर्वी बार्हस्पत्यसंवत्सर चालत असत असें ताम्रपटादि प्राचीन लेखांवरून सिद्ध होतें. उदाहरणार्थ, शकवर्ष ७२६ सुभानु संवत्सर, वैशाख मास, शुक्ल पक्ष, पंचमी, बृहस्पतिवार, या दिवशींचा एक ताम्रपट राष्ट्रकूट राजा तिसरा गोविंद याचा । सांपडला आहे. त्याचे गणित करून पाहतां शक ७२६ हे गतवर्ष धरून अमांत मानाने वैशाख कृष्ण ५ ही तिथि शुक्रवार तारीख ३ मे ८०४ रोजी व पूर्णिमांत मानाने गुरुवार ता०४ एप्रिल ८०४ रोजी येते. ह्मणजे पूर्णिमांत मानाने लेखाशी मेळ बसतो. ७२६ हे वर्तमान वर्ष धरून मेळ बसत नाही. शक ७२६ या वर्षी सांप्रतच्या दक्षिणेतील पद्धतीप्रमाणे १८वा तारण संवत्सर येतो. परंतु लेखांत सुभानु (१७ वा) आहे. नर्मदेच्या उत्तरेकडील झणजे खऱ्या बार्हस्पत्य मानाने सुभानु संवत्सरारंभ अधिक आषाढ कृष्ण ९ शनवार शक ७२५

  • इतर सिद्धांतांप्रमाणे काही पळे कमजास्त होतात. 1 ईडि.भांटिकरि. पु. १११. १२६ पहा.