पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/382

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३८३) मानाच्या अधिकमासाचा निषेध करून स्पष्टाधिमास प्रशस्त सांगितला आहे. यावरून सुमारे शकवर्ष १००० यापूर्वी व्यवहारांतही मध्यम मेषी वर्षारंभ होत असावा; पुढें स्पष्ट मेष प्रचारांत आला असावा. चैत्रमास अथवा मेषमास याच्या कोणत्या क्षणीं वर्षारंभ होतो याविषयी विचार पुढे मासविचारांत आहे. चैत्र अथवा मेष यांखेरीज इतर मासांतही वर्षारंभ होतो. याविषयीं आतां पाहूं. विक्रमसंवताच्या संबंधे नर्मदेच्या दक्षिणेस आणि गुजराथ प्रांताच्या काही भागात कार्तिक शुक्ल प्रतिपदेस वर्षारंभ होतो. अमदाबाद एथे छापलेलें शक १८१० (इ.स.१८८८८९), एक पंचांग मजपाशी आहे. त्यांत आषाढादि विक्रमसंवत १९४५ लिहिला आहे. ह्मणजे शके १८०० च्या आषाढ शुक्ल प्रतिपदेपासून १९४५ संवत लागला. बार्शी एथे काठेवाड प्रांतांतील एका प्रसिद्ध व्यापायाने शक १८१० मध्ये मला सांगितले की, राजकोट, जामनगर, मोरवी, टंकारा, जोडिया, खंभाळिया इत्यादि शहरांत झणजे काठेवाडांतल्या हालार प्रांतांत तसेंच काठेवाडांतील अमरेली, दामनगर, जेतपूर इत्यादि ठिकाणी, मणजे एकंदरीत बहुतेक काटेवाडांत व्यवहारांत आणि जमाखर्ची लिहिण्यांतही आषाढ शुक्ल प्रतिपदेपासून संवत पालटतो. व त्याप्रमाणे त्या व्यापाऱ्यास तिकडून आलेल्या पत्रांत शक १८१० आषाढ शुक्ल प्रतिपदेपासून संवत १९४४ संपून १९४५ लागलेला मी पाहिला. डा. नीट याचें Corpus Inscriptionum Indicarum Vol. III यांतही हालार संवत आषाढापासून सुरू होतो असे लिहिले आहे. इडर प्रांतांतले कांहीं व्यापारी मला बार्शी एथे शक १८१० मध्ये भेटले होते. त्यांच्या सांगण्यावरून समजते की, तेथे व आसपास १०० मैल प्रांतांत अमान्त आषाढ वद्य २ पासून संवत सुरू होतो. बंगाल्यांत आणि उत्तर हिंदुस्थानांतल्या इतर कांहीं प्रांतांत फसली सनाचा आरंभ पूर्णिमान्त आश्विन (अमान्त भाद्रपद) कृष्ण प्रतिपदेस होतो. ओढिया प्रांतांत भाद्रपद शुक्ल १२ या दिवशी वर्षारंभ होतो. (पृ.३७६). तिरहूत आणि मिथिला प्रांतांत लक्ष्मणसेनवर्षाचा आरंभ पूर्णिमांत श्रावणाच्या अथवा माघाच्या आरंभी झणजे अमांत आषाढ, अथवा पौष यांच्या वय प्रतिपदेस होतो असे दिसते. कोची आणि विवंद्रम एथे छापलेल्या पंचांगांवरून व इतर माहितीवरून समजतें की दक्षिण मलबार प्रांतांत व तिनेवल्ली प्रांतांत सिंहसंक्रमणी वर्षारंभ होतो. कलिकट आणि मंगळूर एथे छापलेल्या पंचांगावरून व इतर माहितीवरून समजतें की उत्तर मलबार प्रांतांत कन्यामासारंभी वर्षारंभ होतो. मद्रास इलाख्यांत कर्क मासाबरोबर फसली सनाचा आरंभ होत असे; पुढे तो जुलईच्या १३ व्या तारखेस होऊ लागला; हल्ली जुलईच्या पहिलीला होतो. महाराष्ट्रांत मृगनक्षत्रीं फसली सनाचा आरंभ होतो. ओढिया प्रांतांत विलायती सनाचा आरंभ कन्यासंक्रमणी होतो. सांप्रतची पद्धति एथवर पाहिली. आतां मागची पाहूं. आमच्या कोणत्याच ज्योतिषग्रंथांत किंवा इतर ग्रंथांत वर्षारंभमासाचा इतिहास दिलेला नाही, किंवा त्यासंबंधे विचार अथवा निर्णय केलेला नाही. यामुळे सांप्रत याबद्दल इतिहास