पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/378

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३७९) राजेंद्रलालमित्र (इ. स. १८७८) आणि जनरल कनिंघम ह्मणतात की, तो (पूर्णिमान्त ) माघ वद्य प्रतिपदेस होतो.* डाक्तर किलहान याने इ. स. ११९४ पासून १५५१ पर्यंत या कालांतले सहा लेख पाहून त्यांवरून असें अनुमान काढिले आहे की, या कालाचे वर्ष कार्तिकादि आहे; महिने अमांत आहेत; आणि याचे पहिले वर्ष शक 1०४०४३ मध्ये होते. अकबरनामा या ग्रंथांतील अबुलफजल याच्या लेखाशी हे अनुमान मिळते. याप्रमाणे या काळाच्या वर्षांत १०४०।४१ मिळवून शकवर्ष येते; १११८।१९ मिळवून इ. स. येतो; आणि ११७५ मिळवून कार्तिकादि विक्रम संवत येतो. इलाही सन-हा अकबर बादशहाने सुरू केला. याला अकबरी सन असेंही ह्मणतात. हिजरी सन ९६३ रबिउस्सानी महिन्याची तारीख २ शुक्रवार, तारिख १४ फेब्रुवारी इ. स. १५५६, शक १४७७ या दिवशी अकबर बादशहा गादीवर बसला.हेच वर्ष या सनाचे पहिले मानिले. अकबर आणि जहांगिर यांच्या नाण्यांवर हा सन पुष्कळदां आहे. शहाजहानच्या कारकीर्दीत हा मागे पडला.याचें वर्ष सौर आहे.अबुल फजल ह्मणतो की, “या सनाचे दिवस आणि महिने नैसर्गिक सौर (सावन) आहेत. महिन्यांत दिवसाची क्षयवृद्धि होत नाही. महिने आणि दिवस यांची नांवें प्राचीन पारशी आहेत. महिन्याचे दिवस २९ किंवा ३० असतात. त्यांतील प्रत्येकास निरनिराळे नांव आहे. आठवडे मुळीच नाहीत. काही महिन्यांचे ३२ दिवस आहेत." यांत महिन्याचे दिवस २९ किंवा ३० ह्मटले आहेत, परंतु प्राचीन पारशी पंचांगांत प्रत्येक महिन्याचे ३० दिवस असत. पारशी महिन्यांची फरवर्दिन इत्यादिक नांवें हल्ली पंचांगांत असतात तीच या सनाच्या महिन्यांची होत. इलाही सनाच्या वर्षांत १४७६।७७ मिळवून शकवर्ष येते, आणि १५५५।५६ मिळवून इ. स. चे वर्ष येते. राजशक अथवा राज्याभिषेक शक.-मराठी राज्याचा संस्थापक शिवाजी याने हा काळ सुरू केला. शिवाजीस राज्याभिषेक झाला त्या दिवसापासून, झणजे ज्येष्ठ शुक्ल १३ शक १५९६ आनंद संवत्सर या दिवशी हा शक सुरू झाला. याचे वर्ष सदहू तिथीस बदलतें. बाकी सर्व गोष्टींनी याची पद्धति दक्षिणेतील चांदसौर

  • या कालाची एथपर्यंत माहिती कनिंघमच्या Indian Eras या पुस्तकावरून लिहिली आहे. + Indian Antiquary, XIX, p.7ff...

अबूल फझल ह्याणे दिलेले अकबरी ५० वर्षांचे आरंभदिवस कनिंघमने दिले आहेत ( Indian Eras, p. 225) त्यांत पहिल्याच वर्षाचा आरंभदिवस रबिलाखरची तारिख २७ (१० मार्च मंगळवार) हा आहे. आणि पुढे सर्व वर्षांचे आरंभ ओल्ड स्टाइलप्रमाणे १० मार्चच्या सुमारास ह्मणजे सायन मेषसंक्रमणी आहेत. तेव्हां हल्लीच्या मानाने २१ मार्चच्या सुमारास अकबरी वर्षाचा आरंभदिवस येतो. रबिलाखरच्या दुसऱ्या तारखेस अकबर गादीवर बसला असून मुद्दाम त्यानंतर २५ दिवसांनी सनाचा आरंभ मानिला, यावरून ज्या दिवशी दिनरात्रिमान समान अशा ह्मणजे विषुवदिवशी (सायन मेषीं) वर्षारंभ मानण्याचा अकबरचा हेतु दिसतो. $ Prinsep’s Indian Antiquities, II, Useful Tables, p. 171.