पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/384

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आणि जीमूतवाहन हा शक०१४ च्या सुमारास होता असे दिसते. भास्वतीकरण (शक १०२१) जगन्नाथ क्षेत्री झालेले आहे. त्यांत मेषसंक्रमणीं वर्षारंभ आहे. तामिळ प्रांतांत हाच ( सौर चैत्रारंभ ) वरिंभ आहे. तोही किती प्राचीन आहे हे समजत नाही. परंतु त्या प्रांतांतले शककालाच्या १२व्या शतकांतले ताम्रपटादि लेख सापडले आहेत, त्यांत सौरमास आहेत. त्या प्रांतांत आर्यसिद्धांत चालतो. त्याच्याइतका (शक ४२१) हा मासारंभ प्राचीन असेल असा संभव आहे. मृगनक्षत्रीं सूर्य ज्येष्ठांत व कधी वैशाखांत जातो. या वेळी वर्षारंभ महाराष्ट्र देशांत व आसपासच्या प्रांतांत सुरसन व फसलीसन यांचा आहे. हा शकवर्ष १२६६ (इ. स. १३४४) पासून आहे. हा ऋतूंस अनुसरून आहे. ज्येष्ठ शु. १३ ह्या वर्षारंभाचा संबंध एका व्यक्तीशी (शिवाजीशी) आहे. आषाढ शुक्ल १ हा वर्षारंभ काठेवा. डांत निदान सिंहसंवताइतका (शक १०३६) प्राचीन आहे. आषाढ वद्य २ हाही तसाच असावा असे दिसते. आषाढ वद्य १ हा वर्षारंभ लक्ष्मणसेन संवताच्या संबंधे तिरहुत आणि मिथिला प्रांतांत शक १०४१ नंतर केव्हां तरी असावा. हे आषाढातले तिन्ही वर्षारंभ तिथीवर आहेत, तरी त्यांचा संबंध पर्जन्यारंभाशी झणजे कतूशी आहे हे उघड आहे. फसली सनाचा आरंभ मद्रास इलारण्यांत कारभी (आषाढांत) होता. हल्ली सरकारहुकुमाने जुलईच्या पहिल्या तारखेस (ज्येष्ठांत किंवा आषाढांत ) होतो. हाही अर्थात् ऋतूवर आहे. आमच्या प्रांतांत हल्ली सरकारी मुलकी साल आगस्टांत सुरू होते. ( एप्रिलांतही सरकारी सालाचा आरंभ आहे. जानुआरीत वर्षारंभ हाही हल्ली सर्वत्र झाला आहे.) मलबारांत सिंहारंभी (श्रावणांत) आणि कन्यारंभी (भाद्रपदांत) वर्षारंभ आहे. हा कोल्लमकालाइतका (शक वर्ष ७४७) प्राचीन असावा. बंगाल्यांत कन्यारंभी वर्षारंभ आहे. हा फसली सालासंबंधे अकबरापासून आहे. बेरुणीच्या वेळी काश्मीरच्या आसपास भाद्रपदात वर्षारंभ होता. ओढियांतल्या भाद्रपद शुद्ध १२ चा संबंध एका व्यक्तीशी आहे. चेदिवरिंभ भाद्रपद वद्य १ हा असावा. कदाचित् तो आश्विन शुद्ध १हा असेल. चेदिवर्ष ७९३ (शक ९६२) पासून ताम्रपट सांपडले आहेत. तितका हा प्राचीन असावा. कार्तिक हा संवत्सरारंभ पुष्कळ प्राचीन दिसतो. बृहत्संहितेच्या भटोत्पलकत टीकेंत पूर्वीच्या संहिताकारांचे उतारे घेतले आहेत त्यांत कोठे कोठे सर्व मासांचा संबंध आला आहे; त्यांत कोठेकोठे कार्तिकापासून आरंभ आहे. सूर्यसिद्धांतांत तो वर्षारंभ आहे. विक्रमकालाच्या आरंभापासून उत्तर हिंदुस्थानांत तो असावा असे दिसते. कार्तिकादि विक्रम संवत् ज्यांत आहे असे विक्रम वर्ष ८९८ पासूनचे उत्तर हिंदुस्थानांतले पुष्कळ ताम्रपटादिलेख सांपडले आहेत. बेरुणीच्या वेळी कार्तिकवर्ष होते. नेपाळांतही कार्तिकवर्ष इ० स० १७४८ पर्यंत होते. हल्ली तें गुजराथेत मात्र आहे. कृत्तिका नक्षत्राच्या प्राथम्यावरून कार्तिक पहिला झाला. मार्गशीर्षादि वर्षाचाही संबंध कृत्तिकांशी दिसतो. पहिले नक्षत्र में कृत्तिका तयुक्त पूर्णिमेला (तिच्या दुसऱ्या दिवशी) सुरू होणारा जो महिना (त्याची पूर्णिमा मृगशीर्षयुक्त असल्यामुळे त्यास मार्गशीर्ष नांव देऊन) "कालतत्वविवेचन या ग्रंथांतले मासतत्वविवेचन पहा. + माझें Indian Calendar पुस्तक पृ. ८९ पहा.