पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/381

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३८२) (पृ. १३३ पहा). वेदांगज्योतिषांत अमान्त माघारंभी वर्षारंभ आहे; महाभारतांत मार्गशीर्ष हा वर्षारंभ असे उल्लेख आहेत; तरी वेदांगकाली चैत्रादि वर्षाचे प्राधान्य सूत्रादिकांवरून दिसते. आतां पुढील काळींचा विचार करूं. ज्योतिषग्रंथकार आपल्यास जशी सोय वाटेल त्याप्रमाणे आपल्या ग्रंथांत गणितारंभ सौरवर्षारंभापासून किंवा चांद्रसौरवर्षारंभापासून करितात. गणेश देवज्ञानें ग्रहलाघवांत *चांद्रसौरवपीरभापासून गणितारंभ केला आहे. आणि त्यानेच तिथिचिंतामणि ग्रंथांत मेषसंक्रमण झणजे सौरवर्षारंभ हा वर्षारंभ घेतला आहे. सौरवर्षसंबंधेही बहुतेक ग्रंथकार मध्यम मेषसंक्रमणापासून आणि कोणी स्पष्ट मेषापासून वर्षारंभ करितात. आणि चांद्रसौरवर्षीरंभापासून आरंभ करणे तो चैत्रशुक्ल प्रतिपदेच्या आरंभापासूनच करितात असे नाही, तर त्या दिवशी केव्हां तरी-बहुधा सूर्योदयीं-करितात. कधी मध्यरात्रीस, मध्यान्हीं किंवा सूर्यास्तीही करितात. धर्मशास्त्रांत चैत्रारंभी वर्षारंभ आहे. आतां व्यावहारिक वरिभाविषयी विचार करूं. धर्म आणि व्यवहार यांचा निकट संबंध असल्यामुळे दोन्ही प्रकारच्या वर्षारंभांचाही निकट संबंध आहे हे सांगावयास नकोच. हिंदुस्थानच्या पुष्कळ भागांत चैत्रापासून वर्षारंभ होतो. शककाल आणि चांद्रमान जेथे जेथे चालतें तेथे तर चैत्रशुक्ल प्रतिपदेसच वर्षारंभ होतो. नर्मदेच्या उत्तरेस बंगाल्याखेरीज इतर प्रांतांत विक्रम संवत, चांद्रमान, आणि पूर्णिमांत मास चालतात; तरी वर्षारंभ चैत्रशुक्ल प्रतिपदेस होतो. बंगाल्यांत शककाल आणि सौरमान चालते. तेथे वर्षारंभ सौर वैशाखापासून ह्मणजे स्पष्ट मेषसंक्रमणापासून करितात; परंतु चांद्र चैत्रशुक्ल प्रतिपदेचेही माहात्म्य असेल असे दिसते. त्याप्रमाणेच तामिळ प्रांतांत सौरमान चालतें. तेथे स्पष्ट मेषसंक्रमणापासून वर्षारंभ आहे, तरी चांद्र चैत्रशुक्ल प्रतिपदेचे माहात्म्य असेल असे दिसते. चैत्र अधिक असेल तेव्हां वर्षारंभ अधिक चैत्रांत करावा की शुद्ध चैत्रांत करावा याविषयी मतभेद दिसतो. हल्ली मेषसंक्रमणीं वर्षारंभ जेथे होतो तेथे तो स्पष्ट मेषसंक्रमणापासून होतो. परंतु पूर्वी। मध्यम मेषीं वर्षारंभ होत असेल असे दिसते. कारण ज्योतिषग्रंथांत त्याचे प्राधान्य आहे. भास्वतीकरणांत (शक १०२१) स्पष्ट मेषसंक्रमण हा आरंभकाल घेतला आहे, त्यापूर्वीच्या कोणत्याही ग्रंथांत स्पष्टमेष हा आरंभकाल नाहीं. स्पष्ट संक्रमणी मासारंभ होत असे अशी शक १०८३ नंतरची मलबार प्रांतांतली पुष्कळ उदाहरणे शिलालेखांवरून दिसून आली आहेत. श्रीपतीने (शक ९६१) मध्यम

  • चांदसौर वर्ष झणजे ज्याचे महिने चांद्र असतात, परंतु सौरवर्षाशी मेळ ठेवण्याकरितां ज्यांत अधिकमास घालितात ते वर्ष.

स्पिष्ट मेषानंतर काही कालाने मध्यम मेष होतो. दोहोंच्या अंतरास शोध्य म्हणतातहे शो. ध्य निरनिराळ्या सिद्धांतांप्रमाणे निरनिराळे आहे. पहिल्या आर्यसिद्धांताप्रमाणे २ दि. ८ घ. ५१ प. १५ विपळे आहे. आणि वर्तमानसूर्यसिद्धांताप्रमाणे २ दि. १० घ. १४ प. ३० वि. आहे. Indian Antiquary, XXV. p. 53 ff.