पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/386

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३८७) नक्षत्रचक्राचा आरंभ क्रमाने मागे घेण्याची परंपरा चालत आली आहे असे दिसत नाहीं. संवत्सर-हा शब्द मूळचा वर्ष याअर्थीच आहे. परंतु प्रभव इत्यादि ६० नांवें अनुक्रमानें वर्षांना देण्याची एक पद्धति आहे, त्या नांवांसवन्तर सही संवत्सर ही संज्ञा लावितात. ह्या संवत्सरांची उत्पत्ति बृहस्पतीच्या गतीवरून झाली, ह्मणून ह्यांस बार्हस्पत्य संवत्सर ह्मणतात. बृहस्पतीची नक्षत्रमंडळांतून एक प्रदक्षिणा सुमारे १२ वर्षांनी होते, असे कळून आल्यावर ह्या संवत्सरांची उत्पत्ति झाली असली पाहिजे. सूर्याच्या एका प्रदक्षिणेस जो काळ लागतो त्यास वर्ष हे नांव असून त्याच्या १२ भागांस मास ह्मणतात. त्याप्रमाण गुरूचा प्रदक्षिणाकाल हे एक गुरुवर्ष आणि त्याचा जो सुमारे १२ वा भाग तो गुरुमास अशी पद्धति प्रथम सुरू झाली असावी. चांद्रद्वादशसंवत्सरचक. रचतः मासांची चैत्रादि नांवें नक्षत्रांवरून पडली आहेत, त्याप्रमाणे, गुरु सूर्यसान्निध्यामुळे वर्षांत कांही दिवस अस्तगत असतो, तो ज्या नक्षत्रीं उदय पावल त्या नक्षत्रावरून गुरूच्या मासांस नांवें देऊ लागले. हे गुरूंचे मास ह्मणजे वस्तुतः सौरवर्षांची नांवें होत. म्हणून चैत्रसंवत्सर, वैशाखसंवत्सर असें ह्मणं लागले. वर्षसंख्या मोजण्यास द्वादशसंवत्सरचक्र हे एक चांगलें साधन होय. ह्या द्वादशसंवत्सरचक्राचे दोन प्रकार आहेत. एक गुरूच्या उदयावरून संवत्सरनाम देणे हा; ह्यास उदयपद्धति असें नांव देऊ. गुरूच्या एका उदयापासून दुसऱ्या उदयापर्यंत सुमारे ४०० दिवस जातात. आणि एका गुरुभगणांत झणजे १२ वर्षांत गुरूदय ११ होऊन एका संवत्सराचा लोप होतो. ही पद्धति थोडी गैरसोईची आहे. म्हणून गुरूची मध्यमगति जेव्हां बरोबर माहित झाली तेव्हां नक्षत्रमंडळाचा १२ वा भाग झणजे एक राशि क्रमण्यास जो काळ लागतो त्यास गुरूचा मास ह्मणजे संवत्सर म्हणावयाचे असें ज्योतिष्यांनी ठरविले. या रीतीने १२ वर्षांत संवत्सराचा लोप होत नाही. ह्या पद्धतीस मध्यमराशिपद्धति म्हणूं. गुरूचा उदय पहाणे व समजणे हे जसे स्वाभाविक व सोपे आहे तसें मध्यममानाने एक राशि क्रमिण्यास गुरूस किती काळ लागतो हे समजणे साहजिक व सोपे नाही. यावरून उदयपद्धति मूळची असली पाहिजे.* ही शकापूर्वी ५०० वर्षांच्या पूर्वी प्रचारांत होती असें भारतावरून दिसते (पृ. १२५). चैत्रादिकसंवत्सर आपल्या प्रांतांत माहीत नाहीत, परंतु मारवाडी लोकांच्या चंडू पंचांगांत मध्यमराशिपद्धतीने "चैत्रसंवत्सर " अशा प्रकारचे सवत्सराचें नांव असते. तसेंच मद्रास इलाख्यांतील चांद्रमानाच्या तैलंगी पंचांगांत उदयपद्धतीने संवत्सरनाम असते. आजपर्यंत अनेक प्राचीन ताम्रपट व शिलालेख सापडले आहेत, त्यांत गुप्त ह्मणून राजे होऊन गेले त्यांच्या वेळचे शक वर्ष ३९७ पासून ४५० पर्यंतचे पांच लेख सापडले आहेत. त्यांत चैत्रादिसंवत्सरांचा उपयोग केला आहे. (ते संवत्सर उदयपद्धतीचे आहेत असें मी सिद्ध केलें

  • इंडियन आंटिक्वरी नामक इंग्रजी मासिक पुस्तकाच्या २८८८ च्या दोन अंकांत Twelve year Oycle of Jupitor या लेखांत या विषयाचे सविस्तर विवेचन मी केले आहे.