पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/380

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३८७) चांद्रसौर मानानें बहुधान्य ( १२ वा ) संवत्सर आणि बार्हस्पत्य मानाने विरुति (२४ वा ) संवत्सर होता. मेषसंक्रमण नुकतेच पूर्वी ह्मणजे चैत्र शुक्ल ९ गुरुवारी मध्यरात्रीनंतर सुमारे १० घटिकांनी होऊन सौर मानाचें कलिवर्ष आणि शकवर्ष कोठे त्याच दिवशी, कोठे दुस-या दिवशी आणि कोठे तिसऱ्या दिवशी ह्मणजे चैत्र शुक्ल ११ शनिवारी सुरू झाले होते. चांद्रमानानें चैत्र शुक्ल ११ हीच तिथि सर्वत्र होती. सौरमानानें बंगाल्यांत शक, बंगाली सन, यांच्या सौर वैशाखाचा (मेषाचा) पहिला व फसली चैत्राचा २६वा दिवस होता.ओढिया प्रांतांत विलायती आणि अमली सनांचा सौर वैशाखाचा तिसरा दिवस होता. तामिळ (द्रविड) देशांत सौर चैत्राचा (मेषाचा ) दुसरा दिवस होता, आणि उत्तरदक्षिण मलबारांत कोलम (परशुराम) वर्षांचा मेषमासाचा दुसरा दिवस होता. हिजरी सनाचा व आमच्या प्रांतांतील फसली व सूरसनाचा रबिलाखर (रबिल उस सानी) चा ९ वा चंद्र होता. चांद्र आणि सौर या दोन मानांच्या वर्षांच्या प्रचाराविषयी थोडेसें विवेचन चांदसौर मानें. करूं. आमच्या धर्मशास्त्रांतील बहुतेक कृत्यांचा संबंध ति थींशी अर्थात् चांद्रमानाशी आहे. संक्रांतीसंबंधी रुत्यांचा संबंध सौरमानाशी आहे. प्रभवादि संवत्सर बार्हस्पत्य मानावरून मूळ निघाले. तेव्हां आमच्या लोकांत अमुक एकच मान चालतें असें ह्मणतां येत नाही. तथापि कांहीं प्रदेशांत सौरमानाचा आणि काहींत चांद्रमानाचा विशेष प्रचार आहे. बंगाल्यांत सौरमानाचे वर्ष चालतें. मद्रास एथे छापलेल्या ज्वालापतिसिद्धांतिकत शक १८०९ च्या पंचांगांत लिहिले आहे की, “ ह्या देशांत लोकव्यवहारार्थ चांद्रमान ग्राह्य आहे. शेषाचलाच्या दक्षिणेस सौरमान ग्राह्य आहे." सदई पंचांग मद्रासच्या उत्तरेकडील नेलोर एथे राहणाऱ्या एका तैलंग ब्राह्मणापाशी मला आढळले. त्याने सांगितले की आमच्या देशांत चांद्रमान चालतें. यावरून व मद्रास इलाख्यांतली अनेक पंचांगें मी मिळविली आहेत त्यांवरून आणि निरनिराळ्या प्रांतांतील लोकांपासून समक्ष मिळविलेल्या माहितीवरून दिसून आले की मद्रास इलारच्यांत तामिळ भाषा जेथे चालते त्या प्रांतांत व मलबार प्रांतांत आणि बंगाल्यांत लौकिक व्यवहारांत सौरमान चालते; आणि हिंदुस्थानच्या इतर प्रांतांत व्यवहारात चांद्रमान चालतें. धर्मकत्यांत धर्मशास्त्रोक्त माने चालतात. या मानाचे मास, मासारंभ इत्यादिकांचा विचार पुढे करूं. यजुर्वेदसंहिताकाली आणि तदनुसार पुढे सर्व वैदिककाली वसंतारंभी मधु मासी वर्षारंभ होत असे. वैदिककालाच्या अंती मधुमावर्षारंभ. सास चत्र हें नांव पडले. संवत्सरसत्राचा अनुवाक (पृ.३०) व काही दुसरी वाक्ये (पृ. ३८,३९) यांवरून चित्रापूर्णमास (चैत्र शुक्ल १५ अथवा रु.१) फल्गुनीपूर्णमास (फाल्गुन शु. १५ किंवा क. १) आणि कदाचित् अमान्त माघ कृ. ८ ( एकाष्टका) हेही कोठे कोठे वर्षारंभ असावे असे दिसते. एका वाक्यांत फाल्गुन हे संवत्सराचें मुख ह्मटले आहे. (पृ. १३०). हा फाल्गुन पूर्णिमान्त असेल तर अमान्त माघ रु.१ हा वर्षारंभ असेल; अमान्त असेल तर फाल्गुन शु. १ हा वर्षारंभ असेल. एकदा पूर्णिमान्त पौषारंभी वर्षारंभ होत असावा असें संभवते; पौष हे नांव मात्र तेव्हां नव्हतें