पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/383

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३८४) समजणे कठिण झाले आहे. शिवाजीच्या राज्याभिषेकवर्षाचा आरंभ ज्येष्ठ शुक्ल १३ रोजी होत असे. अकबरी सनाचा आरंभ सायनमेषीं होत असे. किलहानच्या मतें चेदि संवताचा आरंभ आश्विनांत होत असे. बेरुणीनं याबद्दल माहिती लिहिली आहे (शक ९५२), ती फार महत्वाची आहे. तो ह्मणतो:-"ज्योतिषी लोक शकवर्षाचा उपयोग करितात. ते चैत्राबरोबर वर्षारंभ करितात. काश्मीरच्या सीमेवरील कनीर एथले लोक भाद्रपदाबरोबर वर्षारंभ करितात. बरदारी आणि मारीगल यांच्यामधील राहणारे लोक कार्तिकाबरोबर वर्षारंभ करितात. मारीगलच्या पलीकडे नीरहार प्रांतांतले व ताकेशर आणि लोहावर एथपर्यंतचे लोक, तसेंच लंघानचे लोक मार्गशीर्षाबरोबर वर्षारंभ करितात. मुलतानच्या लोकांनी मला सांगितले की सिंध आणि कनोज प्रांतांत हाच वर्षारंभ आहे; व मुलतानांत हाच होता; परंतु थोड्याच वर्षांपासून मुलतानच्या लोकांनी तो सोडून काश्मीरांतला चैत्राबरोबर वर्षारंभ स्वीकारिला. 1* एकंदर वर्षारंभ पाहिले तर अमान्त चांद्रमानाने मधुमासारंभ (चैत्र शुक्ल १), चैत्र कृष्ण १, ज्येष्ठ शु. १३, आषाढाची शुक्ल १, वद्य १, वद्य २, भाद्रपदाची शुक्ल १, शुक्ल १२, वद्य १, कदाचित आश्विन शुक्ल १, कार्तिक शुक्ल १, अमान्त कार्तिक वद्य १ किंवा मार्गशीर्ष शु०१ (मार्गशीर्षारंभ ), कदाचित मार्गशीर्ष रु.॥ (पूर्णिमान्त पौषारंभ ), पौष वद्य १, माघ शु० १, कदाचित माघ ० १ (पूर्णिमान्त फाल्गुनारंभ), माघ रु०८, कदाचित फाल्गुन शु०१, फाल्गुन क० १,हे वारभ आहेत. निरयन सौरमानानें मेषारंभ, मगनक्षत्र ( वृषभमासाचा सुमारे २५ वा दिवस), करिंभ, सिंहारंभ, कन्यारंभ हे वर्षारंभ आहेत. हे अनुक्रमें अमान्त चांद्रमानाच्या चैत्र, ज्येष्ठ ( कदाचित वैशाख ), आषाढ, श्रावण, भाद्रपद या महिन्यांत पडतात. सायन सौरमानानें मेषारंभ, आणि जुलईची पहिली तारिख (सायन कर्काचा सुमारे ११ वा दिवस ) हे वर्षारंभ आहेत. हे वर्षारंभाचे निरनिराळे मास अथवा दिवस कोणत्या काली कोठे प्रचारांत होते किंवा आहेत हे थोडक्यांत अनुक पाहं. वसंतांत मधुमासारंभी झणजे चैत्रारंभी वर्षारंभ हा श्रुति, वेदांगें, स्मृति, पुराणे, ज्योतिषगणितग्रंथ, आणि धर्मशास्त्राचे सांप्रतचे व प्राचीन निबंधग्रंथ या सर्वांत आहे. गुप्त राजांचे ताम्रपटादि लेख गुप्तसंवत् १५६ पासून २०९ पर्यंत ह्मणजे शकवर्ष ३९७ पासून ४५० पर्यंत सांपडले आहेत, त्यांतल्या ज्योतिषसंबंधी सर्व गोष्टींचा मेळ चैत्रारंभी वर्षारंभ धरून बसतो. ह्या गुप्तांची सत्ता एका काली बहुतेक उत्तर हिंदुस्थानांत होती. बेरुणीने (शक ९५२ ) चैत्रारंभी वर्षारंभ लिहिला आहे. सारांश हा वर्षारंभ सार्वकालिक, सार्वत्रिक आणि सर्वमान्य आहे. हा वर्षारंभ असूनही कोठेकोठे कधी कधी इतर वर्षारंभ होते व आहेत. चैत्र कृष्ण ही वसंतांतच असल्यामुळे पूर्णिमांतपद्धतीने हा वर्षारंभ वैदिक कालाच्या काही भागीं कांहीं स्थलीं होता असे दिसते. बंगाल्यांत सौर वैशाखाच्या आरंभी मणजे मेषारंभी वर्षारंभ आहे. हा किती प्राचीन आहे हे निश्चित समजत नाही. तथापि बंगाल्यांतील जीमूतवाहनाच्या धर्मशास्त्रग्रंथांत तो आहे. * Beruni's India, II, p. 8. | Gupta Inscriptions, Introduction,