पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/385

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३८६) तो पहिला मानिला असे दिसते. महाभारतांत कार्तिकादि मास नाहीत, मार्गशीििद आहेत. यावरून कार्तिकादीहून मार्गशीर्षादि मास प्राचीन आहेत. श. पू. २००० या कालापासूनच ते असावे. बेरुणीच्या वेळी ब-याच प्रदेशांत मार्गशीर्ष हा वर्षारंभ होता. हल्ली तो प्रचारांत नाही. मृगशीर्ष हे पहिले नक्षत्र असतां (श. पू. ४०००) तयुक्त पूर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून वर्षारंभ मानित असतील असे त्या नक्षत्राच्या अग्रहायणी ह्या संज्ञेवरून दिसते. त्यावेळी पौष इत्यादि संज्ञा असत्या तर त्या वर्षारंभमासाला पौष नांव मिळते. परंतु त्या नव्हत्या यामुळे पौषादि मासांचा उल्लेख कोठे नाही. तो नाहीं हें कृत्तिका पहिले नक्षत्र झाल्यावर चैत्रादि संज्ञा उत्पन्न झाल्या ह्या गोष्टीचें एक प्रमाण होय. लक्ष्मणसेनवर्षाचा आरंभ बंगाल्यांत केव्हां तरी पौष वद्य १ हा असावा. माघारंभी वर्षारंभ वेदांगज्योतिषांत आहे. तो फार दिवस मोठ्या प्रदेशांत नसावा असे दिसते. "फाल्गुन हे संवत्सराचे मुख" ह्या (पृ. १३०) वाक्यांतला वर्षारंभ माघ वद्य १ किंवा फाल्गुन शु. १ हा असला पाहिजे. हा एकदेशी दिसतो. तसाच माघ कृ. ८ (एकाष्टका) दिसतो. कारण संवत्सरसबारंभास तो नेमिला नाही. (माघी पूर्णिमेच्या अगोदर ४ दिवस सत्रारंभ करावा असा निष्कर्ष संवत्सरसत्राच्या अनुवाकांतून जैमिनीने काढिला असे सर्व मीमांसक समजतात.) आश्वलायनाने फाल्गुनी किंवा चैत्री पूर्णिमेस सत्रारंभ सांगितला (पृ. १३५) यावरूनही तसेंच दिसते. फाल्गुनी पूर्णिमा हा वर्षारंभ वसंताच्या संबंधाचा आहे. (पृ. १३५ पहा). मात्र वेदकाली फाल्गुनांत विषुव होत असे असें नाहीं हे मागे दाखविलेंच आहे. (पृ. १३६). ज्या अमान्त चांद्रमासाचा संबंध वर्षारंभाशी केव्हां तरी नाही असा एकही मास नाही. मात्र त्यांत चैत्राचा संबंध सर्वांत जास्त आहे. कार्तिक, मार्गशीर्ष यांचा त्याहून बराच कमी, तरी पुष्कळ आहे. भाद्रपदाचा त्याहन कमी तरी बराच आहे. ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, माघ, फाल्गुन यांचा थोडासा आहे. वैशाख, आश्विन यांचा फारच थोडा आहे. वर लिहिलेल्या बहुतेक वर्षारंभांना कारण ऋतु हे आहे. एकाच प्रदेशांत एकाच काली निरनिराळे वर्षारंभ होते व आहेत. उदाहरणार्थ आमच्या प्रांतांत हल्ली चैत्रशुद्ध १, मृग नक्षत्र, कार्तिक शुद्ध , जानुआरी, इत्याद वर्षारंभ आहेत. प्रत्येक प्रांतांत दोन तरी वर्षारंभ आहेत. एका महिन्यांतला वर्षारंभ कालांतराने त्याच्या पूर्वीच्या महिन्यांत आला, असे क्रमाने होत गेलें असें वरील विवेचनावरून दिसत नाहीं. वेदांत नक्षत्रारंभ कत्तिकांपासून आहे. कृत्तिकांपूर्वी मृग हे पहिले नक्षत्र होते असे अनुमान निघते. परंतु प्रत्यक्ष तशी गणना कोठे नाही. नक्षत्र चक्रारंभ. ज्योतिषसिद्धांतग्रंथांत अश्विनी हे पहिले नक्षत्र आहे. ते वैदिककाली किंवा वेदांगकाली नव्हते. धनिष्ठांपासून आरंभ वेदांगज्योतिषांत आहे. श्रवण हे एकदा पहिले नक्षत्र होतें असें महाभारतांत आहे. ह्मणजे ही दोन नक्षत्रे वेदांगकाली पहिली होती. त्या काली कृत्तिका हे पहिले होतेच. मृग, कृत्तिका, अश्विनी, यांच्या प्राथम्याचा संबंध वसंताशी अथवा वसंतांतल्या विषुवाशी आहे. धनिष्ठा, श्रवण, यांचा उदगयनारंभाशी आहे.